कोणीही येईना पुढे… अखेर मुस्लिम युवकांच्या पुढाकारातून ‘त्यांच्या’वर अंत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : आज मनुष्य स्व:केंद्रीत होत आहे, त्यामुळे त्याला इतरांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे राहिलेले असेच चित्र दिसून येते. परंतु समाजात आजही माणुसकी टिकून असल्याचे अनेक उदाहरणेही समोर येत आहेत. नुकतेच मुकुंदनगर येथील रहिवासी किशोर पवार यांचे हृदयविकाराने निधन झाले. अचानक कोसळलेल्या या दु:खद घटनेमुळे कुटूंबिया पूर्णपणे हदरुन गेले. त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर … Read more

नगर शहरातील माळीवाडा व परिसर कन्टेन्मेंट झोन घोषित

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : अहमदनगर शहरातील फुलसौंदर चौक माळीवाडा – पंचपीर चावडी – जुना बाजार रोड – मदवाशाह पीर – बारातोटी कारंजा – इवळे गल्‍ली चौक – वरवंडे गल्‍ली – सौभाग्‍य सदन – विळदकर गल्‍ली – पारगल्‍ली – विशाल गणपती मंदिर उत्‍तर बाजु – आशा प्रोव्‍हीजन स्‍टोअर्स – फुलसौंदर चौक हा भाग कन्टेंमेट … Read more

अहमदनगर जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम वादळी पावसाने १ व्यक्ती मृत्युमुखी

Maharashtra Rain Alert

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : निसर्ग चक्रीवादळाने निर्माण झालेल्या वातावरणाचा परिणाम अहमदनगर जिल्ह्यातही जाणवला. जिल्ह्याच्या काही भागात वादळी पावसाने नुकसानीच्या घटना घडल्या तर अकोले तालुक्यातील लहित बुद्रुक येथील ३२ वर्षीय व्यक्ती घराची भिंत अंगावर पडून मृत्युमुखी पडली. जिल्हा प्रशासनाने तात्काळ यासंदर्भातील प्राथमिक माहिती मागवली. यात काही ठिकाणी घरे पडण्याच्या आणि जनावरे दगावण्याच्याही घटना घडल्या. दरम्यान, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज दिवसभरात 18 व्यक्ती कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  सायंकाळी जिल्ह्यात आणखी १२ नवीन रुग्णांची भर जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथील कोविड-१९ टेस्ट लॅबच्या अहवालात १२ व्यक्तींचे अहवाल पॉजिटिव आढळून आले. आज सकाळी आलेल्या अहवालात ०६ व्यक्तींचे अहवाल पॉजिटीव आले होते तर ६१ जणांचे अहवाल निगेटीव आले. आज दिवसभरात १८ व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. जिल्ह्यातील ९० … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आज पुन्हा 6 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आता दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. आजही अहमदनगर जिल्ह्यात 06 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत शेवगाव तालुक्‍यातील रानेगाव येथीळ 32 वर्षीय युवक बाधित. यापूवी बाधित आढळलेल्या येथील व्यक्तीसोबत हा युवक मुंबईस जाऊन आला होता. पारनेर तालुक्यातील भाळवणी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  जिल्ह्यातील आणखी आठ रुग्ण कोरोनामुक्त. आज या रुग्णांना मिळाला डिस्चार्ज. यात, नगर तालुका, नगर शहर, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, अकोले, राहूरी आणि पारनेर येथील हे रुग्ण. सर्व कोरोनामुक्त झालेले रुग्ण हे बाहेरील जिल्हयातून अहमदनगर जिल्ह्यात आले होते. आतापर्यंत कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या एकूण व्यक्तींची संख्या आता ९० झाली आहे. अहमदनगर … Read more

खासदार डॉ. सुजय विखेंकडून नियमांची ऐशी-तैशी !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : नागरिकांना सोशल डिस्टन्स, मास्क वापरण्याचे ‘ब्रह्मज्ञान’ सांगणाऱ्या महापालिकेतच नियमांची ऐशी-तैशी होत आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या बैठकीत मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसले. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनीही सोयीस्कर भूमिका बजावल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. शहरात कोरोना बाधित रुणांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय कार्यालयासाठी नियमावली शासनाने … Read more

लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचे वीज बील माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले असून, मार्च ते जून महिन्याचे वीज बिल माफ करण्याची मागणी आम आदमी पार्टी अहमदनगर यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी अ‍ॅड.जावेद काझी, भरत खाकाळ, राजेंद्र कर्डिले, दिलीप घुले, रवी सातपुते, संपत मोरे, प्रकाश … Read more

अत्याचार करणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  मुलीला फसवून वेळोवेळी अतिप्रसंग करणार्‍या आरोपी विरोधात पोलीसांकडे दिलेली फिर्याद मागे घेण्यासाठी दमबाजी करुन मानसिक त्रास देणार्‍या आरोपींच्या जाचास कंटाळून अल्पवयीन पिडीत मुलीने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या व्यक्तीविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन सदर व्यक्तींना अटक करण्याच्या मागणीसाठी पिडीत मुलीची आई मनीषा जार्‍हदास भोसले यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एमआयडीसीत एकाचा खून !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भांडणाच्या रागातून परप्रांतियाने युवकाचा गळा दाबून खून केला. नागापूर गावठाण येथे रविवारी रात्री ही घटना घडली.सोनू राजू वाघमारे असे त्याचे नाव आहे. याबाबत नगर एमआयडीसी पोलीसांनी सुनिता परसू कांबळे या महिलेच्या फिर्यादी वरून रावजी विक्रम प्रसाद ( वय २२ रा.नागापूर गावठाण, अ .नगर) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील तो रुग्ण करोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा फॅक्टरी येथील करोना मुक्त झालेल्या एका रुग्णास बुधवारी बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. नगर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. बुधवारी सायंकाळी पर्यंत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या १७७ असून महानगर पालिका क्षेत्र ३५, अहमदनगर जिल्हा … Read more

उत्तर प्रदेशात मुलीची छेड काढल्यावरून तरुणास झाडाला बांधून जिवंत जाळले !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये फतनपूर येथे एका मुलीची छेड काढल्यावरून आरोपी तरुणास काही लोकांनी झाडाला बांधून जिवंत जाळले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही या गुंडांनी हल्ला चढवला. तसेच पोलिसांची दोन वाहने जाळून टाकली. या हल्ल्यात पोलिस जखमी झाले आहेत. भुजेनी गावातील अंबिका पटेल (२२) या तरुणास काही लोकांनी सोमवारी … Read more

पारनेर पाठोपाठ श्रीरामपूरकर देखील पाहुण्यांमुळे संकटात !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मुंबईहून गोंधवणी गावात आलेल्या चौघांपैकी एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आला असून तिघांचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. एक वगळता औरंगाबाद व मुंबई येथून आलेल्या पाहुन्यामुळे आत्तापर्यंत तालुक्यात पाच रुग्ण कोरोनाबधित सापडले आहेत. त्यामुळे श्रीरामपूरकरांनी कितीही काळजी घेतली असली तरी बाहेरून येणाऱ्या पाहुण्यामुळे प्रशासनाबरोबर श्रीरामपूरकरांचीही काळजी वाढली आहे. मुंबई परिसरातील … Read more

ब्रेकिंग : दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भरधाव वेगात असलेलल्या दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२) रोजी कोपरगाव तालुक्‍यातील येसगावमध्ये झाला. कोपरगावकडून येसगाव येथे लताबार्ड पवार व बाळू भोंगळे हे मोटारसायकलवरुन (एम. एच. १७, ए. एस.४६3५) घरी परतत होते, गावामध्ये वळत असताना अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मटका बुकी झाले कोरोनाचे शिकार !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  संगमनेर शहरातील मटका बुकीना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील नवघर गल्ली येथे एक मटका चालविणाऱ्याला कोरोना झाल्याचे उघड झाले असून तो दुसर्‍या मटका बुकीच्या संपर्कात आला होता. तो निमोण येथे जो व्यक्ती मयत झाला होता. त्याच्या संपर्कात हे लोक आल्याचे समोर येत आहे. मयत व्यक्ती … Read more

आता लपतछपत येणाऱ्यांवर कारवाई: राज्यमंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : मागील काही दिवसापासून जिल्ह्यात  कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. यात मुंबई-पुणे कनेक्‍शन मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातून जर कोणी चोरून-लपून येत असेल, त्यांच्यावर कारवाई करा, आशा सूचना नगर विकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रशासनास दिल्या आहेत. राज्यमंत्री तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेची २ वर्षाच्या मुलीसह तलावात आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : शेततळे बांधण्यासाठी ५० हजार रुपये आणावे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने २२ वर्षीय विवाहितेने आपल्या २ वर्षाच्या मुलीसह देवहंडी तलावात आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील धामणवन येथे घडली आहे. घटना समजताच संतप्त नातेवाईकांनी विहितेचा पती पंकज निवृत्ती सोनवणे यांची धुलाई केल्याचे समजते. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती पंकज … Read more

आमदार निलेश लंके यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Nilesh Lanke

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : काल झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे,घराचे किंवा इतर कसले नुकसान झाले असेल तर त्यांनी तात्काळ आपल्या विभागातील संबंधित कृषी सहायक,सर्कल व तलाठी यांच्याशी संपर्क करून पंचनामे करून घ्यावेत. असे आवाहन पारनेर-नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पत्रका द्वारे केले आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या … Read more