श्रीगोंद्याचे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त होत आहे. मागील २०१४च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना असे चारही पक्ष स्वतंत्र लढले असताना केवळ श्रीगोंद्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची पडद्याआड आघाडी होती.
काँग्रेसच्या राहुल जगतापांना राष्ट्रवादीच्या तिकिटावर शरद पवार, शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगतापांनी एकत्र येऊन उभे केले होते. पण या वेळी राहुल जगतापांनी ऐनवेळी माघार घेतली. पण, पक्षाने त्यांना माघार घ्यायला लावली की त्यांनी स्वतःहून घेतली, याच्या उलटसुलट चर्चा आता जिल्ह्यात आहे.