शिर्डी साई संस्थानचा तात्पुरता कार्यभार ठाकरे यांच्याकडे

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- शिर्डी साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शुक्रवारी संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदाची सूत्रे स्वीकारली. राज्य शासनाने ठाकरे यांना संस्थानच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याबरोबरच पुढील आयएएस दर्जाच्या अधिकारी नियुक्त हाेईपर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार … Read more

‘हे’आमदार झाले नाराज, पोलिसांबाबत केली थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार !

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- तालुक्यातील विविध भागात पोलिस चौक्या उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे सांगितले असतानाही पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्याला अंधारात ठेवत चौक्यांचे उद्घाटन केल्याने आमदार लहू कानडे नाराज झाले. त्यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. दरम्यान, यात राजकारण न करता सहकार्य केले पाहिजे, असे माजी सभापती दीपक पटारे म्हणाले. मागील महिनाभर आमदार कानडे मुंबईत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ३५ वर्षीय मनपा कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :- पुण्यात उपचार घेत असलेल्या ३५ वर्षीय मनपा कर्मचाऱ्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यानंतर कामगार युनियनने आयुक्त श्रीकांत मायकलवार व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन कर्मचाऱ्यांची सरसकट तपासणी करण्याचा निर्णय घेतला. शहरातील रुग्णांचा आकडा दीड हजारांवर गेला आहे. मनपातील एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांना काही दिवसांपूर्वी बाधा झाल्याचे समोर आले. युनियनचे … Read more

धक्कादायक : एमआयडीसीत १२ कामगार कोरोना बाधीत !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज सुपे एमआयडीसीत १२ कामगार कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. एकाच कंपनीमधील कामगारांना बाधा झाल्याची माहिती असून आज तालुक्यातील पाडळी दर्या, म्हसोबा झाप, तिखोल येथे प्रत्येकी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज दिवसभरात २४ रुग्ण बाधीत, रॅपिड टेस्ट १७, शासकीय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या गावच्या सिमा झाल्या बंद

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर तालुक्यातील जेऊर गाव तहसिलदार यांच्या आदेशाने बंद करण्यात आले आहे. जेऊर गावात कोरोना चे दोन रुग्ण आढळुन आल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ जुलै ते सोमवार दि १० ऑगस्ट दरम्यान गावातील सर्व व्यवहार, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तालुक्यातील मोठे गाव म्हणुन ओळख … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी रविवारी जिल्हावासियांशी साधणार फेसबुकवर संवाद

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह विविध यंत्रणा रात्रंदिवस राबत आहेत. याचसोबत लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते हेही झटत आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. यासंदर्भात नागरिकांच्या मनातही काही प्रश्न असतील तर त्या थेट आता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संवाद साधत मांडता येणार आहेत. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास या आदेशान्‍वये दिनांक एक ऑगस्ट ते दि.31 ऑगस्ट … Read more

ब्रेकिंग: सुशांतच्या आत्महत्याप्रकरणी ED ने दाखल केला गुन्हा

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये दररोज विविध गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आता या प्रकरणाला आता आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. आता सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात ईडीने उडी घेतली आहे. याप्रकरणी आता ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी फिर्याद दिल्यानंतर बिहार पोलिसांनीही या … Read more

संकटाच्या काळात लोकसेवेला महत्त्व: आ. रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- संकटाच्या काळामध्ये लोकांच्या सेवेला अत्यंत महत्त्व आहे. आ. संग्राम जगताप यांनी नागरिकांवर आलेल्या कोरोना संसर्ग विषाणूच्या संकटाच्या काळामध्ये गरजूंना मदत करण्याची मोठी कामगिरी केली आहे. आयुर्वेद कॉलेज येथे कोरोना सेंटर उघडून अल्पदरात चांगल्या दर्जेच्या सुविधा कोरोना रुग्णांना देण्याचे काम केले आहे. सकारात्मक दृष्टीकोनातून काम केल्यास समाजामध्ये अनेक लोक पुढे … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवलं ‘असे’ आहेत नियम !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-राज्यभरात १ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करण्याचा सरकारनं निर्णय घेतला असून अहमदनगर मध्येही काय सुरु रहाणार आणि बंद याबाबत माहिती आपण या  बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.  अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले नेत्यांना चांगले वाटावे म्हणून सुजय विखे…..

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- आज अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य केले. यावेळी त्यांनी खा.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. खा. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते ‘अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीवर नजर ठेवल्याच्या कारणातून झाला ‘त्याचा’ खून !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात राधू सहादू कोकरे ४५ (रा. ढवळपूरी ता. पारनेर) या भटकंती करून उपजिविका करणा-या मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने हत्याराने डोक्यात मारून खून करण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून आरोपीने खडकवाडी शिवारात आडरानात प्रेत नेउन ठेवले होते,या खुनाचा उलगडा झाला आहे, अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी या खुनातील … Read more

पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. पारनेर २, तिखोल २, सुपे व पाडळी दर्या येथील प्रत्येकी १ रुग्ण बाधीत पारनेरच्या दोन पैकी एक रुग्ण केडगाव येथे वास्तव्यास, तर दुसरा म्हसोबा झाप येथील आरोग्य यंत्रणेचा खुलासा. २३ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह. राधे ११, टाकळी ढोकेश्वर ३,पारनेर, कान्हूरपठार … Read more

शहर भाजपाच्या वतीने दरवाढीसाठी दूध कोविड सेंटरला वाटप

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- शेती व्यवसायाबरोबर शेतकरी जोडधंदा म्हणून दूध हा व्यवसाय करत असतो. कोरोना संसर्ग आजाराच्या काळात शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यातच दूध दरही कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. यासाठी १ ऑगस्ट रोजी भाजपाच्या वतीने संपूर्ण राज्यभर दूध दरवाढीसाठी दूध बंद आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप महायुतीने … Read more

कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची लूट व पिळवणुक थांबविण्यासाठी घंटानाद आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या नावाखाली खाजगी दवाखान्यात सर्वसामान्य रुग्णांची चालू असलेली आर्थिक लूट, कोरोना रुग्णासाठी येणार्‍या निधीवर मारला जाणारा डल्ला, तर जिल्हा रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या वतीने रविवार दि.1 ऑगस्ट रोजी हुतात्मा स्मारकात महागांधीगिरी क्रांती घंटानाद आंदोलन करण्यात येणार … Read more

सेवाभावी कार्यानेच कोरोनाच्या संकटातून समाज सावरणार -डॉ.गिरीश कुलकर्णी

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कटलेली असताना सामाजिक संस्थांना देखील या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. शरद पवार विचार मंचच्या वतीने स्नेहालय संचलित निंबळक येथील सत्यमेव जयते ग्राममध्ये अनामप्रेमचे दिव्यांग व स्नेहालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठी अन्न-धान्याची मदत करण्यात आली. शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ … Read more

एसटी बस सेवा बंदचा फटाका,कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-लॉकडाऊन काळात मागील तीन महिन्यापासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवा बंद असल्यामुळे कर्मचार्‍यांचे वेतन कपात करण्यात आली आहे. तर सध्याच्या परिस्थितीत वेतन मिळणे देखील अवघड झाले असताना कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचे उदरनिर्वाहासाठी पुर्ण वेतन मिळण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन … Read more