अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता तरुणाचा मृतदेहबंधाऱ्यात सापडला

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील लक्ष्मण अशोक गवळी (३० वर्षे) तीन दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. रविवारी (१६ ऑगस्ट) त्याचा मृतदेह उंबरी नाल्यावरील बंधाऱ्यात सापडला. ही आत्महत्या आहे की, घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी कृष्णकांत अरूण गवळी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. सहायक … Read more

२४ तासांत दहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम,18 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत ३६३ ने वाढ होऊन उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २७९८ इतकी झाली आहे. दहा जणांचा मृत्यू झाला.  आतापर्यंत १६८ जणांचा बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०, अँटीजेन चाचणीत २१६ आणि खासगी प्रयोगशाळेत १०७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात आढळलेल्या रुग्णांमध्ये मनपा … Read more

`ऐकावं ते नवलच` सापाचा मोटारसायकवर 9 किमी प्रवास

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- `ऐकावं ते नवलच` संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथे सापाने चक्क 9 किलोमीटर मोटारसायकलवर प्रवास केला. बसला ना धक्का ? तर झालं असं की, पारेगाव गडाख येथील प्राथमिक शिक्षक अशोक गडाख हे दुचाकीवरून जाताना त्यांच्या समवेत सापानेही प्रवास केला. ही घटना घडली शनिवारी १५ ऑगस्टदिवशी. गडाख यांनी दुचाकीच्या हेडलॅम्पमध्ये (खोपडी) … Read more

महापालिकेतील विभागप्रमुख कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या चार लोकप्रतिनिधीनंतर महापालिकेतील एका विभागप्रमुखाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. आता नगर शहरात करोनाग्रस्तांच्या संख्येने पाच हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यातील 900 जणांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नगर जिल्ह्याचा करोनाग्रस्तांचा आकडा … Read more

तिने प्रियकरासोबत तलावात मारली उडी; त्याने शेवटच्या क्षणी घेतला `हा` निर्णय

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-प्रेमात एकमेकांसाठी वाटेल ते करण्याची तयारी प्रेमवीरांची असते. प्रेमात विश्वास हाच एकमेक धागा असतो. मात्र, एखाद्या वेळी विश्वासघात देखील होतो. अशीच घटना आझमगडमध्ये घडली आहे. प्रियकरावर विश्वास ठेवणे प्रियेसीच्या जिवावर बेतलं आहे. जिल्ह्यातील मुबारकपूर पोलीस स्टेशन परिसरातील संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता युवतीचा मृतदेह शाळेच्या मागे सापडल्याने खळबळ उडाली आहे. संतप्त नातेवाईक … Read more

नगर जिल्ह्यातील धरणांची पाणीपातळी वाढली; `हे` महत्वाचे धारण ओहरफ्लो

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- राज्यात गेल्या तीन-चार दिवसापासून धुव्वाधार पाऊस पडत आहे. नगर जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे भंडारा धरणात पाण्याची मोठी अवाक सुरु असून काल पहाटे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले आहे. काल सायंकाळी धरणात 10481 दलघफू पाणीसाठा कायम ठेवून येणारे पाणी स्पील वे तून आणि विद्युत गृह … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची कोव्हिड केअर सेंटरला भेट

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अधिकाधिक कोव्हीड सेंटर सुरु करण्यावर शासनाचा भर आहे. बाधित रुग्णांना लवकर आरोग्य सुविधा देण्याला प्राधान्य आहे. नुकतेच शनिशिंगणापूर येथे कोव्हीड सेंटर सुरु करण्यात आले आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड … Read more

नगरमधील `या` बड्या नेत्याचे घरवापसीवर सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपवासी झालेल्या नेत्याची पुन्हा घरवापसी करण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपध्ये गेलेले राष्ट्रवादीचे काही आमदार परत येणार असल्याचे सूचक विधान केले होते. त्या पार्श्वभूमीवर नगरमधील `हे` बडे नेते पुन्हा घरवापसी करणार अशी चर्चा … Read more

नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात; जखमींमध्ये महिलांचा समावेश

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा परिसरातील गरीब महिला उपजिविका भागविण्यासाठी रोजंदारीवर शेती कामाला जातात. यासाठी वाहनातून जा-ये करत आसतात. रविवारी (दि.१६) सायंकाळी ६.०० वाजेच्या सुमारास कामावरुन परतत येत असताना वाहनाचे टायर फुटून वाहन पलटी झाले. यामध्ये महिला जखमी झाल्या आहेत. याबाबत माहिती अशी की, माळीचिंचोरे शिवारात नगर-औरंगाबाद महामार्गावर हॉटेल दत्त प्रसाद … Read more

अध्यक्षांनी वाचला पालकमंत्र्यासमोर अडचणीचा पाढा

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता ग्रामीण भागात देखील कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांनी नगरच्या शासकीय विश्रागृहावर आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेत अध्यक्षांनी पालकमंत्र्यासमोर अडचणीचा पाढाच वाचला. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांचे पगार थकले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ३६३ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०६२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही  ७८.१७ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ झाली. यामुळे … Read more

स्वयंपाक घरातील ‘हे’ चार पदार्थ तुमच्या ऍसिडिटीला लावतील कायमस्वरूपी पळवून

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-  जर आपल्याला चवदार काहीतरी खाण्याची आवड असेल आणि ज्या दिवशी आपल्याला चवदार भोजन मिळेल तेव्हा आपण भरपेट जेवतो. या जेवणानंतर जर थोडीशी झोप मिळाली तर तिची मज्जा काही औरच. परंतु बऱ्याचदा या झोपेनंतर छातीत जळजळ, पोटात मुरडा येणे आदी गोष्टी घडतात. हे ऍसिडिटीमुळे होते. जाणून घेऊयात यावर उपाय – … Read more

जिल्हा रुग्णालयातील कोरोना योद्धे गणेश बारवकर यांचे दु:खद निधन

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-  महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटनेचे पदाधिकारी जिल्हा रुग्णालयातील औषधनिर्माते गणेश बारवकर यांचे नुकतेचे कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे दु:खद निधन झाले. मृत्यू समयी ते 40 वर्षांचे होते. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्व.बारवकर यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ-बहिण असा परिवार आहे. स्व.बारवकर हे जिल्हा रुग्णालयातील औषध विभागात … Read more

आ. रोहित पवारांनी केले मोदींचे कौतुक; म्हणाले..

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेले हे भूमिपूजन अनेकांनी टीकेस पात्र ठरवले. स्वतः खा. शरद पवार यांनीही यावर भाष्य केले होते. परंतु आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र काही गोष्टींवरून नरेंद्र मोदी यांचे कौतुक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ४० नवे रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना आजारातून बरे झालेल्या ५३९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता १०६२० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ८०.३१ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली. यामुळे … Read more

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता विविध मागण्यांसाठी जागरण गोंधळ !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता विविध मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने सोमवार दि.17 ऑगस्ट रोजी शहरातील चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सरकार आणि उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांना त्वरीत हटविण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात छावाचे प्रदेश संघटक विश्‍वनाथ वाघ, अशोक चव्हाण, … Read more

बिग ब्रेकिंग : आता लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय नाही !

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :-  सर्वांच्या बरोबरीने सरकार सक्षमपणे काम करत आहोत. रुग्णवाहिका मोफत ठेवल्या आहेत, स्त्राव तपासणी किंमती कमी केल्या आहेत. अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. आता लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही. टप्प्याटप्याने सगळे क्षेत्र सुरू करणार आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी … Read more

आरोग्यमंत्री टोपे म्हणतात, ‘शरद पवारांची देशाला गरज, त्यांची काळजी घेतली जातेय’

अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- ‘शरद पवार हे महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना नेहमीच काळजी घेण्याबद्दल सांगत असतो. पण त्यांचा उत्साह मोठा आहे. लोकांच्या प्रती त्यांची बांधिलकी आहे. त्यातून ते लोकांमध्ये जात असतात. कदाचित फिरण्यातून त्यांना काही संदेश द्यायचे असतात. त्यामुळे त्यांची अधिक काळजी घेण्याचा आमचा प्रयत्न आहे … Read more