बँकेच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रकारचा पैशांच्या बाबतीत व्यवहार करतो तेव्हा आपल्याला बँकेचे नियम पाळणे खूप गरजेचे असते. कारण प्रत्येक व्यवहाराच्या बाबतीत बँकांनी म्हणजेच प्रामुख्याने रिझर्व बँक ऑफ इंडियाने प्रत्येक बँकांना काही नियम ग्राहकांसाठी घालून दिले असून ते नियम ग्राहकांना पाळणे खूप गरजेचे असते.
यामध्ये एखादी छोटीशी चूक देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास देऊन जाऊ शकते. अगदी हीच बाब चेकच्या माध्यमातून व्यवहार करण्याला देखील लागू होते. आजकाल बरेच व्यक्ती चेकच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार करत असतात.
परंतु चेकद्वारे जे काही व्यवहार केले जातात त्यासंबंधी देखील अनेक प्रकारचे नियम आहेत व त्या नियमांचे पालन करणे तितकेच गरजेचे असते. चेकच्या माध्यमातून व्यवहार करताना एखादी छोटी चूक आपल्याकडून घडली तरी ते आपल्याला खूप महाग पडू शकते.
इतकेच नाहीतर यामुळे तुरुंगाची हवा देखील आपल्याला खावी लागू शकते. त्यामुळे चेकच्या माध्यमातून व्यवहार करताना किंवा एखाद्याला पेमेंट करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे चेकने व्यवहार करताना कोणत्या गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष ठेवावे? याबद्दलची माहिती बघणार आहोत.
चेकने व्यवहार करा परंतु या गोष्टींवर लक्ष ठेवा
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला चेक देतो तेव्हा त्या चेकवर संपूर्ण तपशील अचूकपणे भरणे गरजेचे आहे. चेक लिहिताना त्यामध्ये काही गोष्टी पाळणे खूप गरजेचे असते. जसे की तुम्ही जेव्हा चेक मध्ये संपूर्ण रक्कम शब्दांमध्ये लिहितात. ती रक्कम लिहिल्यानंतर फक्त हा शब्द लिहिणे खूप गरजेचे आहे. नाहीतर यामध्ये देखील तुमची फसवणूक होऊ शकते.
2- तसेच चेकचा प्रकार व्यवस्थित नमूद करणे देखील गरजेचे आहे. जसे की संबंधित खातेदार धनादेश असो की बेअरर चेक. तसेच त्यावर कोणती तारीख लिहिली आहे? हे देखील माहिती चेकवर स्पष्टपणे असणे गरजेचे आहे.
3- तसेच सही करताना व्यवस्थितपणे सही करावी जेणेकरून तो बाउन्स होणार नाही. कारण बँकेच्या नोंदणीमध्ये तुमची जी सही आहे त्या सहीशी चेक वरील सही जुळणे खूप गरजेचे असते.
गरज असेल तर चेकच्या उलट बाजूस स्वाक्षरी करावी. जेणेकरून बँकेच्या अधिकाऱ्याला स्वाक्षरी जुळवणे सोपे जाते.
4- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चेक लिहिताना अशा पेनाचा वापर करावा की जेणेकरून चेकवर लिहिलेली माहिती पुसली जाणार नाही.
जर चेकवरील माहिती पुसली गेली तर तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही केवळ प्रिंटेड धनादेश स्वीकारत आहात.
5- सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याला चेक देतात किंवा चेक जारी करतात त्या अगोदर तुम्ही चेकवर लिहिलेली रकमेइतकी तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक आहे का याची खात्री करा. जर तुम्ही चेक दिला
व तेवढी रक्कम जर तुमच्या खात्यामध्ये नसेल तर तुमचा चेक बाउन्स होऊ शकतो व चेक बाउन्स झाल्यास तुम्हाला दंड देखील होऊ शकतो व या व्यतिरिक्त तुम्हाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो.
त्यामुळे चेकने व्यवहार करताना या छोट्या परंतु महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.