मुळा धरणामध्ये पाणीसाठा ९५ टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-  शनिवारी कोतूळकडून मुळा धरणात सुरू असलेली पाण्याची आवक पाहता रविवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मुळा धरणाचा पाणीसाठा २५ हजार दशलक्ष घनफुटाचा टप्पा गाठणार आहे. कोतूळ पाण्याची आवक टिकून राहिल्यास सोमवारी दुपारी मुळा धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या राहुरीच्या मुळा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वेतून पडल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2020 :-राहुरी | शुक्रवारी मध्यरात्री मनमाडकडून दौंडकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने ३५ वर्षीय महिला मरण पावली. तिची ओळख पटू शकली नाही. राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ओळख पटवण्यासाठी मृतदेह राखून ठेवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कपड्यांवरून ही महिला भिक्षा मागणारी असावी, असा येथील पोलिसांचा प्राथमिक अंदाज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८०.४० टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६३२ ने … Read more

वीस- बावीस वर्षात ऑगस्टमध्ये पाचव्यांदा ‘हे’ धरण भरणार

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- नगर जिल्ह्याची संजीवनी असलेल्या मुळा धरणाचा पाणीसाठा 24 हजार 418 दशलक्ष घनफुट इतका झाला आहे. मुळा धरण 94 टक्के भरले आहे. गेल्या वीस- बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये पाचव्यांदा भरण्याची शक्‍यता आहे. पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम केला असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पावसाच्या सरी कोसळत … Read more

आ. निलेश लंकेंनी केलं `या` धरणांचे जलपूजन

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  ऑगस्ट महिन्यात मांडओहोळ धरण व तिखोल धरण परिसरात धुव्वाधार पाऊस झाल्याने दोन्ही जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पारनेर तालुक्यासाठी हे प्रकल्प जलसंजीवनी ठरलेले आहेत लाभक्षेत्रातील शेतकऱ्यासह आमदार निलेश लंके यांनी धरणावर जाऊन जलपूजन केलं. यावर्षी वरूणराजाच्या कृपेने व माझ्या पायगुणाने समजा पारनेर तालुक्याची … Read more

रुग्णांची हेळसांड …कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने कोविड केअर सेंटर रखडले !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून नगर महापालिका हद्दीत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र,अद्यापही शहरातील कोरोनाची साखळी तुटलेली नाही. जिल्ह्यात सर्वांधिक कोरोना बाधित महापालिकाहद्दीत आहेत. यासाठी शहरातील पितळे जैन बोर्डींगसह जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग होस्टेलच्या इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. मात्र … Read more

भजन, पूजन करणा-या भाविकांवर गुन्हे; सरकारचा अजब कारभार

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे.. परंतु, गेले कित्येक दिवस मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राज्य सरकारकडून याची दखल घेतली जात नसल्याने सरकार विरोधात भाजपच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले होते. श्रीगोंदा येथे शनिवारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप आमदारावर 28 दिवसांनी गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  1 ऑगस्टला दूध दरवाढीच्या मागणीसाठी भाजप आणि मित्रपक्षांनी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले होते. दुधाचे टँकर रोखत हजारो लिटर दूध रस्त्यावर सोडून दिले होते. शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल आमदार राजळे यांच्या … Read more

‘दार उघड उद्धवा, दार उघड’; शेवगावमध्ये भाजपच्या वतीने घंटानाद

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्यात, बाजारात प्रचंड गर्दी, मात्र भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मंदिरे बंद ठेवलीत. मंदिरे सुरू करा या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी … Read more

मोठी बातमी: महावितरणच्या ‘ह्या’ उपकेंद्राला आग

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  अळकुटी येथील वीज उपकेंद्रात आग लागण्याचा धक्कादायक प्रकार घडला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. शुक्रवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. ह्या उपकेंद्रावरुन बारा गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. या आगीत वीज उपकेंद्रातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. वीज … Read more

पारनेर तालुक्यातील अवैध व्यवसायांना वरदहस्त कोणाचा?

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील गुंडांवर अंकुुश ठेवण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रशासकिय कार्यालये बंद ठेउन हल्ल्याचा निषेध नोंदविला पाहिजे. तसे केले तरच पुन्हा असे धाडस कोणी करणार नाही. आपण गप्प बसलो तर काळ आपणास माफ करणार नाही. तालुक्यात चालणा-या अवैध व्यवसायांना वरदहस्त कोणाचा असा सवाल करून पोलिस प्रशासनाने रात्रीचे पेट्रोलिंग वाढवून वाळूसह … Read more

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास युनानी आणि आयुर्वेदिक काढा उपयुक्त पण…

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या खाण्या पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. रोग प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाने आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला आहे. आयुर्वेदात जर आपला विश्‍वास असेल तर आपण गिलॉय आणि इतर आयुर्वेदिक घटक वापरुन आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवू … Read more

कोरोना उपचार करताना ‘इतके’ डॉकटर पॉझिटिव्ह; व्यक्त केली ‘ही’ खंत

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. हजारोंच्या कोरोनाचे रुग्ण गेले आहेत. आज शासन सर्वाना घरत बसण्याची विनंती करत हे. संपर्ग टाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु या संकटात सर्वाना घरात सुरक्षित ठेवण्यासाठी काही कोरोना योध्ये जीवाची बाजी लावत २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत. वैद्यकीय विभाग यातील एक. … Read more

‘ह्या’ राज्यमंत्र्यांच्या वडिलांची मुळा धरणाबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती ; सरकारला केले ‘हे’आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यासाठी मुळा धरण वरदान आहे. लाखो लोकांची आणि हजारो हेकटर जमिनीची तहान हे धरण भागवत आलेले आहे. 1972पासून या धरणात पाणी साठा होत आलेला आहे. परंतु या धरणाबत अनेक धक्कादायक खुलासे आणि त्यावर करावयाचे उपाय याबाबत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी माहिती … Read more

सरकार बदल्‍यांसाठी ‘मंत्रालय’ सुरु करते, पण भाविकांसाठी मंदिर बंद ठेवते !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-  कोणत्‍याही संवेदना नसलेल्‍या महाविकास आघाडी सरकारने आध्‍यात्मिक क्षेत्रालाही वेठीस धरले आहे. सरकार बदल्‍यांसाठी ‘मंत्रालय’ सुरु करते, पण भाविकांसाठी मंदिर बंद ठेवते. मॉलमध्‍ये झालेली गर्दी सरकारला चालते, मंदिर सुरु करतानाच भाविकांच्‍या गर्दीची भिती का दाखविली जाते? असा सवाल करत भाविकांच्‍या ‘श्रध्‍देचा सन्‍मान’ आणि व्‍यवसायीकांच्‍या ‘भावना’ लक्षात घेवून तातडीने मंदिर … Read more

मंदिरासमोर घंटा व थाळी वाजवून आंदोलन, राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- राज्यातील सर्व मंदिरे व धार्मिक स्थळ उघडण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने मंगलगेट येथे मारुती मंदिर समोर घंटा व थाळी वाजवून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात व्यापारी आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष विलास गांधी, अनिल गट्टाणी, राजेंद्र गीते, श्याम जाखोटिया, अभिषेक दायमा, बद्री राठी, … Read more

तरुणाईपुढील चिंता: एकीकडे भरतीची प्रतीक्षा दुसरीकडे शेतीत कसण्यासाठी समीक्षा

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- भारत हा कृषिप्रधान देश आहे. असे असले तरी शेतकऱ्यास म्हणावे तसे आर्थिक स्वायत्त कधी मिळाले नाही. दुष्काळ, अतिवृष्टी, रोगराई, कर्ज हे जणू त्याच्या पाचवीलाच पुजलेले. यातून निश्चित आर्थिक उत्पन्न निघत नसल्याने तरुणाई शासनाने जाहीर केलेल्या पोलीस भरतीची प्रतीक्षा करत आहे. ग्रामीण भागातील तरुणाई मैदानी सराव करीत आहे. कोरोनाने … Read more

ग्रामपंचायत कर्मचारींचे काम बंद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :-महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाच्या वतीने राज्यव्यापी काम बंद आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आली. तर ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे पगारसाठीची जाचक अट असलेला 28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्याची मागणी करण्यात आली.या आंदोलनात महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ. सुभाष लांडे, … Read more