‘मातोश्री’ वरूनच ठरेल अहमदनगरचा महापौर

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या निधनानंतर अहमदनगर मधील शिवसेनेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवसेनेचा बुलंद आवाज अशी ओळख असलेले अनिल राठोड यांच्या निधनानंतर शिवसेनेचा आवाज कमी झाल्याचे बोलले जात आहे. याच धर्तीवर राठोड यांच्या निधनानंतर एकाकी पडलेले शिवसेनेचे नगर शहरातील नगरसेवक, पदाधिकारी शुक्रवारी जलसंपदा मंत्री शंकरराव गडाख यांच्या … Read more

जगतकल्याणाचे पसायदान मागणाऱ्या माऊलींच्या नेवाशात आता कोरोना पसायदान

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर माउलींनी पसायदान मागितलं. त्यांनी नेवाशात ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. आता नेवाशातूनच कोरोनमुक्तीचे पसायदान मागितले जात आहे. नेवासातील नारायण महाराज ससे यांनी माऊलींच्या पसायदानावर आधारित कोरोना मुक्तीचे पसायदान मागितलेले आहे. सध्या हे कोरोना मुक्ती पसायदान तालुक्यातील मंदिरांबाहेर भिंतीवर सर्वत्र चिकटविलेले दिसून येत आहे. यामधून सर्व जीवांनी विनाकारण घराबाहेर फिरू … Read more

कर्जत तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी; आ. रोहित पवार म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांनी पुढाकार घेत आपल्या मतदार संघामधील अनेक समस्या सोडवण्याचा धडाकाच लावलेला आहे. त्यांनी कर्जत तालुक्यामधील अनेक समस्यांचे वैयक्तिक लक्ष देत त्यांची सोडवणूक केली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न सुटले असून सुटलेल्या प्रश्नांची घोषणा होण्याची औपचारिकता राहिली असल्याची माहिती आ. पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली. कर्जत तालुका … Read more

चिंताजनक ! ‘ह्या’ तालुक्यात कोरोनाचा उद्रेक

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. तालुक्यात काल शनिवारी कोरोनाचा उद्रेक झाला. दिवसभरात सुमारे 63 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यात राहुरी शहरातही काल 37 जणांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे तालुक्यात बाधितांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ६३८ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर :आज ६३८ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २०५ संगमनेर ४२ राहाता ३२ पाथर्डी १२ नगर ग्रा. ४२ श्रीरामपूर ४३ कॅन्टोन्मेंट १० नेवासा ५३ श्रीगोंदा १९ पारनेर १२ अकोले १३ राहुरी २१ शेवगाव ३८ कोपरगाव ५३ जामखेड ०८ कर्जत १५ मिलिटरी हॉस्पीटल १८ इतर जिल्हा ०२ बरे झालेले एकूण रुग्ण:२१७१० आमच्या … Read more

वृद्धेवर अतिप्रसंग, ‘त्या’ तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील तिघांनी वृद्धेस मारहाण करून अतिप्रसंग केला. लक्ष्मीनगर येथील महिलेने फिर्यादीत म्हटले, शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास नितीन लाल्या भोसले (कोकमठाण) आमच्या घरी आला. त्याने सांगितले, तुझा मुलगा डोंगऱ्या शिवराम चव्हाण हा पांडू पाडील यांच्या शेतातील खड्ड्यात पिऊन पडला आहे. मुलाला पहाण्यासाठी गेले, परंतु तेथे तो नव्हता. … Read more

कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले 29 तबलिगी मायदेशी रवाना ; मंत्री थोरातांचे मानले आभार !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-   कोरोनामुळे वादग्रस्त ठरलेले तबलिगी जमातीचे २९ नागरिक मायदेशी परतले. जाताना त्यांनी मंत्री थोरात बाळासाहेब थोरात यांचे आभार मानले. नगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर हे नागरिक आढळून आले. अनेकांना तुरुंगात रहावे लागले. न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून नगर, जामखेड व नेवासे येथे इंडोनेशिया, फ्रान्स, मलेशिया, साऊथ आफ्रिका आदी … Read more

कोविड सेंटर राजकीय पक्षाने ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  नगर शहरात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून जम्बो कोविड सेंटर उभारले आहे. हॉटेल नटराजमध्ये सामाजिक संस्थांचे साहाय्य घेऊन मोठ्या सुविधा उभ्या केल्या, पण आता भाजपकडून सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. केवळ नावासाठी नटराज कोविड सेंटर राजकीय पक्षाने ताब्यात घेण्याचा प्रकार म्हणजे आयत्या बिळावर नागोबा आहे, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख … Read more

जिल्ह्यातील या माजी आमदाराला कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक नेते पदाधिकार्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या श्रीरामपुरातील संतलुक येथील कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आ. भाऊसाहेब कांबळे यांना ८ दिवसापूर्वी थोडासा त्रास वाटू लागल्याने … Read more

इकडे लोक मारतायत.. मात्र यांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप हा विषय नेहमीच चर्चेचा बनतो. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. ‘सरकारमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील लोकांचा केवळ पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्यावर कोरोनाचे एवढे मोठे संकट असताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सगळा वेळ … Read more

‘या’ मृत महिलेला न्याय मिळणार

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या संकटकाळात शहापूर (जि. ठाणे) येथील डॉ.विठ्ठलराव मनोहर बनसोडे यांनी कर्तव्यात कसूर केल्याने एका महिलेस जीव गमवावा लागला होता. सदर प्रकरणी चौकशी करुन डॉ.बनसोडे यांना निलंबीत करुन त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने वांजोळी (ता. नेवासा) येथे शिवारात आमरण उपोषण करण्यात आले होते. उपोषणाच्या पाचव्या दिवशी … Read more

या कारखान्यातील अधिकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू; कारखाना बंद!

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे जाळे दिवसेंदिवस विस्तृत होत आहे. तसेच रुग्णवाढीबरोबरच जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा देखील वाढतो आहे. श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या एका अधिकाऱ्याचा कोरोनामुळे उपचारादरम्यान, नगर येथे मृत्यु झाला. यापुर्वी सदर कारखान्याच्या विविध विभागाच्या दोन कामगारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खबरदारी म्हणुन पुढील काही … Read more

जिल्ह्यातील ‘या’ शिक्षकास मिळाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील एका शिक्षकाने नगरची मान उंचावेल असे काम केले आहे. जिल्ह्यातील गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे हस्ते … Read more

या ग्रामपंचायतींचा कारभार गेला प्रशासकांच्या हाती

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची मुदत ऑगस्ट महिन्यात संपली आहे. यामुळे तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गटविकास अधिकारी महेश डोके यांनी २३ ऑगस्ट रोजी काढले आहेत. नियुक्ती केलेल्या सर्व अधिका-यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुदत … Read more

आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन विद्यालयात राजळे यांच्या घशातील स्त्राव घेवुन चाचणी करण्यात आली. शनिवारी त्याचा अहवाल पाँझीटीव्ह आला आहे.  विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व आमदारांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्या नुसार शुक्रवारी ४ … Read more

पाय घसरला आणि त्याचा शेवट झाला

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एका तरुणाचा नदी पात्रात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. याबात समजलेली माहिती अशी कि. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील राजेंद्र काशिनाथ भोसले हा सकाळी प्रवरा नदी पात्रा जवळ गेला असता त्याचा पाय घसरून तो नदीमध्ये पडला. त्यानंतर त्याला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात कोरोना सुसाट

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- घरी राहा सुरक्षित राहा… विनाकरण फिरू नका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करून देखील जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसते आहे. कोपरगावात आज (दि.५) रॅपिड अँटिजेन किटद्वारे 101 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 33 जणांचे अहवाल बाधित तर 68 निगेटिव्ह आले आहेत. तर खासगी अहवालात १ असे एकूण ३५ व्यक्ती … Read more

महावितरणचा शेतकऱ्याला शॉक; डोळ्यादेखत झाले भासमसत

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- कोरोनाच्या काळात महावितरणच्या वाढीव वीजबिलाने नागरिक आधीच त्रस्त झालेले आहे. मात्र याच महावितरणाच्या चुकीमुळे राहुरी येथील शेतकऱ्याला मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. राहुरीमधील येवले आखाडा येथील शेतकरी सुरेश जगन्नाथ जाधव (रा. येवले आखाडा) यांच्या दोन एकर आडसाली ऊसाच्या प्लॉटला अचानक आग लागली. आगीची बातमी समजताच राहुरी पालिकेच्या अग्निशामक विभागाला कळवले, … Read more