कर्जाच्या चक्रातून करा स्वतःची सुटका! समजून घ्या फ्लॅट लँडिंग आणि रेड्युसिंग इंटरेस्ट रेटमधील फरक; होईल फायदा

आज-काल जर आपण बघितले तर कर्ज घेण्याचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज आर्थिक गरजा भागवण्यासाठी घेतले जाते. जेव्हा आपण बँकेकडे कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा बँकेच्या त्याबाबतीत काही अटी व शर्ती असतात व त्या अटी व शर्तींच्या अधीन राहूनच बँक आपल्याला कर्ज देत असते.

Ajay Patil
Published:
bank loan

Type Of Interest Rate:- आज-काल जर आपण बघितले तर कर्ज घेण्याचा ट्रेंड हा मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व वेगवेगळ्या प्रकारचे कर्ज आर्थिक गरजा भागवण्यासाठी घेतले जाते. जेव्हा आपण बँकेकडे कर्ज घेण्यासाठी जातो तेव्हा बँकेच्या त्याबाबतीत काही अटी व शर्ती असतात व त्या अटी व शर्तींच्या अधीन राहूनच बँक आपल्याला कर्ज देत असते.

तसेच महत्त्वाचे म्हणजे आपण जे काही कर्ज घेतो त्यावर आपल्याला बँकेच्या माध्यमातून ठराविक असा व्याजदर आकारण्यात येतो व त्यानुसार आपल्याला त्या कर्जाची परतफेड करावी लागते. परंतु यामध्ये अशा काही गोष्ट असतात की त्या बँकेच्या माध्यमातून ग्राहकाला क्लियर केल्या जात नाही किंवा स्पष्टपणे सांगितले जात नाहीत.

कारण या अशा बाबी बँकेच्या फायद्याच्या असतात व कर्ज घेणाऱ्याच्या मात्र आर्थिक दृष्टिकोनातून काही प्रमाणात यात नुकसान होत असते व लोन भरण्यामध्ये जास्त पैसा जातो व हा जास्त पैसा व्याजाच्या स्वरूपात जात राहतो.

आता कर्जावर करण्यात आलेले व्याजाच्या स्वरूपाचे जर प्रकार बघितले तर ते दोन प्रकार आहेत व त्यातील एक आहे फ्लॅट लँडिंग इंटरेस्ट आणि दुसरे म्हणजे रेड्युसिंग इंटरेस्ट रेट होय. या दोन्ही प्रकारांचा आपण घेतलेल्या कर्जावर खूप वेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो. त्यामुळे या दोन्ही संकल्पना मधील फरक समजून घेणे खूप गरजेचे असते.

कर्ज घेताना बँकांच्या व्याजदर यांचा तुलनात्मक अभ्यास करणे
जेव्हा आपण आपली आर्थिक निकड भागवण्यासाठी बँकेकडे जातो व कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा बँकांच्या माध्यमातून अनेक आकर्षक ऑफर्स आणि व्याजदर दाखवले जातात. या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्याचा उद्देश बँकांचा असतो.

परंतु अशा पद्धतीमध्ये ग्राहक म्हणून आपले देखील काम असते की याबाबत पूर्ण माहिती घेणे. जेणेकरून स्वतःचे आर्थिक नुकसान होणार नाही. समजा तुम्हाला जर दहा लाखाचे लोन घ्यायचे आहे व कोणती बँक किती व्याजदर देत आहे याचा आधी अभ्यास करणे खूप गरजेचे असते.

तुम्ही बँकेमध्ये गेलात आणि कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला त्या बँकेचे जे काही ठराविक व्याजदर असतात ते लागू होत असतात. समजा तुम्ही जर एखाद्या बँकेशी दहा लाख रुपये पर्सनल लोन साठी संपर्क केला

व तुम्हाला बँकेने 14 टक्के व्याजदराने कर्ज देण्याचा प्रस्ताव दिला तर तो प्रस्ताव न स्वीकारता तुम्ही इतर बँकांचे व्याजदर तपासले आणि ती तुलनात्मक माहिती संबंधित बँकेला दिली तर तुम्हाला 14% पेक्षा कमी दराने देखील लोन मिळू शकता.त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तुलनात्मक दृष्ट्या व्याजदरांची माहिती घेणे खूप गरजेचे असते.

फ्लॅट इंटरेस्ट रेट आणि रेड्युसिंग इंटरेस्ट रेट मधील फरक
जेव्हा तुम्ही कर्ज प्रक्रिया सुरू करता तेव्हा तुम्हाला देण्यात आलेला व्याजदर हा फ्लॅट रेट आहे की रिड्युसिंग याची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही कोणता निर्णय घ्यायचा हे दोघांमधील फरक पाहून ठरवावे. यामध्ये जर प्रमुख फरक पाहिला तर फ्लॅट रेट इंटरेस्ट मध्ये तुम्ही जो काही ईएमआय भरतात त्यात व्याजाची रक्कम कायम समान राहते.

या प्रकारात व्याज हे मूळ रकमेवर लागू होते व त्यामुळे तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतात. परंतु रिड्युसिंग इंटरेस्ट रेटमध्ये तुम्ही जेव्हा कर्जाचा हप्ता भरतात तेव्हा हप्ता भरल्यानंतर जी काही शिल्लक रक्कम तुमची राहत असते त्यावरच व्याज आकारले जाते.

म्हणजे तुमची कर्जाची मूळ रक्कम हप्ता भरल्यानंतर जशी जशी कमी होत जाते तशी तशी व्याजाची रक्कम देखील कमी होत जाते व त्यामुळे रिड्युसिंग इंटरेस्ट रेट हा प्रकार तुम्ही निवडला तर तो तुम्हाला फायद्याचा ठरतो.

त्यामुळे तुम्हाला जास्त व्याज भरावे लागत नाही. जर बँकेने तुम्हाला दहा टक्के किंवा 14% व्याजदर सांगितला आणि तुम्ही तर फ्लॅट रेट निवडला तर यामध्ये व्याजाचा दर 17% पर्यंत देखील जाऊ शकतो.

तुम्हाला जास्तीची तीन टक्के रक्कम भरावी लागू शकते. यामध्ये जर मोठ्या रकमेचे लोन असेल तर मात्र ते खूप महागडे ठरू शकते. त्यामुळे व्याजदराचा प्रकार निवडताना तो जर तुम्ही रिड्युसिंग इंटरेस्ट रेटचा निवडावा. जेणेकरून तुमचे कर्जाची रक्कम प्रत्येक हप्ता भरल्यानंतर कमी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe