Successful young farmer: देशातील अनेक युवकांचे उच्च शिक्षण झाल्यानंतर चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न असते. अनेकांना सरकारी नोकरी हवी असते. आता या यादीत शेतकरी पुत्रांचा (Farmers) देखील समावेश झाला आहे.
नवयुवक शेतकरी पुत्र (Young Farmer) देखील आता उच्चशिक्षण घेतल्यानंतर नोकरीला अधिक पसंती दर्शवीत आहेत. विशेष म्हणजे आई-वडिलांचे देखील आपल्या पाल्याने चांगल्या पगारावर नोकरी करावी असे स्वप्न असते.
मात्र असे असले तरी आजही असे अनेक नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असून देखील शेती व्यवसायाला (Farming) पसंती दर्शविली असून शेती व्यवसायात आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा यथायोग्य वापर करत चांगले नेत्रदीपक यश संपादित करीत आहेत.
असे नवयुवक काळाच्या ओघात शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत लाखो रुपये कमवण्याची किमया साधता आहेत. यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील मोठी प्रेरणा मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या बेगमपूर येथील बालाजी दत्तात्रेय देखील असेच एक नवयुवक शेतकरी आहेत ज्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीऐवजी शेतीला विशेष प्राधान्य दिले आणि आजच्या घडीला हा नवयुवक आपल्या वडिलोपार्जित साडेचार एकर शेतजमीनीत आधुनिक शेतीच्या माध्यमातून वर्षाकाठी पंधरा लाख रुपये कमवत आहेत.
बालाजी आपल्या शेतात भाजीपाला वर्गीय पिकांची (Vegetable Crop) शेती करतात तसेच त्यांनी फळबाग लागवड देखील केली आहे. बालाजी यांनी आपल्या शेतात डाळिंबाचे यशस्वी उत्पादन (Pomegranate Farming) घेऊन दाखवले आहे विशेष म्हणजे बालाजी यांनी उत्पादित केलेला डाळिंब रिलायन्स सारख्या नामांकित कंपनीत विक्रीसाठी जात आहेत.
त्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला व्यापारी वर्ग त्यांच्या बांधावर येऊन खरेदी करतात. यामुळे बालाजी यांना भाजीपाला वर्गीय पिकातून तसेच डाळिंब पिकातून (Pomegranate Crop) चांगले उत्पन्न मिळत आहे.
एकीकडे अनेक शेतकरी बांधव शेती व्यवसाय परवडत नाही असं म्हणत शेती व्यवसायाकडे पाठ फिरवित आहेत तर दुसरीकडे बालाजी सारखे उच्चशिक्षित तरुण शेती व्यवसायात लाखो रुपयांची कमाई करत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
बालाजी शेती व्यवसायातील सर्व बारकावे फेसबुक वर मांडत असतो. पिकाचे उत्पन्न घेतल्यानंतर इतर शेतकऱ्यांना त्याची माहिती व्हावी या हेतूने तो फेसबुक वरती पोस्ट करत असतो. त्याच्या परिवारातील सदस्य देखील आता शेती व्यवसायात चांगली कामगिरी करत असून तेदेखील फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत.
बालाजी यांच्या या सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे इतर जिज्ञासू शेतकऱ्यांना फायदा होत आहे. बालाजी एका एकरात तीन भाजीपाला वर्गीय पिकांची वर्षातून शेती करत असतात. यामुळे दर साठ दिवसांनी बालाजी यांना शेतीतून चांगली भरघोस कमाई होत आहे.
बालाजी यांनी सुरुवातीला फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने डाळिंबाची लागवड केली. डाळिंब पिकातून त्यांना चांगले उत्पन्न देखील मिळाले. सलग तीन वर्ष बालाजी यांनी उत्पादित केलेला डाळिंब रिलायन्स मॉल मध्ये विक्रीसाठी जात होता.
सध्या बालाजी भाजीपाला वर्गीय पिकांची शेती करत आहेत. बालाजी यांनी उत्पादित केलेला भाजीपाला हा उत्कृष्ट दर्जाचा असल्याने व्यापारी वर्ग त्यांच्या बांधावर येऊन भाजीपाल्याची खरेदी करतात. यामुळे वाहतुकीसाठी येणारा बालाजींचा खर्च वाचतो आणि सहाजिकच उत्पन्नात वाढ होते.
शेतकरी बांधवांनी बालाजी प्रमाणे शेती व्यवसायात बदल करणे अतिशय महत्त्वाचे आहे. बाजारपेठेत ज्या शेतमालाची अधिक मागणी आहे त्याच शेतमालाची शेतकरी बांधवांनी शेती करायला हवी. एकंदरीत काय बाजारात जे विकले जाते ते पिकवले तर निश्चितच शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा मिळू शकतो.