पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस; मुळा,भंडारदरा, निळवंडेत ‘एवढा’ पाणीसाठा

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :   सध्या मान्सूनने अहमदनगरमधील पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. पाण्याची आवक सुरु असल्याने नगर जिल्ह्यासाठी वरदान असणारे मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणामध्ये पाण्याची आवक वाढत चालली आहे. उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरण काल रात्री ५० टक्के भरले. पाऊस सुरू … Read more

बंदबाबत व्यापार्‍यांनी केला ‘हा’ आरोप

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 38 वर जावून पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर व्यापारी असोसिएशनने आज (गुरुवार) पासून चार दिवस ‘श्रीरामपूर बंद’ची घोषणा केली. … Read more

आनंददायक ! जुलैच्या पूर्वार्धातच निळवंडे ५० टक्के भरले

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :   सध्या मान्सूनने पाणलोट क्षेत्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसाने अनेक जलसाठे भरण्याच्या मार्गाकडे आहेत. उत्त्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे निळवंडे धरण काल रात्री ५० टक्के भरले. पाऊस सुरू असल्याने धरणात काल दिवसभरात 28 दलघफू पाणी आले. 8 हजार 300 दलघफू क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 6 … Read more

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आ. मधुकरराव पिचड यांनी सीताराम पाटील गायकर यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड केली. गायकर यांच्या सारख्या अकोले तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी मिळत आहे हे पाहून मी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून त्यावेळी माघार घेतली, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ संचालक शिवाजीराव कर्डिले यांनी केला. तसेच गायकर यांनी … Read more

श्रीरामपुरात आणखी तिघांना कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. संगमनेरनंतर आता श्रीरामपूरमध्ये कोरोनारुग्ण वाढत आहेत. श्रीरामपूरमध्ये काल पुन्हा वॉर्ड नं. 2 मधील तीन अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 38 वर जावून पोहोचली आहे. या रुग्णांमध्ये श्रीरामपूर शहरातील … Read more

धक्कादायक ! संगमनेर नंतर ‘या’ तालुक्यात वेगाने पसरतोय कोरोना

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाने आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा विस्फोट होत असतानाचे चिंताजनक चित्र असताना आता श्रीरामपूरमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांची संख्या 38 वर जावून पोहोचली आहे. काल पुन्हा नव्याने 16 जणांचे स्त्रास तपासणीसाठी … Read more

थोडंसं मनातलं : कितीही कठीण प्रसंग आला तरी आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही

नमस्कार मित्रांनो, भारत देशातील लोकांना कायमच अस्मानी सुल्तानी संकटांना सामोरे जावे लागले आहे. कधी निसर्गाचा कोप तरी कधी विषाणू चा उन्माद. आता आपला भारत देश कोरोना सारख्या महामारी ला सामोरे जात आहे. अनेक वेळा माणूस नैराश्य आल्यावर काहीच सुचत नाही म्हणून शेवटी आपला जीव देतो. पण एक प्रश्न ऐरणीवर आला आहे की, काय आत्महत्या हा … Read more

महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल – खासदार सुजय विखे-पाटील

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :   ‘महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल. ज्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचं सरकार मान्य नसेल तर त्यांनी भारतीय जनता पक्षात यावे.त्यांना सत्ता, पद आणि सन्मान देखील मिळेल,’ अशी प्रतिक्रिया भाजप खासदार सुजय विखे-पाटील यांनी दिली आहे. विखे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेतली व करोना अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनामुळे आणखी एक रुग्णाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  बुधवारी संगमनेर तालुक्यातील श्रमिकनगर येथील पुरुषाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. शहरातील ऑरेंज कॉर्नर येथील ५९ वर्षीय पुरुष व ७३ वर्षीय महिला, गणेश नगर येथील ६५ वर्षीय पुरुष आणि निमगावजाळी येथील २८ वर्षांची महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संगमनेरमधील बाधितांचा आकडा १६९ झाला आहे. यातील १५३ व्यक्ती मूळ रहिवासी आहेत, … Read more

‘या’ भागात आढळले आज कोरोनाचे 27 रुग्ण ,जाणून घ्या सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी २७ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले असून २०६ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह,  आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. आज आढळलेल्या रुग्णांत संगमनेर – ११ शेवगाव – ५ श्रीरामपूर – ३ पारनेर – ४,नगर शहर – १ अकोले – ३ येथील रुग्णांचा समावेश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज २७ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी २७ जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे. आज आढळलेल्या रुग्णांत संगमनेर – ११ शेवगाव – ५ श्रीरामपूर – ३ पारनेर – ४,नगर शहर – १ अकोले – ३ येथील रुग्णांचा समावेश आहे.  दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातील २६ रुग्णांनी … Read more

पारनेर मधील महाविकास आघाडीची धुरा आमदार निलेश लंके यांच्याकडेच !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   पारनेर नगरपंचायतीतील त्या पाच नगरसेवकांनी पुन्हा बुधवारी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. विशेष म्हणजे आमदार निलेश लंके यांनी पाच जणांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नेले. यापुढे हे सर्व नगरसेवक आ. लंके यांच्याच नेतृत्वाखाली काम करतील. त्याचबरोबर पारनेर तालुक्यामधील महाविकास आघाडीची धुरा सुद्धा त्यांच्यावरच असेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आ. निलेश लंके … Read more

कोरोना ब्रेकिंग : चार जणांना कोरोना; एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  संगमनेर शहरात आज ऑरेंज कार्नर आणि गणेशनगर परिसरात कोरोनाचे चार रुग्ण आढळले आले आहेत.तर निमगाव जाळी येथे देखील एका तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आज श्रमिकनगर येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता पुन्हा चार रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाने १६९ चा आकडा गाठविला … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ गुरुवारी जिल्हा दौर्‍यावर

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे गुरूवार दि. 9 जुलै 2020 रोजी जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा जिल्‍हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. सकाळी 6-30 वाजता मुंबई येथुन संगमनेरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता संगमनेर येथे जिल्‍हाधिकारी, जिल्‍हा पोलीस अधिक्षक, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, प्रांताधिकारी, पोलीस उपअधिक्षक, … Read more

या’ तहसीलदारांची धडक कारवाई;केले असे काही …

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या शासकीय नियामांचे पालन न करणार्‍या एका होलसेल किराणा दुकानासह बेजाबदारपणे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :   नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्षय संजय बोरुडे (वय १८) असे मृतकाचे नाव आहे. मंगळवारी (७ जुलै) रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनीशिंगणापूर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. अहमदनगर Live24 वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात कोरोनाची परत एन्ट्री

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  जामखेड तालुक्यातील मोहरी येथे एक व लोणी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे मोहरी व लोणी येथील मुख्य प्रवेशद्वारावर पत्रे अडवे लावुन हा रस्ता बंद केला आहे. सध्या जामखेड तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकुण संख्या चार झाली आहे. जामखेड तालुक्यातील मोहरी येथील एका … Read more

कारवाई करण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यास दुकानदाराकडून मारहाण

अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेले नियम मोडल्याप्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला दुकानदाराने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शेवगावमधील चापडगाव येथे घडला. कोरोनाचे संक्रमण महाराष्ट्रात लक्षणीय आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासाठी प्रशासनाने अनेक नियम बनविले … Read more