Xiaomi त्याच्या इलेक्ट्रिक कारवर जोमाने काम करत आहे, जाणून घ्या कधी होईल लाँन्च

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- Xiaomi ने आपल्या आर्थिक अहवालात सांगितले आहे की कंपनीच्या संशोधन आणि विकास (R&D) विभागात 13,919 कर्मचारी आहेत. यापैकी 500 कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक कार प्रकल्पावर काम करत आहेत. Xiaomi ने गेल्या ऑक्टोबरमध्ये पुष्टी केली होती की कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार 2024 च्या पहिल्या सहामाहीत लॉन्च केली जाईल.(Xiaomi Electric Car) … Read more

बाबा, तुम्ही बरोबर होता. तो चांगला माणूस नव्हता ! प्रेमविवाहानंतर 7 महिन्यातच उच्चशिक्षित तरुणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- एका 21 वर्षाच्या लॉ स्टूडंटने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे केरळच्या इदायापुरममधील ही घटना असून मोफिया परवीन दिलशाद असं या तरुणीचं नाव आहे. मोफियाने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं, की बाबा, तुम्ही बरोबर होता. तो चांगला माणूस नव्हता. सुसाईड नोटमध्ये तिने आपला पती मोहम्मद सुहैल, सासरे यूसुफ … Read more

‘या’ नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- कोपरगाव परिसरातील नदीपात्रात एक मृतदेह आढळून आल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच आता नेवासा शहरातील गणपती घाट प्रवरा नदी पात्रात महिलेचा मृतदेह पाण्यात आढळून आला आहे. नेवासा गणपती घाट प्रवरा नदी पात्रात काल सकाळी आशाबाई शिवाजी पाटील (वय ७०) वर्षीय महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांच्या लक्षात आले. … Read more

नवीन भारतीय स्मार्टफोन Micromax In Note 1 Pro 15 डिसेंबरला लॉन्च होऊ शकतो, Xiaomi-Realme ला मिळेल स्पर्धा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- मायक्रोमॅक्सने गेल्या वर्षी स्मार्टफोन बाजारात नवी सुरुवात केली. भारतीय जनतेने चिनी ब्रँड्सवर बहिष्कार टाकल्यानंतर, लोकांनी भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सवर विश्वास दाखवला होता आणि कंपनीने कमी किमतीचे मोबाइल फोन लॉन्च करून Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँडलाही आव्हान दिले होते.(Micromax In Note 1 Pro launch) त्याच वेळी, अशी बातमी येत आहे … Read more

Ahmednagar Corona Breaking : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज 74 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

OPPO ने लॉन्च केला कमी किमतीचा 5G फोन Reno 7SE, जाणून घ्या काय आहेत त्याची फीचर्स आणि किंमत

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- OPPO Reno 7 Series ने टेक प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला आहे. या मालिकेअंतर्गत तीन मोबाईल फोन लॉन्च केले गेले आहेत ज्यात Oppo Reno7 5G, Oppo Reno7 Pro 5G आणि Oppo Reno7 SE 5G यांचा समावेश आहे.(Oppo Reno7 SE 5G ) सध्या हे स्मार्टफोन्स ओप्पोने चिनी मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत, … Read more

भाड्याने केलेली गाडी चोरणारे जेरबंद! न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- भाड्याने केलेली गाडी प्रवासा दरम्यान चोरुन नंतर त्या गाडीची विक्री करणाऱ्या चार आरोपींना नेवासा पोलिसांनी जेरबंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मुंबईतील ड्रायव्हर दिपककुमार गुप्ता हे त्यांच्या ताब्यातील स्विप्ट कार घेवून मुंबई येथे असताना त्यांना जस्टडायल वरुन मुंबई ते औरंगाबाद भाडे आले. त्यांनी सायंकाळी ७ वाजता तीन … Read more

धक्कादायक : अल्पवयीन मुलावर शाळेच्या आवारातच केला अनैसर्गिक अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- सध्या देशातील विविध ठिकाणी रोज महिलांवर अत्याचार होत असल्याचे आपण पाहत आहोत. मात्र आता तर मुलांवर देखील अत्याचार केल्याच्या घटना समोर येत आहेत. जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या एका साडेसात वर्षीय अल्पवयीन मुलावर शाळेच्या आवारातच दुसऱ्या एका १६ वर्षीय मुलाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील … Read more

बिग ब्रेकींग : भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- नाशकातील भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या करण्यात आली आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष होते. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भजाप पदाधिकाऱ्यांची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांचा मृतदेह सातपूरच्या कार्बन नाका परिसरात सकाळी आढळून … Read more

नगर तालुक्यात धुमाकूळ घातलेल्या ‘त्या’ बिबट्याचा अपघाती मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- औरंगाबाद महामार्गावरील जेऊर शिवारात जरे वस्ती जवळ पहाटेच्या सुमारास एका बिबट्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या भागात रास्ता अपघातात बिबट्याचा मृत्यू होण्याची दुसरी घटना आहे. नगर तालुक्यातील जेऊर येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्या दर्शन देत होता. त्याने तीन शेळ्या, व एका कुत्र्याचा त्याने फडशाही … Read more

ओळखा पाहू आम्ही कोण?? बाजार समितीत लावलेल्या ‘त्या’ फलकाचीच चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात अनोखे आंदोलन पाहायला मिळाले. या फ्लेक्स बोर्डवर एक मजकूर होता त्याची चर्चा बाजार समितीच्या आवारात चांगली रंगली आहे. सध्या जिल्हा परिषद, बाजार समिती, सोसायट्यासह स्थानिक पातळीवरील विविध संस्थाच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार टीका टिप्पणी … Read more

Petrol-Diesel prices today: आजदेखील पेट्रोल डिझेलच्या किंमती जैसे थेच – वाचा कुठं काय आहेत दर

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग 22 व्या दिवशीही बदल झालेला नाही. शुक्रवार, 26 नोव्हेंबर 2021 रोजी देशातील तेल विपणन कंपन्यांनी तेलाच्या किमतीत कोणताही बदल केलेला नाही. 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीही … Read more

साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; साईप्रसादालय उघडणार!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शिर्डी येथील साईप्रसादालय उघडण्यासह शिर्डीकरांच्या विविध मागण्यांसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते दिंगबर कोते यांचे गेली सात दिवस आमरण उपोषण सुरु होते. परंतु काल जिल्हा प्रशासनाने समन्वय साधत संस्थानचे साईप्रसादालय उघडण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर हे उपोषण सोडण्यात आले. शिर्डी शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते कोते दि.१८ नोव्हेंबरपासून शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्तांच्या … Read more

त्याबाबत कंपनीने आठ दिवसांत निर्णय घ्यावा:जिल्हाधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- नगर ते मनमाड रेल्वे महामार्गाच्या शेजारून जाणाऱ्या इंडियन ऑइल कंपनीच्या पाईपलाईन कामास विरोध करत. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाला यश आले आहे. या प्रश्नाबाबत आठ दिवसात कंपनीने निर्णय घ्यावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये इंडियन … Read more

ही तर शेतकऱ्यांची अडवणूक : मात्र लोकप्रतिनिधी गप्प!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- ऐन रब्बी हंगामात पेरणी व लागवडी सुरू असताना महावितरण कंपनीने बेकायदेशीरपणे शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे रोहित्र बंद करून वीजपुरवठा खंडित करण्याचे काम जिल्हाभर सुरू केले आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करून पिकांचे प्रचंड नुकसान करण्याचे काम महावितरण कंपनी करत आहे, असे असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प का? असा सवाल … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : ‘त्या’ शेतकऱ्यांना थकबाकीत ५० टक्के सूट

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  राज्यातील वीजबिल थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी पंपाच्या वीजबिलाची थकबाकीची रक्कम एकरकमी शेतकऱ्यांनी भरली, तर या थकबाकीमध्ये ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नवीन कृषीपंपांसाठी कनेक्शन देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे. मंत्री … Read more

पेटवले पाचरट मात्र चार एकर उसाचा झाला कोळसा!

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- शेतातील ऊसाचा खोडवा पाचरट पेटवले होते. परंतु यात शेजारच्या दोन शेतकऱ्यांचा प्रत्येकी दोन एकर असा चार एकर ऊस जळला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील आंबी येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आंबी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शंकर मुरलीधर डुकरे यांच्या मालकीच्या शेतातील दोन एकर तर … Read more

टपाल विमा प्रतिनिधी पदासाठी ७ डिसेंबर रोजी थेट मुलाखती

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- टपाल विभागाच्या विविध विमा योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची थेट नेमणूक केली जाणार आहे. यासाठीच्या मुलाखती 7 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. अशी माहिती अहमदनगर विभाग डाकघरचे वरिष्ठ अधीक्षक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. किमान इयत्ता 12 वी पास असलेले, कोणत्याही कंपनीचे माजी विमा प्रतिनिधी , माजी जीवन … Read more