कितीही पैसा कमावला आणि ‘या’ 3 गोष्टी केल्या नाहीत तर आयुष्य अडचणीत येईल! घ्या काळजी

आयुष्यामध्ये पैसा कमावणे किंवा पैसा मिळवणे हे पाहिजे तितके सोपे देखील नसते व कष्ट केले तर कठीण देखील नसते. त्यामुळे प्रत्येकजण नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात पैसे कमावत असतात. परंतु तुम्ही किती पैसा कमावला परंतु त्या पैशांचे मॅनेजमेंट करणे मात्र कठीण काम आहे.

Ajay Patil
Published:
finacial management

Financial Management Tips:- आयुष्यामध्ये पैसा कमावणे किंवा पैसा मिळवणे हे पाहिजे तितके सोपे देखील नसते व कष्ट केले तर कठीण देखील नसते. त्यामुळे प्रत्येकजण नोकरी किंवा व्यवसायाच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात पैसे कमावत असतात. परंतु तुम्ही किती पैसा कमावला परंतु त्या पैशांचे मॅनेजमेंट करणे मात्र कठीण काम आहे.

आपण बघतो की आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमावतात आणि योग्यरीत्या त्याचे मॅनेजमेंट करत नसल्यामुळे पैशांची अडचण कायमच दिसून येते व हा अनुभव आपल्यापैकी कित्येक जणांना आला असेल. इतका मोठ्या प्रमाणावर खर्च होतो की पगार खात्यात जमा झाल्यानंतर पुढच्या महिना येत नाही तोपर्यंत खाते पूर्णपणे रिकामे झालेले असते.

अशामुळे पैशांचे मॅनेजमेंट केले नाही तर भविष्य सुरक्षित करण्यासाठी बचत राहत नाही आणि कुटुंबाचे रक्षण करण्याची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून देखील पैशांची बचत नसल्याने समस्या निर्माण होऊ शकतात.

अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अचानक काही अडचण निर्माण होते आणि पैशांची गरज भासते तेव्हा मात्र खूप मोठी समस्या निर्माण होते व तेव्हा पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर येते.

त्यामुळे अशा पद्धतीची वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते अशा गोष्टींची काळजी जर तुम्ही घेतली तर भविष्यामध्ये मोठा बँक बॅलन्स तुमच्याकडे असेल व अवघड अशा आर्थिक समस्यांचा सामना करण्याची क्षमता देखील तुमच्यात निर्माण होईल.

या तीन गोष्टींवर लक्ष ठेवा आणि आयुष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवा

1- आपत्कालीन निधी तयार करा- यामध्ये सर्वात पहिले तुम्ही तुमच्या पगारातून आपत्कालीन निधी तयार करणे गरजेचे आहे. हातातून नोकरी जाणे किंवा व्यवसाय बंद पडणे किंवा कुटुंबात कोणतीही मोठी आर्थिक समस्या उद्भवणे अशा प्रसंगी तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत आपत्कालीन निधी खूप उपयुक्त ठरतो.

जर तुम्ही आपत्कालीन निधी तयार केलेला असेल तर तुम्ही कठीण काळात देखील चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतात. याबाबत आर्थिक तज्ञांचे म्हणणे आहे की कोणत्याही व्यक्तीने त्याच्या सहा महिन्याच्या उत्पन्न एवढी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून ठेवावी.

2- पगाराच्या 20% रकमेची गुंतवणूक करा- दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 20% बचत करून त्यात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. आर्थिक नियमानुसार बघितले तर तुमच्या पगाराच्या किमान 20% गुंतवणूक करावी.

समजा तुम्ही जर 20 हजार रुपये महिन्याला कमावत असाल तर तुम्ही सर्व प्रकारे किमान 4000 रुपये वाचवावेत आणि त्यांची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी करावी.

कालांतराने जसजसे तुमचे उत्पन्न वाढत जाईल तसतसे 20% रक्कम तुम्ही वाढवत जाणे गरजेचे आहे व ही रक्कम एसआयपी, सोने तसेच आरडी, एफडी, पीपीएफ आणि एलआयसी सारख्या योजनांमध्ये गुंतवू शकतात.

3- हेल्थ इन्शुरन्स म्हणजेच आरोग्य विमा खरेदी करणे आवश्यक- तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे आरोग्य विमा खरेदी करणे होय. आज आपण बघतो की बरेच लोक आरोग्य विम्याला महत्त्व देत नाहीत. परंतु आरोग्य विमा तुमच्याकरिता आणि तुमच्या कुटुंबाकरिता खूप महत्त्वाचा आहे. कधी कोणत्या वेळी आरोग्य आणीबाणी उत्पन्न होईल याबद्दल कोणालाच काहीही सांगता येत नाही.

तसेच घरामध्ये जर तुमचे आई-वडील वृद्ध असतील तर त्यांना देखील या वयामध्ये वैद्यकीय सेवेची गरज असते. जर तुम्ही या परिस्थितीसाठी स्वतःला तयार केले नाही तर तुम्हाला भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अनेक व्यक्तींचे आपण बघतो की बचत केलेला सगळा पैसा उपचारांमध्ये खर्च होतो.

अशावेळी जर तुम्ही आरोग्य विमा खरेदी केलेला असेल तर तुमची बचत आहे ती तशीच राहते व आरोग्य विमा खरेदी करून तुम्ही वैद्यकीय परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी तयार होऊ शकतात व त्याकरिता आरोग्य विमा घेणे फायद्याचे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe