PF Calculation:- सरकारी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी असो की खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे त्यामधील बरेच कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओचे सदस्य आहेत व आपल्याला माहित आहे की अशा कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे जमा होत असतात.
त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मिळणाऱ्या पगारातून योगदान तर असतेच व नियोक्ता देखील प्रत्येक महिन्याला काही योगदान या खात्यामध्ये जमा करत असते. अशा पद्धतीने तुमच्याकडे देखील या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे खाते असेल तर तुम्ही तुमच्या सेवानिवृत्तीपर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी यामध्ये जमा करू शकतात.
तुम्हाला यामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. जसे की तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून कधीही पैसे काढले नाही तर याचा खूप मोठा फायदा होतो व तुम्ही सेवानिवृत्तीपर्यंत करोडो रुपये जमा करू शकतात.
परंतु आर्थिक अडचणी वेळी जर तुम्ही पैसे काढत असाल तर तुमच्या मासिक पगारातून तुमच्या पीएफ खात्यामध्ये जमा होणारे योगदान वाढवणे गरजेचे राहिल.जेणेकरून तुमच्या पीएफ खात्यामध्ये कोट्यावधी रुपये जमा होऊ शकतील.
पन्नास हजार पगारावर कसे जमा होतील दोन कोटी?
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार व मिळणारा महागाई भत्ता या सह जर त्याला एकूण महिन्याचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर हे शक्य होऊ शकते. समजा तुमचे वय आता तीस वर्षे आहे व तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या पीएफ खात्यात 12 टक्के योगदान देत आहात व सरकार त्यावर आठ टक्क्यांचे व्याज देत असेल
व तुमचा पगार जर वार्षिक आधारावर पाच टक्क्यांनी वाढत असेल तर तुम्ही सेवानिवृत्ती पर्यंत दोन कोटी 56 लाख 46 हजार 997 रुपये या खात्यामध्ये जमा करू शकता व निवृत्तीनंतर ही रक्कम तुम्हाला मिळू शकते. कोणतीही कंपनी म्हणजेच नियोक्ता त्याच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये कर्मचाऱ्यांनी त्याच्या पगारातून जितकी रक्कम जमा करेल तितकीच रकमेचे योगदान देत असतो.
सध्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये पगाराच्या 12% योगदान दिले जाते व तितकेच योगदान नियोक्ता देखील देत असतो. तुम्ही हे योगदान वाढवू शकतात. सरकारच्या माध्यमातून पीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर वार्षिक 8.25 टक्के इतके व्याज दिले जाते.
कर्मचाऱ्याला पेन्शन कधी मिळते?
ईपीएफओ कर्मचाऱ्यांना ते निवृत्त झाल्यानंतर पेन्शनचा लाभ देखील मिळतो. जर आपण याबाबतचा नियम बघितला तर कोणत्याही कर्मचाऱ्यांनी जर दहा वर्षे काम केले तर त्याला पेन्शन मिळू शकते. 58 वर्षे वयापर्यंत पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शनचा लाभ मिळतो.
यामध्ये जर आपण नियम बघितला तर नऊ वर्ष आणि सहा महिन्याची सेवा देखील दहा वर्षात गणली जाते. या खात्यामध्ये कर्मचाऱ्यांचा संपूर्ण हिस्सा हा जमा होतो तर नियोक्त्याचा 8.33 टक्के हिस्सा कर्मचारी पेन्शन योजनेत जातो आणि 3.67% दरमहा ईपीएफ योगदानामध्ये जातो.