धक्कादायक : जेलमधील आरोपीला कोरोनाची लक्षणे !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पोलीस ठाण्यातील एका आरोपीला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने संबंधित आरोपीला कोरोना चाचणीसाठी अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी दराडे यांनी दिली आहे.  पाथर्डी पोलीस ठाण्यातील जेलमध्ये पोलीस कोठडीतील एका 26 वर्षीय आरोपीला आज (14) रोजी ताप ,सर्दी ,खोकला याचा त्रास होऊ लागल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी तात्काळ आरोग्य … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील 8 कोरोनाग्रस्त परतले घरी, आता राहिले फक्त ‘इतके’रुग्ण !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील आठ कोरोनाग्रस्त आज या आजारातून बरे होऊन घरी परतले. त्यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, संगमनेर ०३, राहाता ०२, नगर शहर ०१, कोपरगाव ०१ आणि शेवगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २०६ झाली आहे, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. … Read more

विकासाचा भगीरथ सदैवं नामदार साहेब !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्ह्याची भूमी थोर संतांची, ऐतिहासिक परंपरा लाभलेला जिल्हा. यामध्ये असंख्य थोर शिक्षण तज्ञ सहकाराच्या पंढरीमध्ये विविध व्यवस्थेचा उगम झालेला आहे. यातच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ. मा. खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्याच विचारावर वाटचाल करणारे माजी मंत्री आमदार श्री राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील … Read more

आमदारांनी कार्यक्रमाचे आयोजन केलेच नव्हते…आ.जगताप समर्थकांचा दावा

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थिती लोकप्रतिनिधींनी नागरिक व प्रशासनातील दुवा बनून प्रतिबंधात्मक उपाय व मदतकार्य यावर भर देणे अपेक्षित असताना स्वतः आमदारानेच नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आमदार जगताप यांचे निवासस्थान असलेला परिसर कंटेन्मेंट झोन केला होता. आज अनेक लोकप्रतिनिधींनी आपले वाढदिवस … Read more

…आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड… विजय औटी यांची आ.नीलेश लंकेवर टीका !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : विद्यमान लोकप्रतिनिधींच्या कामकाजाची तुलना माझ्या १५ वर्षांच्या कारकिर्दीशी होणार आहे. ते सोपे नाही. लग्न करणे सोपे आहे, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत संसार निभावणे अवघड असते. त्यामुळे पुढचे दिवस आपलेच आहेत. वर्ष, दीड वर्षाच्या कालावधीत तुम्हाला सगळे सुरळीत झालेले दिसेल. आपण रण सोडणारी माणसं नाहीत. शिवसैनिक कधीही रण सोडत नसतो, … Read more

नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करुन …

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या करुन जीवन संपवल्याचे वृत्त हे अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्याने अशा पद्धतीने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या निधनाने चित्रपटसृष्टीने एक तरुण प्रतिभाशाली अभिनेता गमावला आहे, अशा शब्दांत महसूलमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी … Read more

‘तो’रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत शाळा रहाणार बंदच !

अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील शेवटचा कोरोना रुग्ण बरा होत नाही, तोपर्यंत नगर तालुक्यातील एकही शाळा भरवणार नाही. या बाबतचा ठराव १२ जूनला झालेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी दिली. दरवर्षी १५ जूनपर्यंत सर्व शाळा सुरू होतात, परंतु या वर्षी कोरोनामुळे शाळा उघडण्याची तारिख पंधरा … Read more

जिल्ह्यातील ‘या’ भागात कोरोनाचे रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :जिल्ह्यात रविवारी दिवसभरात कोरोनाच्या ७ रुग्णांची भर पडली. नगर शहर ४, राहाता १, तर संगमनेर येथे २ रुग्ण आढळले. यापैकी एक व्यक्ती मुंबईहून आलेली आहे. नगर शहरातील कल्याण रस्ता भागात ५५ वर्षांची महिला, केडगाव येथील २९ वर्षीय व्यक्ती, १६ वर्षांची मुलगी १२ वर्षांचा मुलगा बाधित आढळला. राहाता येथील खंडाेबा चौकातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवभोजन थाळी ‘फसवणूक’ महिलेसह तिघांवर गुन्हा !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अहमदनगर शहरात शिवभोजन केंद्रासाठी थेट अन्न-औषध प्रशासनाचा बोगस परवाना देऊन परवानगी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन शिवभोजन केंद्र चालकांसह त्यांना अन्न व औषध प्रशासनाचा बोगस परवाना देणारी व्यक्ती, अशा तीन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद बाळासाहेब मरकड , स्वप्नील जयसिंग निंबाळकर व गायत्री … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’खून प्रकरणाचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :शिर्डी बस स्थानकाच्या समोरील सार्वजनिक शौचालयामध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना 13 रोजी घडली होती, या घटनेचा अवघ्या बारा तासात पोलिसांनी शोध लावला आहे  या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना हत्या प्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शिर्डी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. अज्ञात … Read more

‘त्या’ बंगाली मुलीमुळे अभिनेता सुशांतसिंग होता त्रस्त ? न्यायालयीन चौकशीची कुटुंबीयांची मागणी

अहमदनगर Live24 टिम : अभिनेता सुशांत सिंग याने आज गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण इंडस्ट्रीवर त्यामुळे शोककळा पसरली आहे. सुशांतने आत्महत्या का केली? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सुशांतच्या मामांनी या मृत्यूची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सुशांत एका बंगाली मुलीमुळे त्रस्त होता. … Read more

२०२४ मध्ये सुशांतला जायचं होत त्याने चंद्रावर खरेदी केलेल्या जागेवर पण…

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : अभिनेता सुशांत सिंग याने आज गळफास घेत आत्महत्या केली. संपूर्ण इंडस्ट्रीवर त्यामुळे शोककळा पोहोचली. परंतु सुशांतची सुरवातीची कमाई २५० रुपये होती. परंतु त्याने कष्टाच्या जोरावर खूप प्रसिद्धी आणि पैसे मिळवला. त्याने चंद्रावरदेखील जमीन खरेदी केली होती. चंद्रावरील जमिनीचा एक तुकडा सुशांतने खरेदी केला होता आणि याच ठिकाणी जाण्याचं त्याचं स्वप्न … Read more

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :  बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवले आहे. सुशांतने मुंबईतील फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवल्याने बॉलिवूड हादरुन गेलं आहे.आत्महत्येमागील कारण सध्या अस्पष्ट आहे. दरम्यान, सुशांतच्या आत्महत्या केल्याची माहिती मिळताच मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.सुशांतने नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं … Read more

मतदारसंघाचा कायापालट हीच विकासपूर्तीची संकल्पना : आमदार लंके

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : विकासाच्या माध्यमातून मतदारसंघाचा कायापालट करणे हीच आपली विकासपूर्तीची संकल्पना असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले. देवीभोयरे येथील विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सीमा जाधव होत्या. यावेळी शिवाजीराव जाधव, उपसरपंच दत्तात्रय बेलोटे, अशोक मुळे, माजी सरपंच विठ्ठल सरडे, संपत वाळुंज, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :शिर्डी खूनप्रकरणी दोघेजण ताब्यात !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : शिर्डी बस स्थानकासमोरील व साईबाबा रूग्णालयाच्या लगत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजू माळी व सुनील तांबोरे अशी त्या आरोपीची नावे आहेत. शनिवारी सकाळी ३५ वर्ष वय असलेल्या तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. यातील … Read more

अरेरे ! कोरोनामुळे त्यांच्या स्वप्नांचा झाला चुराडा

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : शेवगाव तालुक्‍यातील ४८ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलै ते डिसेंबर २०२० अखेरीस संपत आहे. मात्र कोरोनामुळे या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्‍यता असून लवकरच संबधीत ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केला जाणार आहे. यामुळे भावी सरपंच होऊ पाहणाऱ्या अनेकांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. मागील काही वर्षापासून शासनाने ग्रामपंचायतीला खर्च करण्याचे अतिरिक्‍त अधिकार दिल्यामुळे … Read more

पर्यटकांसाठी ‘कळसुबाई’ बंद !

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाय म्हणून अनेक मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वांत उंच असलेले कळसुबाई शिखर पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी येथे येण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन देवस्थान व ग्रामपंचायत यांच्या वतीने केले आहे. भंडारदरा हे पर्यटनस्थळ नेहमी पर्यटकांनी गजबजलेले असते. … Read more

महिलेस अश्लील मेसेज पाठवल्याने एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :एका डॉक्टर महिलेच्या व्हॉटस्‌अपवर ९ जूनपासून वेगवेगळया चार नंबरवरून अश्लील मेसेज करून ‘एक अज्ञात व्यक्‍ती मुद्दाम त्रास देत आहे. याबाबत महिलेच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१२) शत्री उशिरा अज्ञात व्यक्‍ती विरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास कोपरगाव पोलीस करीत आहेत. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती … Read more