आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात ‘ही’ व्यक्ती झाली सक्रीय !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शेतीचे नवनवीन उपक्रम सुरू असतानाच आता त्यांचे वडील तथा बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे मुलाच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. चार दिवसांत २४ ठिकाणी त्यांनी चर्चासत्रे घेतली. ट्रस्ट व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी हिताच्या योजनांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. … Read more

शेळ्या चारण्यासाठी गेलेला शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  शेळ्या चारण्यासाठी गेलेला शेतकरी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाला. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास जामगाव शिवारात ही घटना घडली. केरू मोहन घावटे (४०) हे सकाळी शेळ्या घेऊन गोरेगाव शिवारातील ढवळदरा परिसरात गेले होते. कळप पाणी पिऊन आल्यानंतर एक शेळी आली नाही, म्हणून घावटे यांनी जवळच्या झुडपात दगड मारला, परंतू झुडपातून … Read more

जीपच्या सीटखाली तलवारी ठेवून त्या विकायला निघालेल्या ‘त्या’ तरुणांसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : जीपच्या सीटखाली तलवारी ठेवून त्या विकण्यासाठी निघालेल्या चौघांपैकी दोघांना पारनेर पोलिसांनी नगर-कल्याण महामार्गावर धोत्रे टोलनाक्यावर रंगेहात पकडले. अन्य दोघेजण पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाले. शनिवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरून एम एच १६ बी एच ५९८० या जीपमधून अक्षय संजय पोपळे (२७), नजीमुददीन बाबुलाल शेख (४१), सोमनाथ सुरेश पठारे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या कोरोनाबाधित पोलिसाचे थेट राजभवनाशी कनेक्शन !

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील कोरोनाबाधित पोलिसाचे कनेक्शन थेट मुंबईतील “राजभवना”शी निगडित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित पोलिस राज्यपालांच्या ताफ्यातील एका वाहनावर चालक म्हणून काम करत होता, अशी माहिती शनिवारी सायंकाळी स्थानिक प्रशासनाला समजली आहे. दरम्यान, संबंधित पोलिसाच्या पत्नीला व मुलालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तहसीलदार नामदेव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार दरीत कोसळली,दैव बलवत्तर म्हणून…

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : मारुती अल्टोवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार संरक्षक कठडे तोडून ३० फूट खोल दरीत कोसळली. अकोल्याचे तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी नाशिक-पुणे मार्गावरील माहुलीच्या एकल घाटात घडली. मारुती अल्टोमधून (एमएच १२ बीव्ही १२४३) चौघे जण जर्सी गायी घेण्यासाठी आळेफाट्याला जात होते. कार भरधाव असल्याने वळणावर चालकाचा ताबा … Read more

मुंबईहून आलेले आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 : लोणी खुर्दमध्ये मुंबईहून आलेले क्वारंटाइन केलेले आई व मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कातील सहा जणांना तपासणीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती डॉ. श्रीपाद मैड यांनी दिली. लोणी खुर्दमध्ये एका शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. आता मुंबईहून प्रवरानगर येथे भावाकडे आलेली ३४ वर्षांची बहीण व तिचा १० वर्षांचा मुलगा पाॅझिटिव्ह असल्याचे … Read more

पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोना संशयित जावई ….

अहमदनगर Live24 ,8 जून 2020 :  श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे मुंबईहून निघोज येथे आलेल्या जावयास शनिवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. मूळ पारनेरचा रहिवासी असलेला जावई ३० मे रोजी मुंबईहून निघोज येथे पत्नी, मुलगी व मुलासह सासुरवाडीला आला. संस्थात्मक विलगीकरणाऐवजी स्वतंत्र बंगल्यात जावयाचे … Read more

वाचा आजचे राज्यातील कोरोना न्यूज अपडेट्स : 7 जून 2020

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  राज्यात आज १९२४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार ३१४ झाली आहे. दरम्यान, आज ‘कोरोना’च्या ३००७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ४३ हजार ५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख ५१ हजार ६४७ नमुन्यांपैकी … Read more

श्रीगोंद्यात कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन घरी परतला आणि ….

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :  श्रीगोंदे कारखान्यावरील कोरोनाबाधित तरुण आजारावर मात करुन आज घरी परतला. तो येणार हे समजले आणि त्याच्या घराजवळ मित्र आणि नातेवाईक जमले. त्याला घेवून येणारे वाहन आले आणि लोकांनी टाळ्यांचा गजर सुरु केला. तो उतरल्यावर त्याच्या फुलांचा वर्षाव झाला तर काही उत्साही मित्रांनी त्याला अलिंगन देत आनंदोत्सव साजरा केला. यातूनच … Read more

कुकडी पाणीप्रश्न चिघळण्याची चिन्हे : श्रीगोंद्यात शेतकरी करणार जलसमाधी आंदोलन !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कुकडीचे आवर्तन दि.७ पासून सुरू झाले, असे असतानाच कुकडी पाणीप्रश्नी श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कायम अन्याय होत असून, टेल टू हेडच्या नियमात श्रीगोंदयातील शेतकरी मात्र नेहमीच भरडला जात आहे. त्यामुळे खालच्या भागात किती दिवस पाणी जाणार श्रीगोंदयाला पाणी कधी मिळणार याबाबत कुकडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व नियोजन करून माहिती द्यावी व … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही शाळा १ जुलैपासून सुरू होणार !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मोहा गावचे सरपंच शिवाजी डोंगरे यांनी दिली. मोहा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात सरपंच शिवाजी डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सरपंच डोंगरे म्हणाले की जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी … Read more

मित्राच्या मदतीने स्वतःच्या घरात केली चोरी !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : नात्यातीलच एका महिलेने तीच्या मित्राच्या मदतीने घरातून ऐवज लंपास केला आहे. ही घटना पुण्यातील बिबडेवाडी येथे घडली. याप्रकरणी महिलेला अटक केली असून पोलीस तिच्या साथीदाराचा शोध आहेत. एका ३३ वर्षीय व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादिचा चाकणमध्ये व्यवसाय आहे.कोरोनामुळे बँका बंद होत्या. त्यामुळे व्यवसायातून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आले आहे तर २९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. नगर शहरातील पाचपीर चावडी येथील ४८ वर्षीय व्यक्तीला कोरोनची लागण. बाधित व्यक्तीच्या आला होता संपर्कात. राहाता तालुक्यातील निघोज निमगाव येथील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण. प्रवरा नगर येथील ३४ वर्षीय महिला आणि … Read more

त्या महिला डॉक्टरमुळे कोपरगावकरांचा जीव टांगणीला !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : कोपरगाव येथील एका कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कातील पाच व्यक्तींचे स्त्राव शुक्रवारी नगर येथे तपासणीसाठी पाठवले होते. त्या पाचही जनांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शनिवारी आणखी ९७ व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. राहाता तालुक्‍यातील लोणी येथील कोरोनाबाधित व्यक्‍तीच्या संपर्कात आलेल्या कोपरगावच्या महिला डॉक्टरचा अहवाल पॉझिटीव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चांदबीबी महालावर बिबट्याचे अस्तित्व !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   अहमदनगर शहरापासून जवळच असलेल्या चांदबीबी महालावर  बिबट्याचे अस्तित्व आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रविवारी (दि.७) सकाळी नगर मधील अभिजित पाडळकर, पराग गावडे, प्रवीण राठोड व अन्य मित्र रविवारची सुटी असल्याने या भागात फिरायला गेले होते. महालाच्या अलिकडे त्यांना रस्त्यापासून जवळच मोरांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यामुळे रस्ता सोडून ते डोंगर … Read more

तब्बल अकरा महिन्यानंतर व्यापारी महिलेवर गोळीबार करणारा जेरबंद !

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : मागील वर्षी जुलै महिन्यात कोपरगाव शहरातील एका व्यापारी महिलेवर रात्रीच्या वेळी गोळीबार करून फरार झालेल्या अक्षय खंडेरव जगताप (रा.ओमनगर, कोपरगाव) यास पोलिसांनी मंगळवारी रात्री सापळा रचून तब्बल अकरा महिन्यानंतर जेरबंद केले. त्याच्याकडून गुन्ह्यातील गावठी पिस्तूलही ताब्यात घेतल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली. याबाबत सविस्तर … Read more

जावयांमुळे अहमदनगर जिल्हा हैराण ! कोरोनाचा होतोय प्रसार …

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 :   अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीरामपूर व आता शेवगाव तालुक्‍यात जावयांमुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. अगोदरच रुग्णांची वाढती संख्या सर्वाची डोकेदुखी ठरत असतानाच जावयांमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याने जावयांच्या आगमनामुळे अहमदनगर जिल्हा हैराण झाला आहे. शेवगाव तालुक्‍यातील अधोडी येथील भाचेजावई असलेला ४५ यर्षीय व्यक्ती (मुळगाव मालेगाव,ता.गेवराई, जि. बीड) ठाणे जिल्ह्यातील कळव्याहून … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मटकाकिंगला कोरोना आणि त्यानंतर संपर्कात आलेल्या….

अहमदनगर Live24 ,7 जून 2020 : संगमनेर शहरातील नवघर गल्लीतील एका मटकाकिंगला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या एका ४० वर्षीय व्यक्‍तीला देखील कोरोनाची बाधा झाली असतानाच आता त्यात आणखी तिघांची भर पडली आहे. त्यात मोमीनपुरा, नाईकवाडापुरा, सिन्नर तालुक्‍यातील दोडी येथील एका ५९ वर्षीय कोरोनाचे संक्रमणझाल्याचे जिल्हा रुग्णालकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले असल्याची … Read more