Unified Pension Scheme:- नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भातला वाद हा गेल्या कित्येक वर्षापासून सुरू असून याकरिता कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा आंदोलनाचे हत्यार देखील उपसण्यात आलेले होते. नवीन पेन्शन योजना ऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी ही केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची देखील मागणी आहे.
या सगळ्या प्रकारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच यूपीएस लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व ही नवीन पेन्शन योजना आता एक एप्रिल 2025 पासून लागू करण्याची केंद्र सरकारची तयारी आहे.
नेमकी ही योजना काय आहे किंवा या योजनेचे फायदे कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे होतील? याबद्दल मात्र बरेच कर्मचारी अजून देखील अनभिज्ञ असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे या लेखामध्ये युनिफाईड पेन्शन स्कीम बद्दल ठळक मुद्द्यांच्या माध्यमातून आपण महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात यूपीएस बद्दल महत्वाची माहिती
1- सगळ्यात महत्वाचे म्हणजे युनिफाईड पेन्शन योजनेचा फायदा हा ज्या कर्मचाऱ्यांनी 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ नोकरी केलेली आहे अशा कर्मचाऱ्यांना खास करून होणार असून असे कर्मचारी जेव्हा निवृत्त होतील तेव्हा त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये त्यांच्या शेवटच्या बारा महिन्यातील सरासरी पगाराची 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे.
2- समजा ज्या कर्मचाऱ्यांनी 25 वर्षापेक्षा कमी कालावधी करिता सेवा दिली असेल अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या हिशोबाने पेन्शन मिळणार आहे व या पेन्शन योजनेचा फायदा घेण्यासाठी कमीत कमी दहा वर्ष काम करणे आवश्यक असणार आहे.
3- युनिफाईड पेन्शन योजनेच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे योगदान वाढवले असून ते आता 18.5 टक्के इतका असणार आहे. जे अगोदर 14% होते.
4- तसेच या योजनेच्या माध्यमातून आता कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या फॅमिली म्हणजेच कौटुंबिक पेन्शनमध्ये देखील फायदा होणार असल्याचे चित्र आहे. नोकरीच्या दरम्यान किंवा निवृत्ती घेतल्यानंतर दुर्दैवाने एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पतीला पेन्शन देण्यात येणार असून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या एकूण पेन्शन मधील 60 टक्के पेन्शन त्यांच्या जोडीदाराला मिळणार आहे.
5- या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने कमीत कमी म्हणजेच किमान पेन्शनची हमी दिली असून दहा वर्ष कर्मचारी काम करतील त्यांना देखील निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला कमीत कमी दहा हजार रुपयांच्या पेन्शन मिळणार आहे.
6- तसेच महागाई निर्देशांकाचा देखील कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून महागाई मध्ये जर वाढ झाली तर निवृत्त कर्मचारी व फॅमिली पेन्शनचा लाभ घेणाऱ्या लोकांना देखील जास्त पेन्शन मिळणार आहे. तसेच युनिफाईड पेन्शन स्कीनुसार महागाई भत्ता देखील मिळणार आहे.
7- जेव्हा कर्मचारी सेवानिवृत्त होतील तेव्हा यूपीएस अंतर्गत ग्रॅज्युएटी तर मिळेलच
परंतु त्यासोबतच कर्मचाऱ्यांना एकरकमी रक्कम देखील देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक सहा महिन्याच्या सेवेसाठी कर्मचाऱ्याला त्याचा शेवटचा मासिक पगार म्हणजेच मूळ पगार दिला जाईल व त्यासोबतच सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेला आणि दहा टक्के महागाईभत्ता देखील दिला जाईल.
8- सध्या नॅशनल पेन्शन स्कीमचा लाभ घेणारे जे कर्मचारी आहेत त्यांना यूपीएस योजनेनुसार पेन्शनचा लाभ मिळणार असून यामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे.
2004 मध्ये एनपीएस लागू करण्यात आलेली होती व तेव्हापासून ते 31 मार्च 2024 पर्यंत जे कर्मचारी सेवेतून निवृत्त होतील त्या सर्वांना यूपीएस नुसार पेन्शन सुविधेचा फायदा मिळणार आहे. तसेच केंद्र सरकारची ही योजना राज्य सरकार देखील लागू करेल.
9- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एनपीएस किंवा यूपीएस या दोन्ही पेन्शन योजना पैकी कर्मचाऱ्यांना एकाच पेन्शन योजनेची निवड करणे गरजेचे राहील.