जमीन किंवा घर खरेदी करा परंतु ‘या’ चुका टाळा,नाहीतर येईल रडत बसण्याची वेळ! वाचा ए टू झेड माहिती

Ajay Patil
Published:
land rule

आपल्यापैकी बरेच जण राहण्यासाठी घर किंवा गुंतवणुकीसाठी एखादी जमीन खरेदी करतात. अशा प्रकारचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कष्ट करून पैसा जमा करतो व त्या माध्यमातून अशा मालमत्तेची खरेदी करतो. परंतु बऱ्याचदा आपण ऐकले किंवा वाचले असेल की अशा जमीन खरेदी-विक्री किंवा घर खरेदी विक्रीचे व्यवहारांमध्ये फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे समोर आलेली दिसून येतात.

अशावेळी मात्र पैसा तर जातोच परंतु खूप मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यामुळे अशाप्रकारे जमीन किंवा घर खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. अशाप्रसंगी काही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे देखील गरजेचे ठरते. याविषयी तज्ञांनी खूप महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केलेले आहे व त्याविषयीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 जमीन किंवा घर खरेदी करताना या गोष्टींची काळजी घ्या

जमीन किंवा घराची खरेदी करण्याअगोदर कोणती काळजी घ्यावी याविषयी तज्ञ म्हणतात की, तुम्हाला ज्या गावांमध्ये किंवा ज्या ठिकाणी जमिनीची खरेदी करायची आहे त्या गावातील तलाठ्याकडून त्या जमिनीचा नवीन सातबारा काढून घेणे गरजेचे आहे. सातबारा आणि आठ अ उतारे काढून ते व्यवस्थित तपासून घ्यावे.

ज्या व्यक्तीकडून आपण जमीन खरेदी करणार आहोत नेमके त्याचेच नाव सातबारावर आहे की नाही हे लक्षपूर्वक तपासून घ्यावे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचा न्यायालयीन खटला सुरू आहे का हे सुद्धा तपासणी गरजेचे आहे. त्या जमिनीच्या उताऱ्यावर काही नियोजित मार्गाची नोंद वगैरे तर नाही ना याचीदेखील खात्री करावी.

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संबंधित जमिनीचे मागील बारा वर्षाचे सातबारे आणि फेरफार उतारे पाहणे खूप गरजेचे आहे. या प्रकारचे उतारे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला त्या कालावधीमध्ये या जमिनीच्या मालकी हक्कात काही बदल झालेले आहेत का व झाले असतील तर ते कळतात.

तसेच संबंधित जमिनीचा संपूर्ण इतिहास तुम्हाला तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षामध्ये मिळतो. महत्वाचे म्हणजे जमिनीचा सातबारा तुम्हाला मिळाल्यानंतर जमीन नेमकी कोणत्या भूधारणा प्रकारात येते म्हणजेच भोगवटादार वर्ग एक मध्ये आहे की दोन मध्ये हे पाहणे खूप गरजेचे आहे.

त्या गटाचा नकाशा पाहून घ्याव्या व त्यामुळे जमिनीची हद्द कळण्यास मदत होते. तसेच त्या जमिनीवर शेतरस्ता आहे की नाही हे देखील पहावे. जमिनीच्या बाबतीत कोणाची काही हरकत आहे की नाही याची खात्री करूनच जमिनीची खरेदी करावी.

 व्यवहार झाल्यानंतर जमिनीची नोंद केल्याने तुम्ही मालक होता का?

जेव्हा आपण एखादी मालमत्ता खरेदी करतो व तिची तहसीलमध्ये नोंद केली जाते व ती नोंद केल्यानंतर तुम्ही जमिनीचे मालक होता का हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु जमिनीची नोंद केल्याने तुम्ही त्या जमिनीचे मालक होतातच असे नाही. त्याकरता तुम्हाला नोंदणी केल्यानंतर त्याच प्रॉपर्टीचे मालक होण्यासाठी काही ठिकाणी नोंदी करणे गरजेचे असते.

समजा तुम्ही एखादे दुकान किंवा घर, जमिनीची खरेदी केली तर आपण विक्रेत्याला पूर्ण रक्कम देतो व या व्यवहाराची नोंदणी केल्यानंतर आपण त्या मालमत्तेचे मालक होत नाही. अशा प्रकारच्या नोंदणी केल्यानंतर म्युटेशन करणे देखील अत्यंत गरजेचे असते. यामध्ये नोंदणी करणे हा केवळ मालकी हस्तांतरणाचा दस्तऐवज असतो.

याने मालकी हक्क सिद्ध होत नाही. त्यामुळे मालमत्तेची नोंदणी केल्यानंतर तुम्ही ताबडतोब त्या नोंदणीच्या आधारे म्युटेशन करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही त्या मालमत्तेचे संपूर्णपणे मालक होतात.

अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या परंतु महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही अशा व्यवहारांमध्ये फसू शकत नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe