‘त्या’ शेतकऱ्याच्या कुटुंबास १ लाखाची मदत

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास जिल्हा प्रशासनाकडून १ लाखाची मदत देण्यात आली. मृत शेतकरी दादा भाऊ शिंदे यांच्या पत्नी कुसुम शिंदे यांना शासनाकडून मिळणाऱ्या १ लाख रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार उमेश पाटील आणि निवासी नायब तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या उपस्थितीत देण्यात आला. दशमीगव्हाण येथील … Read more

विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून मारहाण,आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-प्रेम प्रकरणातून विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून युवकास मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर आश्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश शंकर सारबंदे (२५, उंबरी-बाळापूर, ता. संगमनेर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी उंबरी-बाळापूर येथे घडली. योगश सारबंदे गावातीलच एका मुलीवर प्रेम करत होता. मात्र तिचे लग्न कुटुंबीयांनी करून … Read more

धक्कादायक : आता या पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव !

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-श्रीगोंदे तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या लाटेला ओहोटीची चिन्हे दिसत नाहीत. शनिवारी घेतलेल्या १४८ रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये २१ रुग्ण संक्रमित सापडले. त्यात श्रीगोंदे पोलिस ठाण्याचे एक अधिकारी व एका कर्मचाऱ्याला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. गेली चार महिने कोरोनाला दूर ठेवण्यासाठी व नागरिकांना शिस्त लावणाऱ्या पोलिसांनाच आज लागण झाल्याने पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ … Read more

सीना नदीत काळीज हेलवणारी दुर्घटना ; वाचा..

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात व शहरात पावसाने सर्वदूर हजेरी लावल्याने यंदा सीन नदीला भरपूर पाणी आहे. तसेच धरणही पूर्ण क्षमतेने पाणी आहे. परंतु काल दुपारी सीनमधे पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा सीना नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील रातंजन येथे घडली. सिध्दार्थ विजय काळे (वय १६), तेजस सुनील काळे … Read more

के. के. रेंजमधील ‘त्या’ २३ गावांत खळबळ; ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव केला जातो. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे.  परंतु काही दिवसांपूर्वी लोकप्रतिनिधींनी या जमिनींचे अधिग्रहण होणार नसल्याचे सांगितले होते. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून … Read more

नामदार बाळासाहेब थोरातांच्या निकटवर्तीयाचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- संगमनेरात कोरोनाने हाहाकार माजविला असताना भल्याभल्यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. यात नामदार महोदयांच्या काकाश्रींचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाला आहे.  पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. तर या काकाश्रींच्या संपर्कात आलेल्या तिघांना आज कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देखील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या बळींचे ‘शतक’ !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात करोना उपचारादरम्यान आतापर्यंत 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली.गेल्या सहा महिन्यांपासून करोनाविरुद्ध प्रशासन लढा देत आहे. त्यास चांगले यश आलेले असले तरी उपचारादरम्यान आतापर्यंत 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात करोना संसर्ग वेगाने वाढला. त्यातच मृत्यूचा आकडा देखील वाढला … Read more

सुजय विखे झाले आक्रमक म्हणाले माझी ६ कोटी रखडलेली उधारी आधी द्या !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी नगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी शनिवारी येथे … Read more

खुशखबर ! स्वस्तात मिळत आहे रॉयल एनफिल्डची बुलेट ; ‘अशी’ करा खरेदी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- बुलेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. रॉयल एनफील्ड भारतातील परफॉरमन्स बाईकसाठी प्रसिद्ध आहे. महान बाइक निर्माता रॉयल एनफील्ड सामान्यत: बुलेट मॉडेलसाठी ओळखला जातो.  रॉयल एनफील्ड जगभरात लोकप्रिय आहे. परंतु तिची किंमत खूप जास्त असल्याने बऱ्याच लोकांना ती खरेदी करता येत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला कमी किंमतीत म्हणजे अगदी अर्ध्या किंमतीपेक्षा … Read more

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांबाबत अत्यंत महत्वाची बातमी !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची विनंती बदल्या करण्यास सांगितले असले तरी आदिवासी भागातील (पेसा) शिक्षकांच्या बदल्या करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत पेसाच्या बदल्या होणार नसल्याने बदलीची प्रक्रियाच पूर्ण होणार नाही. यामुळे यंदा अहमदनगर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यावर गंडांतर येणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानूसार … Read more

शेतकऱ्यांना मोदी सरकारकडून गिफ्ट; लाभ घ्यायचाय ? मग हे वाचाच…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा केली होती. ही घोषणा ७ ऑगस्ट म्हणजेच शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. या रेल्वे सेवेचा फायदा अनेक राज्यांमधल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. या ट्रेनच्या सहाय्याने देशात भाजीपाला, फळे, फुले आणि मासे एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत वाहतूक करण्याचे … Read more

मोठी बातमी : अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग २० आॅगस्टपर्यंत सील

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनारुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांचा आकडा ८ हजारांच्या पार गेला आहे.  परंतु यात अहमदनगर शहर कोरोनाचे  हॉटस्पॉट बनू पाहत आहे. शहरातील रुग्णांची संख्या आता जास्त होऊ लागली आहे. आता अहमदनगरमधील सावेडीतील वैदुवाडी येथे कोरोनाचे जास्त रुग्ण  सापडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६४६ कोरोना रुग्ण वाढले एकूण आकडा पोहोचला ९२४० वर !

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत  ६४६  ने वाढ झाली. यात,  जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले.   यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२७४  इतकी झाली आहे. दरम्यान, … Read more

तो’ एकाला सोडवायला गेला आणि परतलाच नाही…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- राहुरी तालुक्यातील गुहा परिसरातील एक तरुण एका जणाला नगर येथे कामावर जायचे असल्याने तो दुचाकीवरून त्यास राहुरी फॅक्टरी येथे बसस्टँडवर सोडण्यासाठी गेला. परंतु त्यानंतर तो माघारी परतलाच नाही.  शोध घेतल्यानंतर एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. रोहन बबन ओहळ (वय १९ ) असे  या तरुणाने नाव असून त्याने विहिरीत … Read more

मुलीच्या वाढदिवसाला येण्याची त्यांची इच्छा शेवटी अधुरीच राहिली

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील भूदल सेवेत आसाम मधील तेजपुर येथे सेवा बजावत असणारे भरत लक्ष्मण कदम हे प्रात्यक्षिक करत असताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत पावले आहेत. कदम हे २००३ पासून देशसेवेचे व्रत हाती घेऊन आर्मी मध्ये सेवा बजावत होते. ते सध्या आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी … Read more

मोठी बातमी ! इंदोरीकर महाराजांच्या बाबतीत कोर्टाचे ‘हे’ महत्वपूर्ण वक्तव्य

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :-कीर्तनातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील ज्वलंत विषयांवर भाष्य करून अनेकांची मनं जिंकणारे कीर्तनकार म्हणून निवृत्ती इंदुरीकर महाराजांना ओळखले जाते. त्यांच्या एका कीर्तनातील वक्तव्यास आक्षेप घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्यावर कोर्टात केस दाखल होती. परंतु आता कोर्टाने महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. कीर्तनकार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कोरोनाने घेतला आणखी एका मुख्याध्यापकाचा बळी

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉकडाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले आहेत. नुकतेच जामखेडमधून एक धक्कादायक वृत्त आले आहे. जामखेड तालुक्यातील पाडळी येथील साहेबराव … Read more

आमदार लंके कोरोना रुग्णांसाठी करणार ‘असे’ काही; राज्यात प्रथमच…

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आपल्या उपक्रमशील स्वभावाने परिचित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार जसा तालुक्यात व्हायला लागला तसा त्यांनी आपल्या मदतीचा ओघही वाढवला. आता त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1000 बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे. स्वखर्चातून उभे … Read more