या तालुक्यातील बाधितांचा आकडा वाढला ! वाड्या-वस्त्यांवर कोरोना पोहोचला..

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   संगमनेर शहरातील सय्यद बाबा चौकातील ७० वर्षीय पुरुष व कुरण येथील ६३ वर्षीय महिलेचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. यामुळे बाधितांचा आकडा ११३ झाला आहे. बाधितांपैकी मूळ रहिवासी ९८ आहेत. तालुक्याबाहेरील १५ रुग्ण असून ९२ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. १० रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून ११ जणांचा बळी कोरोनाने घेतला … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ते कोरोनाबाधित आमदार ‘इथे’ घेणार उपचार !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात 34 जणांना संसर्ग झाला आहे. कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला गाठले.  नगर उत्तरमधील एका मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे हे लोकप्रतिनिधी सावेडीचे रहिवाशी आहेत. संसर्ग झालेले लोकप्रतिनिधी साहित्यप्रेमी आहेत. विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधीने एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली … Read more

राहुरी तालुक्यात आणखी दोन रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   राहुरी तालुक्यातील केसापूर व देवळाली प्रवरा येथे दोन कोरोना रूग्ण शुक्रवारी आढळले. त्यामुळे एकूण संख्या सहा झाली. यापूर्वी आलेले दोन पाहुणे कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईला विवाहासाठी गेलेला केसापुरातील युवक बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने गावातील रूग्णांची संख्या चार झाली. देवळालीप्रवरा येथे शिर्डीहून आलेला महावितरणचा वरिष्ठ अधिकारी बाधीत असल्याचे निदान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा उद्रेक झालेला आहे.कोरोना विषाणूने अहमदनगर जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधींला आज गाठले. अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेतील एका आमदारांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.या आमदारांनी एका सरकारी कार्यालयात नुकतीच बैठक देखील घेतली होती. कोरोनाबाधित अधिकाऱ्यासमवेत बैठकीला उपस्थित असलेल्या या आमदारानी स्वत:ला होम क्वारंटाइन करून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले , एकूण कोरोनाबाधित @544 !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात सायंकाळी आणखी १० रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यात आज सायंकाळी १० रुग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहर ०२, कोपरगाव ०३, पाथर्डी ०१, मुंगी (शेवगाव) ०१, नेवासा फाटा (नेवासा) ०१, श्रीरामपूर ०१ आणि कासार दुमाला (संगमनेर) ०१ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. दरम्यान आज सकाळी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स :110 जणांचे अहवाल निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सायंकाळी 110 व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

मृतदेहाचे तुकडे केलेल्या त्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले ! मामा व आजोबाने केले कोयत्याने तुकडे …

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  काल अकोले तालुक्यात एका तरुणाचा खून करून मृतदेहाचे तुकडे करत गोण्यात भरून नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली होती. वाकी शिवारात एका अद्यात तरुणाचा खुन त्याच्या मृतदेहाचे तुकडे येथील कृष्णावंती नदीच्या पात्रात फेकून दिले होते. त्या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडले असून मयत तरुणाच्या मामा व आजोबानेच त्याचा … Read more

तारखा देणाऱ्या इंदुरीकरांनाच कोर्टाची तारीख ! या दिवशी रहावे लागणार हजर ..

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत न्यायालयाने आज त्यांच्याविरोधात प्रोसेस इश्यु केली आहे. इंदुरीकर महाराजांना कोर्टाने समन्स बजावलं आहे. त्यानुसार त्यांना ७ ऑगस्टला कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे. प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज अर्थात निवृत्ती महाराज देशमुख यांनी त्यांच्या किर्तनात … Read more

मोठी बातमी : अहमदनगरमध्ये ‘या’ तारखेपर्यंत संचारबंदी !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना रुग्ण वाढत असल्याने संचारबंदी आणखी कडक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी आणखी कडक करण्यात आली आहे, असा आदेश शुक्रवारी (दि.३ जुलै) जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी काढला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुणालाही कोणतीच परवानगी असणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीशी अनैसर्गिक शारीरिक संबंध करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  पत्नीशी बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध प्रस्थापित करीत अत्याचार करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही खळबळजनक घटना पाथर्डी तालुक्‍यातील पिंपळगाव टप्पा भागात उघडकीस आली. माहेरी आलेल्या पत्नीकडे आरोपी निलेश दादू ससाणे हा तेथे येवून मी तुला घेवून जाण्यासाठी आलो आहे, असे म्हणत पत्नीशी लगट करून मला तुझ्याशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 24 कोरोना रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :  आज अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये २४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नगर शहरातील १४ यामध्ये सिद्धार्थ नगर ०५, पद्मा नगर ०३, नालेगाव ०२, दसरेनगर ०१, चितळे रोड ०१, अवसरकर मळा, सारसनगर ०१, कलानगर ०१ भिंगार ०२, संगमनेर तालुका ०२ (कुरण आणि एस. बी. चौक, … Read more

आता ‘या’ पिकाचा पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये झाला समावेश

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :कोपरगाव तालुक्याचा मका पीक विमा योजनेत समावेश नसल्यामुळे मका पिकाचे नुकसान होऊन मका उत्पादक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित रहात होते. त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा समावेश व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा पंतप्रधान पीक विमा … Read more

सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घरात, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यांच्यावरील जनतेचा असलेला विश्वास आणखी वाढला असून देशात आलेल्या कोरोना महामारीच्या संकटाला केंद्र सरकार धैर्याने तोंड देत आहे, नागरिकांच्या सुख- दुःखात सहभागी होण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते घरात, तर भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सर्व स्तरावर मदत करत असल्याचे चित्र … Read more

पारनेर मधील एका रुग्णास कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार गावामध्ये ४२ वर्षीय व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याने प्रशासनाने सतर्क होत अत्यावश्यक सेवा वगळता तेथील सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १३ नागरिकांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून त्यांचे अहवाल आल्यानंतरच कान्हूर पठार येथील लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यात येईल. दरम्यान, बाभुळवाडा येथील व्यक्तीच्या … Read more

Blog : थोडंसं मनातलं – अहमदनगर मधील बेफिकीरीला आता नक्की चाप बसणारच ! ॲड शिवाजी कराळे 

नमस्कार मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांसाठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे तसेच अनेक रूग्ण बरे झाले आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. सध्या बुथ हाॅस्पिटल कोरोना बाधीत रूग्णांनी फुल्ल भरले आहे. कोरोनाचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा  प्रशासन, पोलिस प्रशासन आणि महापालिका प्रशासन आणि सर्व सुजाण  नागरिकांनी एकत्र मिळून ही लढाई लढणे गरजेचे आहे. अनलाॅकडाऊन भाग 2 मध्ये शहरात  प्रशासनाने … Read more

कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार सुरू

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :केंद्र व राज्य शासनाच्या परवानगीने आता कोरोना रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार सुरू झाले आहेत. श्रीरामपूर येथील त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्थेला कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी मिळाली असून संगमनेर व श्रीरामपुरात ही संस्था रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करणार आहे. त्रिमूर्तीचे डॉ. महेश व डॉ. मंजिरी क्षीरसागर यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर … Read more

इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनात शिवसेना महिला संघटना

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 :निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर दाखल झालेली तक्रार मागे घेण्यासाठी संगमनेर शिवसेना महिला संघटना, गोवंश हत्या विरोधी संघटना तसेच संगमनेर शिवसेनेच्या वतीने पोलिस व महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. महाराजांच्या समर्थनार्थ अनेक संघटना आता सरसावल्या आहेत. निवृत्ती महाराजांवरील तक्रार मागे घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पोलिस निरीक्षक अभय … Read more

अहमदनगरच्या या भूमिपुत्राने केले विठुरायाच्या महापूजेचे चित्रिकरण !

अहमदनगर Live24 टीम ,3 जुलै 2020 : यंदाच्या कोरोनाच्या संकटाच्या सावटाखाली काल संपूर्ण महाराष्ट्राने आषाढी एकादशी साजरी केली. संकटातही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. ही महापूजा महाराष्ट्राने दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहिली. नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे या शासकीय महापूजेच्या या प्रक्षेपणाचे चित्रिकरण नगरचे भूमिपुत्र अर्जुन सब्बन यांनी केले. यंदाच्या शासकीय महापूजेच्या … Read more