Successful Farmer: गेल्या अनेक वर्षांपासून देशात शेतकरी बांधवांनी (Farmer) उत्पन्न (Farmer Income) वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राज्यातही शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड करत आहेत. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव डाळिंब, द्राक्ष, केळी यांसारख्या फळबाग पिकांची शेती (Farming) मोठ्या प्रमाणात करत असतात.
याव्यतिरिक्त राज्यातील शेतकरी बांधव आता मोठ्या प्रमाणात ड्रॅगन फ्रुट ची शेती देखील करू लागले आहेत. विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुटची शेती (Dragon Fruit Farming) शेतकऱ्यांसाठी मोठी फायदेशीर ठरत असून शेतकऱ्यांना यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
शेतकरी बांधवांनी फळबाग लागवडीकडे वळले पाहिजे या हेतूने मायबाप शासन देखील शेतकरी बांधवांना फळबाग लागवडीसाठी अनुदान (Dragon Fruit Subsidy) उपलब्ध करून देत आहे. ड्रॅगन फ्रुट शेती साठी देखील शासनाकडून शेतकरी बांधवांना अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
मित्रांनो तुम्ही ड्रॅगन फ्रुट शेती विषयी ऐकले असेल, पण तेलंगणा राज्यातील एका अवलिया शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटची ऑफ सीजन मध्ये शेती करून लाखों रुपये उत्पन्न कमवून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. तेलंगणा राज्याच्या संगारेड्डी जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी रमेश रेड्डी यांनी ऑफ सीजनमध्ये ड्रॅगन फ्रुट पिकवण्याची किमया साधली आहे.
रेड्डी यांच्या मते, ते दरवर्षी ड्रॅगन फ्रुट च्या शेतीतून 15 लाख रुपयांची कमाई करत असतात. विशेष म्हणजे ऑफ सीजनमध्ये एलईडी बल्बचा वापर करून ते ड्रॅगन फ्रुट यशस्वीरीत्या उत्पादित करतात.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यासाठी जून ते नोव्हेंबर हा कालावधी सर्वात उपयुक्त असतो. या कालावधीत शेती केल्यास ड्रॅगन फ्रुट चे चांगले उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. मात्र तेलंगणाच्या रमेश रेड्डी यांनी ऑफ सीजन मध्ये ड्रॅगन फ्रुट उत्पादित करून दाखवले आहे. रमेश रेड्डी यांनी ऑफ सीझनमध्ये ड्रॅगन फ्रुट साठी एलईडी बल्बचा वापर केला यासाठी 9 ते 15 वॉटचे एलईडी बल्ब वापरण्यात आले. यासाठी प्रति एकर दोन लाख रुपये रमेश रेड्डी यांना खर्च आला.
मित्रांनो ऑफ सीजनमध्ये ड्रॅगन फ्रुटला अधिक भाव मिळत असल्याने रमेश रेड्डी यांनी हा प्रयोग केला आहे. हंगामात ड्रॅगन फ्रुटला शंभर रुपयांचा भाव मिळतो तर ऑफ सिझन मध्ये हाच भाव दुपटीने वाढतो. रमेश रेड्डी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, त्यांनी 2016 मध्ये ड्रॅगन फ्रुट शेती करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीच्या काळात त्यांनी अवघ्या 2 एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली होती. यावेळी त्यांना दहा लाख रुपये खर्च आला होता. रमेश आता सात एकरात ड्रॅगन फ्रुटची शेती करत आहेत. रमेश यांच्या मते ड्रॅगन फ्रुट ला अधिक पाणी लागत नाही. ड्रॅगन फ्रुटसाठी एका वर्षात 50 हजार रुपये एकरी खर्च लागतो.
मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, ड्रॅगन फ्रुटचे पीक घेण्यासाठी प्रकाश अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाशासोबतच ड्रॅगन फ्रुटला रात्री चार तास एलईडी बल्बचा वापर करून कृत्रिम प्रकाश दिला जातो. ही लाईट वापरल्याने फळांच्या आकारातही फरक पडू शकतो. मात्र फळाचा दर्जा आणि चव बदलत नाही असेही तज्ञ सांगतात. निश्चितच या शेतकऱ्याचा हा प्रयोग इतरांसाठी प्रेरणा देणारा आहे.