खरीप पीक कर्जासंदर्भात मोठी बातमी; वाचा..

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- 2020-21 खरीप हंगाम पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटपाची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बँकचे चेअरमन सिताराम पाटील गायकर, व्हा.चेअरमन रामदास वाघ व ज्येष्ठ संचालक माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली. सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमधून कर्ज मागणी मोठ्या प्रमाणात आहे. … Read more

बिबटयाचा थरार ; शेळ्या-मेंढ्यांचा फडशा

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील भगवानगड पंचक्रोशीतील मालेवाडी गावामध्ये शिरलेल्या बिबटयाने धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली आहे. येथील शेतकर्‍यांच्या शेळ्या, मेंढ्या फस्त केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच बिबट्याने पवळागड वस्तीवर शेतकर्‍यांच्या घराबाहेर मुक्काम ठोकल्याने पवळागड वस्तीमधील शेतकर्‍यासह भगवानगड परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पुढील जिवितहानी होण्यापुर्वी वनविभागाने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६८१ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा २६९ संगमनेर ४५ राहाता ४७ पाथर्डी ०९ नगर ग्रा.४९ श्रीरामपूर २४ कॅन्टोन्मेंट १३ नेवासा १३ श्रीगोंदा ४० पारनेर १२ अकोले ५० राहुरी २५ शेवगाव १८ कोपरगाव २७ जामखेड २८ कर्जत ०४ मिलिटरी हॉस्पीटल ०४ इतर जिल्हा ०४ बरे झालेले एकूण रुग्ण:१८५५७ आमच्या … Read more

आनंदाची बातमी ! मुळा ‘ओव्हर’फ्लो

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. मुळाच्या पाणलोटातील भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पाण्याची आवक सुरु असल्याने अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढली. हे धरण आज सकाळी ओव्हरफ्लो होत असून नदीत पाणी सोडण्यात येणार … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘असा’ दिला जाणार बाप्पांना निरोप; केली’ही’व्यवस्था

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोरोनाची छाया यावेळी सर्वच धार्मिक सण – उत्सवावर पडली. शेकडो वर्षांची परंपरा असणारी पंढरीची वारी यावेळी रद्द करण्यात आली. तसेच अनेक धर्मातील अनेक सण-उत्सव हे अंत्यंत साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. गणेशोत्सवावरही याचे सावट आहे. नेहमी वाजत गाजत येणाऱ्या आणि तेवढ्याच धुमधडाक्यातील विसर्जन मिरवणुकीतून निरोप घेणाऱ्या गणरायाच्या उत्सवावरही यंदा … Read more

सततच्या पावसाने पिकांवर ‘असे’ संकट; करा ‘हे’ उपाय

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या शेतकरी अनेक संकटाशी झुंज देत आहे. आधी कोरोनामुळे खचलेला शेतकरी अतिवृष्टीने पिचला. निकृष्ट बियाणे, यावेळी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले. आता केसाळ अळींचे संकट ओढवले आहे. आता सततच्या पावसाने पिकांवर रोगराईसारखे संकट वाढले आहे. उसावरील तपकिरी ठिपके व तांभेरा रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जुलै ते डिसेंबर या कालावधीत आढळून … Read more

अधिकाऱ्यांनी केले ‘असे’काही की व्यापारी संतापले; केली ‘ही’ मागणी अन्यथा मार्केट बंद करणार

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- सध्या मूग व अन्य शेतमालाची आवक मार्केटमध्ये वाढत आहे. कामाचा व्याप वाढत असतानाही याठिकाणी सकाळी 9 ते 5 या वेळेतच ही कामे करण्याचा प्रयत्न केला जातो. पण मालाची आवक वाढल्यावर थोडा उशीर होतो. रविवारी असा उशीर झाल्यावर काही शासकीय अधिकार्‍यांनी तेथे येऊन व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली व कायद्याचे भरपूर … Read more

विखेंच्या शेतातील ‘त्या’ बिबट्याचा ड्रोनच्या सहाय्याने शोध; पण….

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- मागील शनिवारी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे त्यांच्या लोणीतील शेतावर त्या नातवांसोबत असताना अचानक त्यांच्यासमोर असणाऱ्या कुत्र्यावर हल्ला केला होता. व त्या त्यातून सुदैवाने बचावल्या होत्या. या घटनेमुळे सोमवारी वनाधिकार्‍यांनी ड्रोन कॅमेर्‍याच्या साह्याने उसाच्या शेतात बिबट्याचा शोध घेतला, परंतु तो आढळून आला नाही. खासदार डॉ. सुजय विखे पाटील … Read more

मुदत संपलेल्या ४५ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून शासकीय कर्मचारी

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील ३१ ऑगस्टला मुदत संपलेल्या ४५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतल्याने या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. शासकीय सेवतील कर्मचारी प्रशासकीय सरपंच बनले आहेत. बाभूळगाव – आर. डी. माने, चेडगाव – आर. एम. पाटील, चिंचाळे – व्ही. आर. मुळे, चिंचविहिरे – व्ही. … Read more

श्रीरामपूरमध्ये कोरोनाने घेतला ‘त्या’ समाजसेवकाचा बळी

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. काल श्रीरामपूर शहरातील एका समाजसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात मृतांचा आकडा 22 इतका झाला आहे. तालुक्यात नुकतीच ३ डॉक्टरांनाही कोरोनाची … Read more

‘ह्या’ कारणामुळे १४०० रुग्ण झाले कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- आयुर्वेदिक उपचारांची जोड मिळाल्याने १४०० रुग्ण कोरोनावर मात करू शकले. विशेष म्हणजे शासनाकडून कोणतेही अर्थसाहाय्य मिळाले नसताना नगरमधील वैद्यांनी उपचारांत सातत्य राखून महाराष्ट्रात सर्वाधिक चांगली कामगिरी केली. आयुष मंत्रालय, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे, नोडल ऑफिसर डॉ. बापूसाहेब गाढे, जिल्हा आयुष व … Read more

मी आणि रोहित पवार बरोबर असलो जिल्ह्यात कोणी विरोध करणार नाही – खासदार डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कर्जत येथील मुख्य रस्त्याला असणाऱ्या गाळे धारकांसाठी मी आणि आमदार रोहित पवार एकत्र येऊन गाळेधारक आणि रस्ता यामध्ये सुवर्णमध्य असा मार्ग काढू, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी गाळेधारकांच्या बैठकीत केले. कर्जत येथील मुख्य रस्त्यावरून अमरापूर-कर्जत-भिगवण हा राज्य मार्ग जाणार असल्याने कर्जत येथील मुख्य रस्त्यावरील गाळेधारकांचे गाळे विस्थापित … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ ठिकाणी बिबट्या मृतावस्थेत सापडला !

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कुंभारी कोंबडवाडी शिवारातील राजेश मारुती कदम यांच्या शेती गट नंबर ९३ मध्ये दीड वर्ष वयाची बिबट्या मादी शनिवारी रात्री साडेआठ वाजता मृत अवस्थेत आढळून आली. त्यांनी ही बाब दत्ता चिने यांना सांगितली. चिने यांनी कोपरगाव वन परिक्षेत्र अधिकारी यांना घटनेची माहिती दिली. वन अधिकारी आर. एन. सांगळे, … Read more

कांदा लागवडीस वेग, मजुरांची टंचाई

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोरोना माहामारी रोगाच्या संकटाला तोंड देत पाथर्डी तालुक्यातील मढी, धामनगाव, करडवाडी, घाटशिरस परिसरात खरीप हंगामातील लाल कांदा लागवडीस वेग आला असून, मजुरांची टंचाई जाणवत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर २० रुपयांपर्यंत गेल्याने यावर्षी देखील अनेक शेतकरी कांदा लागवडीकडे वळले आहेत. मढी येथे सुमारे २०० हेक्टर हून अधिक कांदा लागवड … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा खून; दोघांना अटक

अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे २८ ऑगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास पुंजा भागाजी नरोटे (६०, खडांगळी, तालुका सिन्नर) यांना लाकडी दांडके व लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली.  त्यांचा लोणी येथील प्रवरा रुग्णालयात ३० ऑगस्टला सायंकाळी मृत्यू झाला. कोपरगाव ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. मृताचा मुलगा सोमनाथ पुंजाजी नरोटे यांनी … Read more

शारीरिक तंदुरूस्ती ही काळाची गरज – बाबासाहेब चोरमले

संदीप घावटे, 31 ऑगस्ट 2020 :-  शारीरिक तंदुरूस्ती ही काळाची गरज आहे .या कोरोना संकटाच्या काळात प्रत्येकाने तंदुरुस्त रहावे असे प्रतिपादन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव बाबासाहेब चोरमले यांनी क्रीडा दिनी व्यक्त केले .शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने ऑनलाईन साजरा करण्यात आला .त्यावेळी ते बोलत होते . भारताचे श्रेष्ठ हॉकीपटू मेजर … Read more

ई-पासबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :- करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. मात्र, अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी राज्यात मिशन बिगिन अगेनची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारनंतर राज्य सरकारच्या नियमावलीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सरकारने ई-पासबाबद मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य सरकारने निमयावली जाहीर केली असून ३० सप्टेंबरपर्यंत निर्बंध कायम … Read more

ठाकरे सरकारही लागले पदवी परीक्षेच्या तयारी; घेतला महत्त्वाचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांचे डोळे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लागले होते. कोर्टाच्या आदेशानंतर सरकारही पदवी परीक्षेच्या तयारीला लागले आहे. या संदर्भात ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घेतल्या जातील अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. सरकार पदवी परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार करत … Read more