HDFC Bank : HDFC बँकेकडून ग्राहकांना इशारा, दुर्लक्ष करणे पडेल महागात !

Sonali Shelar
Published:
HDFC Bank

HDFC Bank Alert : HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही देखील या बँकेचे ग्राहक असाल तर बँकेने एक महत्वाची सूचना जारी केली आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना वेळोवेळी अलर्ट जारी करत असते, अशातच, आता HDFC बँकेने आपल्या ग्राहकांसाठी फसवणूक अलर्ट (HDFC Bank Fraud Alert) जारी केला आहे.

काही काळापासून एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना पॅन कार्ड अपडेट, केवायसी इत्यादी नावाने विविध प्रकारचे संदेश पाठवले जात आहेत. आता बँकेने या मेसेजवर आपली प्रतिक्रिया दिली असून हे सर्व फेक मेसेज असल्याचे म्हटले आहे. ग्राहकांनी अशा संदेशांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे.

बँकेने ग्राहकांना सांगितले आहे की, एचडीएफसी बँकेच्या नावाने आलेल्या मेसेजमध्ये ग्राहकांना सांगितले जात आहे की, ‘जर त्यांनी शक्य तितक्या लवकर त्यांच्या बँक खात्यात पॅन कार्डची माहिती अपडेट केली नाही, तर त्यांचे बँक खाते निलंबित केले जाईल. यासोबतच ग्राहकांना केवायसी अपडेट करण्यासही सांगण्यात येत आहे. यासोबतच ग्राहकांना एक लिंकही पाठवण्यात आली असून त्यावर क्लिक करून त्यांना सर्व माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारचे मेसेज येत असतील तर लगेच सावध व्हा.’ एचडीएफसी बँकेने असेही सांगितले आहे की जर कोणी या लिंकवर क्लिक केले तर त्याचा फोन हॅक केला जाईल आणि त्याचे बँक खाते रिकामे केले जाईल.

सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

अशा सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी HDFC बँकेने आपल्या ग्राहकांना काही टिप्स दिल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला असेल तर प्रथम अशा मेसेजवर पाठवलेल्या लिंकची डोमेन लिंक काय आहे ते तपासा. जर त्याचा स्रोत तुम्हाला योग्य वाटत नसेल तर अशा लिंकवर क्लिक करणे टाळा. जर तुम्ही येथे क्लिक केले असेल तर चुकूनही तुमचे वैयक्तिक तपशील शेअर करू नका.

‘या’ टिप्सद्वारे सायबर गुन्हे टाळा :-

-याशिवाय पाठवलेल्या लिंकची URL काळजीपूर्वक तपासा.
-तुमचा नेट बँकिंग वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड फक्त अधिकृत पेजवर भरा.
-तुम्ही तुमची नेट बँकिंग माहिती ज्या पेजवर टाकत आहात त्या पेजवर https:// असणे आवश्यक आहे. यामध्ये s म्हणजे सुरक्षित. जर ते https:// ने सुरू होत नसेल तर माहिती प्रविष्ट करण्यापूर्वी सावध रहा.
-कॉल किंवा मेसेजवर तुमची वैयक्तिक माहिती उघड करण्यापूर्वी, तुमच्या विनंतीनुसार कॉल किंवा मेसेज केला जात आहे का ते तपासा. टोल फ्री नंबरवर कॉल करण्यापूर्वी, अधिकृत वेबसाइटवर नंबर तपासा.
-तुमच्या संगणकावरील अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करत रहा.
-तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड आणि बँक खाते स्टेटमेंट नेहमी तपासत राहा.
-लक्षात ठेवा की बँक तुम्हाला ईमेल किंवा मेसेजद्वारे पॅन आधार माहिती अपडेट करण्याचा सल्ला देत नाही.
-तुम्हाला कोणताही कॉल किंवा मेसेज संशयास्पद वाटत असल्यास, ताबडतोब बँकेला कॉल करा आणि क्रॉस व्हेरिफाय करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe