बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली आणि ….

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर येथील आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर मंगळवारी रात्री बिबट्याने युवकावर हल्ला केला. सादिक फकिरमंहम्मद शेख (२३, माळेवाडी) असे जखमी युवकाचे नाव आहे. मध्यरात्री १ वाजता सादिक शेख चुलते अहमद शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरून जात होता. आश्वी-निमगावजाळी रस्त्यावर चतुरे वस्तीलगत अंधारात बिबट्याचे बछडे त्याला दिसले. ते थांबले असता … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी ९ व्यक्ती बाधित !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज सायंकाळी पुन्हा ०९ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यातील ०८ जण नगर शहरातील वाघ गल्ली, नालेगाव येथील आहे. तर एक जण संगमनेर तालुक्यातील कुरण येथील आहे. इतर ५५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more

फक्त केस कापण्यासाठी सलून सुरु करण्यास परवानगी, दाढी करण्यासाठी नाही !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  गेल्या अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद असलेल्या सलून चालकांना अखेर दिलासा मिळाला आहे. २८ जूनपासून सलून सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून  बंद ठेवण्यात आली होती. राज्यात २० मार्चपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला … Read more

बैलगाडीतून आले वऱ्हाड, पारंपारिक पद्धतीने जोडली विवाहाची गाठ !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी आहे. त्यांनी दिलेले संस्कार, परंपरा व विचार दिवसेंदिवस लोप पावत चालले आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्य या गोष्टींपासून दूर होत चालला आहे. लग्न सोहळा दिवसेंदिवस मोठ्या थाटामाटात करण्याची प्रथा वाढत गेली आहे. परंतु नगर तालुक्‍यातील देऊळगाव सिद्धी येथील रावसाहेब ज्ञानदेव जाधव यांनी आपल्या … Read more

ऑनलाइन शिक्षण तात्काळ बंद करावे

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : कोरोना महामारीच्या काळात शिक्षण संस्थांना शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत सुचना आहेत व कोरोनाचा फैलाव होवू नये याकरिता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात न येता ऑनलाईन वर्ग भरवून शिकवले जात आहे. या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणात अनेक शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित राहावे अशी ताकीद देत असून सिलाबस बुडाला तर त्यास … Read more

पेट्रोल-डिझेलचे दर कमी न केल्यास काँग्रेस तीव्र आंदोलन करील

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :   इंधनाच्या किंमती कमी करुन कोरोनाच्या प्रादुर्भावाने होरपळणार्‍या जनतेला दिलसा देण्याचे काम भाजपचे केंद्र सरकार करणार आहे का? अच्छे दिन याला म्हणावयाचे का? असा सवाल उपस्थित करत पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती कमी करण्याची मागणी अहमदनगर शहर काँग्रेस पक्षाने केली आहे.   शहर काँग्रेस, भिंगार काँग्रेस, महिला काँग्रेस आणि पक्षाच्या अल्पसंख्यांक … Read more

अहमदनगर झाले थ्री स्टार; मिळणार २५ कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. नगर शहर म्हटले की डोळ्यासमोर अस्वच्छता खराब रस्ते असे चित्र उभे राहायचे. यामुळे नगरला सुधारित खेडे असे उपहासाने शहराबाहेरील लोक म्हणत. मात्र गेल्या आठ महिन्यापासून नगर शहराने स्वतःची ओळख बदलली आहे. स्वच्छ शौचालये … Read more

मोठी बातमी : जिल्ह्यात पुढील ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  पुढील तीन दिवसांत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक,धुळे,जळगाव,नंदुरबार तसेच पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अहमदनगर जिल्ह्यत येत्या ३ दिवसात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात यावर्षी १ जून पासूनच दररोज कमी अधिक … Read more

युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांचे बँकेच्या दारात आंदोलन

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : शेतक-यांना बँकेने शेती पिक कर्ज लवकर अदा करावे या मागणीसाठी युवा नेते विक्रमसिंह पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत कोळगांव येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, च्या शाखेसमोर समोर आंदोलन केले. खरीप हंगाम सुरु झाला आहे.शेतक-यांना नवीन बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत, पैसे नसल्याने त्यांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत … Read more

कोरोना रुग्ण आढळल्याने शहरातील हे दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र जाहीर

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  सिध्दार्थ नगर आणि तोफखाना परिसर कंटेनमेंट झोन घोषित. महानगर पालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आदेश जारी. कोरोना रुग्ण आढळल्याने शहरातील हे दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत. सिद्धार्थनगर परिसर सिद्धार्थनगर, सारडा कॉलेजची पाठीमागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक … Read more

पाठपुराव्यामुळेच विकासकामे मार्गी लागतात : आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांना बरोबर घेऊन विकासाचे काम केल्यामुळे नगर शहरात विकास कामे दिसू लागली आहे. विकास कामात कोणीही पक्षीय राजकारण आणू नये. नगर शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहे. शहरातील प्रभागामध्ये विकास कामे व्हावी, यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते. नगरसेवक कुमारसिंह वाकळे … Read more

रामदेव बाबांच्या कोरोना औषधावर ठाकरे सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे. परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर कोरोनील हे आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. पतंजलीकडून कोरोनिल औषध हे लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे, अशी घोषणाही … Read more

नागाच्या 26 पिल्लांना जीवनदान, सेव्ह अ‍ॅनिमल टिमच्या सर्पमित्रांना यश !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  वनविभागाच्या मदतीने नाग जातीच्या सापाच्या 26 अंड्यातून 26 पिल्ले जन्माला घालण्यात अकोले येथील सेव्ह अँनिमल टिमच्या सर्पमित्रांना यश आले आहे. ही सर्व नागाची पिल्ले जंगलात सोडून देण्यात आली. याबाबत माहिती अशी की, अगस्ती सहकारी साखर कारखाना परिसरात मंगेश नाईकवाडी हे आपल्या शेतात काम करत असताना एक नाग जेसीबीखाली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना अपडेट्स : आज पुन्हा १२ रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील ६ रुग्ण बरे होऊन परतले घरी तर नव्या १२ रुग्णांची भर अहमदनगर जिल्ह्यातील ०६ कोरोनाग्रस्त रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे. जिल्ह्यात कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता २६० इतकी झाली आहे. तर, आज जिल्ह्यात आणखी बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरातील वाघ … Read more

आ. निलेश लंकेंची माजी आ. औटींवर टीका म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : मतदारसंघात आघाडी सरकारच्या काळात अनेक विकासकामे मार्गी लागली असुन 15 वर्षांपासुन पारनेरचा विकास हा टक्केवारीत अडकला असल्याची टीका आ.निलेश लंके यांनी केली आहे. कोहकडीत विविध विकास कामाचे भूमिपूजन आ.लंके यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोहकडी परिसरातील आ.विजय औटी यांचे अनेक समर्थक राष्ट्रवादीच्या गोटात सामिल झाले आहेत. पारनेर-नगर मतदार … Read more

…पुन्हा एकदा जावई ठरला डोकेदुखी …गावात आला कोरोना घेवून !

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा कोरोणाचा शिरकाव झालाय आणि यावेळी जावई जामखेड करांसाठी त्रासदायक ठरला आहे. कोरोना चा अहवाल येताच या व्यक्तीच्या संपर्कातील जवळके गावातील त्याच्या सात नातेवाईकांना नगर येथे हलविण्यात आले आहे. मुंबईला सासर्‍याला भेटायला गेलेल्या तालुक्यातील जवळके येथील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली असून त्याचा रिपोर्ट बुधवार … Read more

‘त्याचा’ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन पुन्हा सतर्क

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील ३८ वर्षीच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने श्रीरामपुरातील प्रशासन पुन्हा सतर्क झाले. तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे. निपाणीवाडगाव येथील व्यक्तीला त्रास जाणवू लागल्यानंतर तो ग्रामीण आरोग्य रुग्णालयात गेला. वैद्यकीय अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांनी तपासले असता त्यांना कोरोनाचा संशय आला. त्याला पुढील … Read more

नगर-पुणे रस्त्यावर ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने पतीचा मृत्यू ,पत्नी गंभीर

अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 :  नगर-पुणे रस्त्यावर सुपे (ता. पारनेर) शिवारात सुपे औद्योगिक वसाहत चौकात बुधवारी सकाळी झालेल्या विचित्र अपघातात पतीचा मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली. मच्छिंद्र कोंडिबा वाबळे व त्यांची पत्नी कल्पना (घाणेगाव, ता. पारनेर) हे दुचाकीवरून (एमएच १६, बीई ४०९५) नगरच्या दिशेने जात असताना सुपे औद्योगिक वसाहत चौकात एचपी … Read more