नव्या मूर्तीपुढे विराजमान होईल रामलल्लाची जुनी मूर्ती

Ayodhya News

Ayodhya News : नव्या मंदिरात रामलल्लाची काळ्या ‘पाषाणातील नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर आतापर्यंत पुजण्यात येत असलेल्या जुन्या मूर्तीचे काय होईल, असा प्रश्‍न उपस्थित होत होता. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्‍वस्त गोविंद देव गिरी यांनी या प्रश्‍नाचे उत्तर देत जुनी मूर्ती नव्या मूर्तीच्या पुढे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. रामलल्लाची मूळ मूर्ती धातूची असून, ती अवघ्या अर्ध्या … Read more

Horoscope Today : 22 जानेवारीचे राशिभविष्य..! कसा असेल तुमचा आजचा दिवस?, जाणून घ्या एका क्लिकवर !

Horoscope Today

Horoscope Today : ज्योतिषशास्त्रात 12 राशींचे वर्णन केले आहे जे 9 पैकी एक किंवा दुसऱ्या ग्रहाशी संबंधित आहेत. त्या-त्या राशीच्या लोकांचे जीवन ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीनुसार चालते. एखाद्या व्यक्तीची कुंडली पाहायची असेल, तर ग्रहांच्या स्थितीनुसारच त्याचे मूल्यमापन केले जाते, आज सोमवार 22 जानेवारी ग्रहांच्या स्थितीनुसार तुमचे राशीभविष्य काय सांगते चला पाहूया…. मेष कुटुंबात धार्मिक कार्य … Read more

Mangal Gochar 2024 : कुंभ राशीत मंगळाचे संक्रमण, ‘या’ 4 राशींचे उघडेल भाग्य !

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा ग्रहांचा सेनापती मानला जातो. मंगळ ग्रह ऊर्जा, शक्ती, यश, शौर्य, शौर्य, धैर्य, जमीन, भाऊ इत्यादींचा कारक मानला जातो. म्हणूनच जेव्हा मंगळाचे संक्रमण होते तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही दिसून येतो. मंगळ हा मेष आणि वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह आहे. मार्चमध्ये मंगळ मकर राशीतून बाहेर पडून कुंभ … Read more

Ahmednagar News : मनोज जरांगेसह ५ लाख मराठ्यांना सुपे येथे जेवण ! लापशी पुलावाचा बेत, हजारो स्वयंसेवकांसह डॉक्टरांचीही फौज तैनात

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघाली आहे. काल (२१ जानेवारी) ही पदयात्रा अहमदनगरमध्ये दाखल झाली. बारबाभळी येथिल मदरसा येथे मुक्काम झाला. त्यानंतर आज सोमवारी (२२ जानेवारी) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही पदयात्रा सुपे येथे पोहोचेल. तेथे जवळपास पाच लाख मराठा समाजासाठी जेवणाची जय्यत तयारी सुरु आहे. सरदार शाबुसिंग … Read more

Ahmednagar News : मुंबई कशासाठी, नातवंडासाठी..आमच्या नशिबातील ऊसतोडणी त्यांना नको ! पायाला फोड आले तरी चालणार,पदयात्रेतील सहभागी थकलेल्या आजोबाची कहाणी..!

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीचे व त्यासाठी सुरु असणाऱ्या आंदोलनाचे लोन आता ग्रामीण भागातही पसरले आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधवांची पदयात्रा मुंबईकडे रवाना झाली आहे. यामध्ये लाखो लोक सहभागी आहेत. यामध्ये वयोवृद्धही समाविष्ठ आहेत. मोर्चात सहभागी एक ६५ वर्षीय आजोबा पाथर्डीत आल्यानंतर थकून एका झाडाखाली झोपलेले होते. त्यांना याबाबत विचारणा करताच त्यांनी … Read more

अकोले शहरात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले अकोले शहरातील कोल्हार- घोटी रोडलगत असलेल्या वसंत मार्केटमध्ये बिबट्या शिरल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने नाशिक येथील रेस्क्यू टीमला पाचारण करून तब्बल सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम यांच्या नेतृत्वाखाली वनविभाग व पोलिसांचे पथक बिबट्याच्या मागे गेले. त्यांनी … Read more

राज्य शासनाकडून आतापर्यंत १ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप

Maharashtra News

Maharashtra News : मुंबई मराठा-कुणबी, कु णबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी न्या. संदीप शिंदे समितीस राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी आढळून आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र, शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत संदीप शिंदे यांच्या समितीने काम सुरू केल्यापासून राज्यात १ लाख ४७ हजार कुणबी प्रमाणपत्रे … Read more

अयोध्येतील ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगणित करावा : धनश्री विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : आज अयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपल्या गावामध्ये वेगवेगळे उपक्रम व आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करून या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा ऐतिहासिक कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा. राम नामाचा जयघोष करण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांनी नियोजन करावे. असे आवाहन रणरागिणी मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांनी केले. … Read more

संत ज्ञानेश्वर मंदिर विकासासाठी हजार कोटींचा आराखडा तयार करा

Ahmednagar News

Ahmednagar News : ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर विकास कामांना गती देण्याचा माझा प्रयत्न असून तीर्थक्षेत्र विकास झाला तर व्यवसाय वृद्धी होईल. इतरांना कामे मिळतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सातशे ते हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करा, अशा सूचना महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. येथील … Read more

Ahmednagar News : अपघातात जखमी युवकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अजिंक्य आदीनाथ वाणी या तरुणाचा उपचारादरम्यान काल रविवारी सकाळी मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील कणगर, चिंचविहिरे, ताहाराबाद, राहुरी कारखाना, देवळाली प्रवरा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याने सातत्याने अपघात घडत असतात. गेल्या शनिवारी सायंकाळी चिंचविहिरे रोडवर श्रीराम … Read more

कुटूंब मेहंदीच्या कार्यक्रमास गेले अन् चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज केला लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेल्याने पाळत ठेऊन बंद घराचा दरवाजा कटरने तोडून घरातील ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवारात घडली. या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मारुती बाबुराव लाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी … Read more

प्रसंगी गोळ्या झेलू परंतू आता माघार नाही : जरांगे

Ahmednagar News

Ahmednagar News : मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची खरी अडचण आहे. साठ ते सत्तर वर्षे वेळ होता तेव्हा का आरक्षण दिले नाही, ७ महिन्यांचा वेळ दिला, आता लढाई आरपारची आहे. गोळ्या झेलण्याची वेळ आली तरी चालेल. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केला तर हे आंदोलन असेच ताकदीने … Read more

Ahmednagar News : ‘सत्तेची मस्ती उतरवण्याची जबाबदारी मराठा समाजावर सोडा’, मनोज जरांगे पाटलांचे अहमदनगरमध्ये भव्य स्वागत, लाखो समर्थक, जेसीबीतून पुष्पवृष्टी

Ahmednagar News

Ahmednagar News :  मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा समर्थकांनी काल अहमदनगरमध्ये प्रवेश केला. त्यांनी यावेळी मोठी गर्जना केली. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची मोठी अडचण आहे. ६० ते ७० वर्षे आरक्षण दिले नाही. आता सात महिन्यांचा वेळ दिला आहे, तरी निर्णय होत नाही. त्यामुळे आता आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू … Read more

Ahmednagar News : हृदयद्रावक ! ऊसतोडणी सुरु होती.. बिबट्याने ऊसतोड कामगाराच्या मुलीवर घेतली झेप,पोटचा गोळा गेला

बिबट्याची सध्या जिल्हाभर विविध तालुक्यांमध्ये दहशत दिसते. आता एक हृदय द्रावक घटना समोर आली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील अजनुज गावच्या शिवारात ऊस तोडणी सुरू असतांना बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ऊसतोडणी कामगाराची तीन वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. लक्ष्मी गायकवाड (३ वर्षे) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या बालिकेचे नाव आहे. … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असंघटित कामगार सेलच्या सरचिटणीसपदी महेश गवई

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (असंघटित कामगार विभाग सेलच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी जितेंद्र आव्हाड युवा मंच चे महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री महेश गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे या निवडीचे पत्र श्री प्रदेशाध्यक्ष विलास भाऊ बडवाईक यांनी दिले. असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते ही निवड करण्यात आली … Read more

गुंतवणूकदार होणार मालामाल ! देशातील ‘ही’ स्मॉल फायनान्स बँक एफडी साठी देतेय 9.6% व्याजदर, पहा एफडीसाठी सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी

Bank FD Rate : जर तुम्हीही एफडी करण्याचा विचारात असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी घेऊन आलो आहोत. खरे तर भारतात गुंतवणुकीला खूप महत्त्व आहे. देशात गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये बँकेची एफडी योजना देखील एक लोकप्रिय प्रकार आहे. एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना अलीकडे बँकांच्या माध्यमातून चांगले व्याज पुरवले जात … Read more

गुड न्युज ! ‘या’ बँकेने वाढवलेत FD चे व्याजदर, आता गुंतवणूक करणाऱ्यांना मिळणार 8% व्याज

FD Interest Rate : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील पब्लिक सेक्टर मधील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांनी एफडी करणाऱ्यांना चांगले व्याजदर दिले आहे. यामुळे गुंतवणूकदार आता बँकेत एफडी करण्याला विशेष पसंती दाखवत आहेत. पब्लिक सेक्टर मधील अनेक बँकानी गेल्या काही महिन्यांच्या काळात एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे. या नवीन वर्षात देखील देशातील काही बड्या बँकांनी एफडीचे व्याजदर … Read more

70 हजाराचा खर्च आणि महिन्याला होणार 50 हजाराची कमाई, कोणता आहे ‘हा’ भन्नाट बिजनेस, वाचा सविस्तर माहिती

Small Business Idea : नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात मोठी कंपनी टाटा समूह आपल्या तीन हजार कर्मचाऱ्यांना नारळ देऊ शकते अशा आशयाचे वृत्त व्हायरल झाले होते. याबाबत अजून अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही मात्र हे वृत्त समोर येण्यापूर्वी अमेझॉन, फेसबुक, गुगल यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिलेला आहे. यामुळे टाटा देखील आपल्या कर्मचाऱ्यांना काढू … Read more