Ahmednagar News :- घरे बांधताना आता प्रत्येकजण अनके गोष्टींची काळजी घेतो. कारण स्वतःच घर ही अनेकांची मनोकामना असते. परंतु बऱ्याचदा घर बांधकाम करताना अनेक अडचणी येतात. जस की, पाय किती खोल घ्याव, जे साहित्य आपण वापरत आहोत ते कितपत योग्य आहे आदी.
परंतु आता सर्वांचेच टेन्शन संपणार आहे. त्याच कारण असं आहे की, घरासाठी लागणारे सर्व साहित्य आता प्रयोगशाळेत तपासता येईल. या लॅबची पायाभरणी झाली आहे. ही सुविधा लवकरच नगरकरांच्या सेवेला येणार आहे.
बऱ्याचदा अशास्त्रीय पद्धतीने बांधकाम केले जाते. या कामामुळे घराची लाईफ कमी होते. अतिवृष्टी, पूर अशा नैसर्गिक आपत्तीत इमारतींचा पाया कोसळतो. काही इमारती कोसळून जीवित व वित्तहानी झाली आहे. हे या प्रयोगशाळेद्वारे टाळता येऊ शकते. घराच्या बांधकामापूर्वी जमिनीखाली किती खोलीवर खडक आहे (जिओटेक्निकल सॉईल इंव्हेस्टिगेशन) याची तपासणी केली जाते.
त्यानुसार पायाची खोदाई निश्चित करता येते. सर्व बांधकाम साहित्य तसेच यांत्रिकी आणि धातू तपासण्या केल्या जातील. बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिक आणि अभियंत्यांना जमीन, साहित्याचा दर्जा लॅबमुळे समजणार आहे. परिणामी दर्जेदार बांधकाम होईल असे राजाराम पुजारी (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्ट्राँगटेक लॅब) यांनी म्हटलं आहे.
अहमदनगरमध्ये कुठे असणार ‘ही’ प्रयोगशाळा
आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन आणि पुण्यातील स्ट्राँगटेक लॅब यांनी अहमदनगर-दौंड महामार्गावर व्हीआरडीई समोर प्रकल्प सुरू केला आहे. ही प्रयोगशाळा अरणगाव (ता. नगर) येथे असणार आहे. सध्या त्याचं कामही पूर्ण झालं आहे.
प्रयोगशाळेत कोणत्या तपासण्या करता येतील ?
स्ट्रक्चरल ऑडिट, काँक्रिट मिक्स डिझाइन, प्लेट लोड टेस्ट, ई. आर. टी., एन. डी. टी., पाईल मटेरिअल टेस्ट, पाइल डायनामिक टेस्ट, सर्व बांधकाम मटेरियल टेस्ट, सर्व बांधकाम मटेरियल केमिकल टेस्ट, सर्व ॲडमिक्सर टेस्ट,
ग्राऊट व मोर्टर टेस्ट, पेविंग ब्लॉक टेस्ट, लाइट वेट ब्लॉक टेस्ट, ब्रिकवरील टेस्ट, बिटुमिन टेस्ट, टाईल्सवरील सर्व टेस्ट, वेल्डिंग टेस्ट, सर्व मेटल टेनसाइल टेस्ट, मेटल हार्ड नेस टेस्ट, सर्व मेटल केमिकल टेस्ट आदींसारख्या तीनशे जास्त टेस्ट करता येतील.