गुड न्यूज : भंडारदरा पूर्ण क्षमतेने भरले !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी पाणीसाठा १०९७४ दलघफू (९९ .४४ टक्के) झाला होता. या धरणाची ११०३९ दशलक्ष घनफूट क्षमता असून धरण स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला भरत असते, असा … Read more

कोरोना रुग्णाचा पलायनाचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील डॉ. आंबेडकर वसतिगृहात असलेल्या कोरोना केअर सेंटरमधून सोमवारी सायंकाळी एका रुग्णाने पलायन केले. शहरातील जिजामाता चौकातील या रुग्णाने आरोग्य यंत्रणेचा डोळा चुकवून पोबारा केला. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात आला. आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना करून त्याला परत आणल्याचे येथील नोडल अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोपरगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व महिला नगरसेविकेच्या पतीस अस्वस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी कोकमठाण येथील करोना केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना घाटी येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले … Read more

कोरोनाने आणखी २० जणांचा घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने आणखी २० जणांचा बळी घेतला. बळींची एकूण संख्या २६० झाली आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात ४२६ नवे रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या १८ हजार १९ झाली. सोमवारी सायंकाळी सहा ते मंगळवार सायंकाळी सहापर्यंत रुग्णसंख्येत ४२६ ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर महापालिकेची `ही` मागणी हस्यास्पद

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-  जिल्ह्यात नगर शहरात सर्वाधिक कोरोनाचे पेशंट सापडले आहेत. महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे कोरोनाबाधित रुग्णाचे हाल होत आहेत. आरोग्य विभागात देखील सावळा गोंधळ आहे. नगरच्या महापौरांनी जिल्हाधिकाऱ्यांना ‘कोविड हॉस्पिटल’ उभारण्यासाठी दहा कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आहे. यावरून कम्युनिस्ट पक्षाने मनपा आयुक्तांना सवाल केला आहे. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेने लोकसहभागातून ‘कोविड हॉस्पिटल’ … Read more

‘ह्या’ कारणामुळे केली ‘त्या’ कोरोना रुग्णाने आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :- कोरोना रुग्णाने खासगी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे सव्वा तीनच्या सुमारास सावेडी रस्त्यावरील गुलमोहोर रस्त्यावरील सुरभी हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.  आजाराच्या भीतीपोटीच या रुग्णाने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज तोफखाना पोलिसांनी व्यक्त केला. पाथर्डी येथील या ३२ वर्षीय रुग्णावर दहा दिवसांपासून उपचार सुरू … Read more

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये कॉंग्रेस हा लाचार पक्ष !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. या नाराज झालेल्या 11 आमदारांनी सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विकास निधी वाटपावरून कॉंग्रेस आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरून भाजपा खासदार सुजय विखे यांनी कॉंग्रेस नेतृत्वावर तसेच मंत्रीपद घेतलेल्या मंत्र्यावर टीकेची तोफ डागली … Read more

`त्या` 16 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात; जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलं अभिनंदन

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा येथे दंगल नियंत्रण पथकातील 16 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना बाधित पोलिसांनी जिल्हा रुग्णालयत उपचार घेतले होते. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्या कर्मचार्‍यांचे जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेशकुमार सिंह यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पोलिसांना सोशल डिस्टिन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केलं. … Read more

‘मराठा वर्ल्ड’ टीमचे कौतुकास्पद काम ; अनाथ कुटुंबासाठी केले ‘असे’ काही..

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील संजय व योगिता गाडे हे दामप्त्य खरेदीसाठी निघाले असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न अगदी तोंडावर आल्याने ते बाहेर पडले होते. परंतु नियतीने घाव घेतला आणि होत्याचे नव्हते झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत पाथर्डी तालुक्यातील कळसपिंप्री येथील अनाथ झालेल्या दोन बहिणी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : ‘या’ नेत्या विरोधात गुन्हा दाखल; बदनामी केल्याचा आरोप

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. दिवसेंदिवस शहरातील कोरोना पेशंटची वाढती संख्या आणि मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. जिल्हा प्रशासनाने काही खासगी हॉस्पिटलला कोरोना बाधित पेशंटवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये साईदीप हॉस्पिटलचा समावेश आहे. नगर शहरातील साईदीप हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणार्‍या उपचारावर आणि औषधांवर आक्षेप घेत चुकीची … Read more

खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांना यश; `या` राष्ट्रीय महामार्गासाठी निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  नगर जिल्ह्यातील महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग असलेला अहमदनगर ते जामखेड या महामार्गाच्या कामाला मान्यता मिळाली आहे. या कामाकरिता केंद्र सरकारने 29 कोटी 14 लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. लवकरच या मार्गाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. खासदार विखे पाटील यांनी … Read more

संजूबाबा होणार `या` हॉस्पिटलमध्ये दाखल ?

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच अभिनेता संजय दत्तला या महिन्यात 8 ऑगस्टला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला फुफ्फुसांचा कॅन्सर असल्याचे समोर आले होते. संजय दत्तने यानंतर स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत तो उपचारांसाठी कामांमधून ब्रेक घेत असल्याचं सांगितलं होत. सध्या संजय दत्त कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेतो आहे. … Read more

कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह येताच खासदार सदाशिव लोखंडे मुंबईला रवाना !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाच्या काळात लोकप्रतिनिधी कामांनिमित्तानं मतदारसंघामध्ये फिरत आहेत. त्यांचा कोरोना बाधित लोकांशी संपर्क येत आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली आहे. शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह त्यांची पत्नी व मुलालाही करोनाची लागण झाली असून पुढील उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. खासदार … Read more

एकट्या खासदाराला टार्गेट करण्यात काय अर्थ ?

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- काही दिवसांपूर्वी खासदार सुजय विखे यांनी के.के.रेंज प्रश्नावर नगर, पारनेर, राहुरी तालुक्यात शेतकऱ्यांच्या बैठका घेतल्या होत्या. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळले नसल्याचे समोर आले होते. यानंतर बैठकीचे फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. यावरून टीकाही झाली होती. या टीकेला उत्तर देताना खासदार सुजय विखे आक्रमक झाले आहेत. करोना रोखण्यासाठी … Read more

आमदार निलेश लंके यांचा खासदार सुजय विखेंवर पलटवार

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- करोना रोखण्यासाठी मी जिल्ह्यात फिरत आहे. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्या एकट्यावरच नव्हे तर आरोग्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील सत्ताधारी आमदारांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी खासदार सुजय विखे यांनी केली होती. यावरून आमदार निलेश लंके यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्यावर पलटवार केला आहे. ‘मी काम करणारा माणूस … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येने ओलांडला अठरा हजाराचा आकडा वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ५६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८०.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४२६ ने वाढ … Read more

गावठी कट्टा व तलवार विक्री करणारा युवक जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे प्रशासन आणि समाज या महामारीशी झुंज देत आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे चित्र आहे. नुकतेच एका युवकास पोलिसांनी गावठी कट्टा व तलवार विक्री करताना जेरबंद केले आहे. अकाश अण्णा फुलारी (वय- २२ रा . कासार पिंपळगाव ता. … Read more

नागरिकांचा इशारा! अमरधाममधील अंत्यविधी बंद करा, अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :-  शहरात कोरोना तसच इतर काही कारणांमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरातील मृत्यूचे प्रमाण या अलीकडील काही महिन्यात वाढल्याचे चित्र आहे. हे जिल्हाभरातील सर्व अंत्यविधी नालेगाव अमरधाम येथे होतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट नालेगाव गावठाण, सुडके मळा यांसारख्या आजूबाजूच्या बऱ्याच मोठ्या परिसरात पसरत आहे. यामुळे, आरोग्यचा प्रश्न उभा … Read more