Business Idea : देशात अनेकजण आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी नोकरी (Job) करतात. परंतु, अनेकजण रोजच्या नोकरीला वैतागलेले असतात.
अशातच अनेकजण स्वतःचा व्यवसाय (Business) सुरु करतात. परंतु, प्रत्येकाकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे असतातच असे नाही. तुम्हाला आता सरकारच्या (Govt) मदतीने व्यवसाय सुरु करता येणार आहे.
सरकारी कंपन्यांची (Government companies) फ्रँचायझी (Franchise) उघडून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला या व्यवसायांमध्ये गुंतवणूक (Investment) करण्याचीही गरज नाही आणि नफाही चांगला मिळतो. तसेच, त्यात नुकसान होण्याची शक्यताही नगण्य आहे. सरकारी फ्रँचायझीसोबत (Government Franchise) काम करण्याची मजा वेगळीच असते आणि कमाईही बंपर असते.
आधार कार्ड फ्रँचायझी
आजकाल, आधार कार्ड (Aadhaar Card) हे देशात राहणाऱ्या प्रत्येकासाठी आवश्यक कागदपत्र आहे. त्यामुळे याला खूप मागणी आहे. तुम्ही आधार कार्ड फ्रँचायझी (Aadhaar Card Franchise) घेऊ शकता. याद्वारे तुम्ही खूप चांगले पैसे कमवू शकाल. जर तुम्हाला आधार कार्ड फ्रँचायझी करायचे असेल तर प्रथम तुम्हाला UIDAI द्वारे आयोजित परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल.
यानंतर सेवा केंद्र उघडण्यासाठी परवाना दिला जातो. एकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला आधार नोंदणी क्रमांक आणि बायोमेट्रिक पडताळणी करावी लागेल. त्यानंतर कॉमन सर्व्हिस सेंटरवरून नोंदणी करावी लागेल.
अशा परिस्थितीत आधार कार्ड अतिशय काळजीपूर्वक ठेवावे लागते. तसेच, त्यात काही चूक असल्यास, ती दुरुस्त करण्यासाठी तुम्ही कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UIDAI च्या फ्रँचायझीकडे जाऊ शकता. तुम्ही आधार कार्ड फ्रँचायझी देखील घेऊ शकता.
अर्ज कसा करायचा?