धक्कादायक! ‘ह्या’ ठिकाणी सशस्त्र दरोडा; लाखो लांबवीले

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला फास आवळला आहे. तर दुसरीकडे गुन्हेगाररी प्रवृत्ती वाढीस लागल्या आहेत. चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरु होते कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एक गुन्हा पाथर्डी तालुक्यातील खरवंडी शिवारात घडला. येथील केळगंद्रे वस्तीवर पाच चोरट्यांनी शनिवारी रात्री एक वाजल्यानंतर सशस्त्र दरोडा टाकला. घराचा दरवाजा … Read more

सततच्या पावसाने बळीराजाच्या पदरी निराशा; उपसभापती म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच कोलमडलेला शेतकरी सततच्या पावसाच्या अस्मानी संकटामुळे पुरता कोसळला आहे. अहमदनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व सुरु असणाऱ्या सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सततच्या या पावसाने तालुक्यातील शेतकर्‍यांच्या पदरी याही वर्षी निराशाच पडली आहे. जून, जुलैमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. या पावसामुळे … Read more

अपहरणाबाबत विचारणा केल्याचा रागातून डॉक्टरसह तिघांना मारहाण

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- एकीकडे कोरोनाचे संकट डोक्यावर असताना एकीकडे गुन्हेगारी कृत्येही थांबायला तयार नाहीत. अशीच एक धक्कादायक घटना अहमदनगर मधील मुकुंदनगर मध्ये घडली. याठिकाणी एका टोळक्याने डॉक्टरसह मुलगा आणि भाच्याला जबर मारहाण केली. डॉ. सय्यद उम्रान हमिद (वय- 41), त्यांचा मुलगा सय्यद अब्दुल कादीर उम्रान व भाचा शेख सैफ आश्पाक (रा. मुकुंदनगर) … Read more

गर्दी टाळण्यासाठी ‘बंद’चे नियोजन करण्यासाठीच खूप मोठी गर्दी

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. तालुक्यातील कारेगाव येथे आज एकाच ठिकाणी सात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने सगळ्यांचीच भीतीने गाळण उडाली. प्रशासनाच्या सर्वच अधिकार्‍यांनी गावात भेट दिली. यावेळी खबरादि म्हणून आणि गर्दी होऊन संपर्क येऊ नये म्हणून गाव बंद करण्याची … Read more

दूध आंदोलनप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- शेतकऱ्यांसाठी दूध उत्पादन हा आर्थिक घडी सावरण्यासाठी असणारा उत्तम पर्याय आहे. परंतु मागील काही दिवसांपासून दुधाचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यामुळे विविध मागण्या घेऊन संगमनेर तालुक्यातील निंबाळे बाह्यवळण समनापूर येथे भाजप कार्यकर्त्यांनी दूध प्रश्नी आंदोलन केले. याप्रकरणी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 14 जणांवर शहर पोलीस ठाण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढले ८२ नवे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात काल (रविवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८२ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १८९० इतकी झाली आहे.  दरम्यान, जिल्ह्यात आज २६३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४०२५ इतकी झाली. काल सायंकाळपासून … Read more

रोहित पवार यांनी रक्षाबंधन सण ‘अश्या’ पद्धतीने केला साजरा … वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आजचा रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा करत बहीण-भावाच्या नात्याचं एक सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं आहे.  आमदार रोहित पवार यांनी आज ससून आणि नायडू रुग्णालयांना भेट दिली आणि रुग्णालयातील नर्ससोबत रक्षाबंधन साजरं केलं. यंदाच्या रक्षाबंधन सणावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळे आज अनेकांना रक्षाबंधन … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात चार हजार हून जास्त रुग्णांची कोरोनावर मात !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता चार हजाराच्या वर गेली आहे. मनपा ११३, संगमनेर ५५ राहाता १० पाथर्डी १८ नगर ग्रा.३ श्रीरामपूर ८ कॅन्टोन्मेंट ३ नेवासा ४ श्रीगोंदा ५ अकोले १८ राहुरी २ कोपरगाव ७ जामखेड १ कर्जत ११ … Read more

आता बँकेतही आढळले कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-जामखेड येथील ३१ जणांचे कोरोना तपासणी अहवाल तीन दिवसांत पॉझिटिव्ह आले आहे. शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. शहरातील एका राष्ट्रीयकृत बँकेचे शाखाधिकारी गेल्या १५ दिवसापासून आजारी असल्याने त्यांनी शहरातील ३ खाजगी दवाखान्यात उपचार घेतले होते मात्र गेल्या १० ते १२ दिवसापासून शाखाधिकाऱ्यानी … Read more

तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू,बहीण म्हणाली दादा मी आणलेली राखी आता कोणाला बांधू?

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- विहिरीत डोकावताना पाय घसरून पडल्याने अक्षय रवींद्र ढूस (२२) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजता टाकळीमिया शिवारात करपेवस्तीवर घडली. अक्षय आईला घेऊन टाकळीमिया येथे मावशीकडे गेला होता. विहिरीत पोहणाऱ्या भावंडांकडे डोकावून पाहताना अक्षयचा तोल गेला. इतर सर्व अक्षयला वाचवू शकले नाहीत. दुपारची वेळ असल्याने … Read more

पैशांच्या वादातूनडोक्यात वीट घालून खून

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अकोले तालुक्यात उसन्या पैशांच्या वादातून बाचाबाची होऊन डोक्यात वीट मारल्याने एकजण ठार झाला. ही घटना शनिवारी उंचखडक खुर्द येथे घडली. तुकाराम बुधा उघडे (वय ६९) असे मृताचे नाव आहे. कैलास यशवंत घोडके (४०) याला पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी घोडकेने उघडेकडे पैसे उसने मागितले. उघडेने नातेवाईकांकडून घेऊन दिले. नातेवाईक … Read more

सरकारी दवाखान्यात आजारापेक्षा असुविधेचीच रुग्णांना जास्त चिंता

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोरोनाचे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यापेक्षा अधिक भूकची समस्या जाणवत आहे. सर्वसामान्यांचे रोजगार बुडाले तर काहींच्या नोकऱ्या गेल्याने त्यांच्या कुटुंबांंपुढे उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीमध्ये माणुसकी जीवंत ठेवून एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. डॉक्टर कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत आहेत. मात्र खासगी दवाखान्यात दर निश्चित झाल्यास डॉक्टर … Read more

अकोल्यात आढळले नवे १० बाधित, रुग्ण संंख्या १४८

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अकोले शहरात कोरोनाचे १० रुग्ण आढळले आहेत. त्यात पोलिसांच्या कुटुंबाचा समावेश आहे. अगस्ती चित्रपट गृहाजवळ तीन, तर एक तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस एक आणि उंचखडक बुद्रूक येथील एक असे दहा रिपोर्ट बाधित आढळले. अकोले शहरातील एक पोलिस कर्मचारी संगमनेर शहर वाहतूक शाखेत कार्यरत आहे. त्यामुळे आपले कार्य बजावत असताना … Read more

शेतकऱ्यांना खरीप विम्याची रक्कम तातडीने द्या : कोल्हे

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सन २०१९ -२० च्या खरीप हंगामातील कापुस व तूर या पिकाच्या विम्याची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्याची मागणी भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. सन २०१९ -२० मधील खरीप हंगामातील कापूस व तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली … Read more

कोपरगावात पुन्हा १९ जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील १०१ व्यक्तीची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये १८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले, तर ८३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. अहमदनगर येथे काल पाठवलेल्या ३० अहवालांपैकी गोरोबानगर येथील ६० वर्षीय महिलेचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून २९ अहवाल निगेटिव्ह आले. तालुक्यात आता एकूण … Read more

शिक्षकांचे नेते माधव लांडगे यांचे अपघाती निधन

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माधव लक्ष्मण लांडगे (वय 54) हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्याची घटना काल रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर घडली आहे माधव लांडगे हे मोटारसायकलहून जात असताना कारने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर मार … Read more

धक्कादायक बातमी : २ दिवसांत नगर शहरात आढळले २५० कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :-जिल्ह्यात २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत ४०३ ने वाढ झाली. जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खासगी प्रयोगशाळेत १५१ पाॅझिटिव्ह आढळले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ झाली आहे. नगर शहरात दोन दिवसांत तब्बल २५० रुग्ण आढळून आले. बाधितांचा आकडा १८६४ वर पोहोचला आहे. महापालिकेकडून नवीन … Read more

कोरोना आजाराची लक्षणे जाणवणाऱ्या व्यक्ती आता थेट जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीसाठी देवू शकणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी  जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. अधिकाधिक चाचण्या करून बाधितांना लवकर शोधण्यासाठी प्रयत्न होत असून त्याचाच भाग म्हणून जिल्हा रुग्णालयातील कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन एक हजार चाचण्या एवढी करण्यात आली आहे.  यामुळे येथील चाचण्यांचा वेग वाढणार असून ज्यांना … Read more