Kidney Stone diet : कधीकधी किडनी स्टोनच्या (Kidney Stone) समस्येने त्रस्त असणाऱ्या रुग्णाला वेदना सहन करणे अशक्य होते. किडनी स्टोन हा असा आजार आहे, जो वारंवार होतो.
आज 50% टक्के रुग्ण असे आहेत की, त्यांना एकदा किडनी स्टोनची समस्या (Problem) कमी झाली तर त्याचा पुन्हा त्रास होतो. त्यासाठी योग्य ती खबरदारी (Care) घेणे फार महत्वाचे आहे, अन्नाच्या बाबत काही नियम पाळणे गरजेचे आहे.
किडनी स्टोन म्हणजे काय?
किडनी स्टोन म्हणजे काय? खरं तर, जेव्हा आपल्या पोटात ऑक्सलेट, कॅल्शियमसारखे क्रिस्टल्स (Oxalate, calcium crystals) जमा होतात, तेव्हा एक ढेकूळ सारखी रचना तयार होऊ लागते,ती अगदी खड्यासारखी दिसते.
ज्याला किडनी स्टोन म्हणतात. किडनी स्टोनची समस्या मुख्यतः मूत्रपिंडात (Kidney) उद्भवते, म्हणून त्याला किडनी स्टोन म्हणतात.
तज्ञ काय म्हणतात
सुप्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या मते, स्टोन असल्यास दारू अजिबात पिऊ नये. याशिवाय काजू खाणे टाळा, कारण ते किडनी स्टोन वाढण्यास मदत करतात. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की जे लोक किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी अंडी, मांस, मासे टाळावेत(Avoid fish).
किडनी स्टोन असताना काय खावे?