खरीप हंगाम : ११ लाख शेतकरी खातेदारांसाठी ८ हजार कोटींची शासनाची हमी – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

सातारा दि. 23 (जिमाका): खरीप हंगामासाठी राज्यातील सुमारे 11 लाख शेतकरी खातेदारांसाठी  8 हजार कोटींची हमी शासनाने घेतली आहे. राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे  शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी  कर्ज उपलब्ध होणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली. ज्या  शेतकऱ्यांनी अल्प मुदतीचे कर्ज घेतले होते, त्यांच्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी … Read more

राज्यातील ६६ लाख विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी ‘महा करिअर पोर्टल’

मुंबई, दि. २३ : करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने … Read more

महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार

मुंबई, दि. २३:  महाराष्ट्र रक्षणासाठी सज्ज झालेल्या कोविड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले असून प्रत्येक कोविड योद्ध्याला उद्देशून लिहिलेल्या पत्रात शस्त्राने नाही तर सेवेने आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे, असे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात, आपल्या सर्वांना वैयक्तिक स्वरूपात पत्र लिहिताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून माझी छाती अभिमानाने फुलून गेली आहे. हीच आपल्या महाराष्ट्राची … Read more

बायोमेट्रिक पद्धत रद्द करणेबाबत एमसीआयकडे आग्रह धरू – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

लातूर दि.२३ : कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापक (डॉक्टर) आणि अन्य कर्मचाऱ्यांना होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी पद्धत रद्द करून हजेरीपटाद्वारे हजेरी घेण्यात यावी, यासाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषद अर्थात एमसीआयकडे आग्रह धरू, असे  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिकद्वारे हजेरी घेण्यात यावी अशा सूचना भारतीय … Read more

दारू पिताना ‘या’ गोष्टींचे करू नका सेवन अन्यथा होईल ‘असे’ काही

 मुंबई : आज अनेकांना मद्यपान करण्याचे व्यसन लागले आहे. परंतु हे व्यसन शरीरासाठी अत्यंत घातक आहे. मद्यपान टाळण्याचा सल्ला नेहमी डॉक्टर्स देताना दिसतात, परंतु अनेकांना दारूसोबत काही गोष्टी खाण्याच्या सवयी असतात.  या ठिकाणी आपण पाहूया के दारूसोबत काय खाऊ नये याविषयी. १) काजू-शेंगदाणे,चिप्स अनेकांना दारूसोबत काजू आणि शेंगदाने खाण्याची सवय असते. हे टाळले पाहिजे कारण … Read more

कडुलिंब व तुळस यांच्या वापराने निस्तेज त्वचा बनवा सतेज

त्वचा सुंदर बनविण्यासाठी अनेक युवती, युवक प्रयत्नशील असतात. आज आम्ही तुम्हाला निस्तेज त्वचा सतेज बनवनियासाठी एक उपाय सांगणार आहोत. कडुलिंब आणि तुळस हे सर्वत्र मिळणार्‍या वनस्पति आहेत. कडुनिंबाची पाने त्वचेला मुरुमांपासून मुक्त करतेच पण या मुरुमांना येण्यापासून प्रतिबंध देखील करते. आयुर्वेदिक उपायांमध्ये तुळस आणि कडुलिंबाची पाने कच्ची खायला सांगितले आहे. हे विषाणुरोधी असते. जे जीवाणूंच्या वाढीस प्रतिबंध … Read more

जाणून घ्या तुळशीच्या पानांचे फायदे

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय लोक तुळशीला सूख-शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. परंतु तुम्हाला माहित आहे का की तुळस अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून काम करते. जाणून घेऊयात हे फायदे-   तुळशीचे फायदे खालीलप्रमाणे –   – तुळशीच्या पानांमध्ये अॅंटिऑक्सिडन्टस गुणांचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे तुमच्या शरिराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास निश्चितपणे मदत मिळते. … Read more

कारलं खाल्ल्याने होतील ‘हे’चमत्कारी फायदे

कारलं हे सर्वसामान्यपणे सर्वत्र आढळून येते. सर्वांच्या आहारात कारल्याचा समावेश असतो. कारले चवीला कडू असले तरी पित्त, त्वचारोग, बद्धकोष्ठता आणि मधुमेह यावर रामबाण आहे.  कारले हे आपल्याला कोणत्या आजारांपासून दूर ठेवते हे जाणून घेवूयात १) श्वसनआजार होतील दूर –  कारल्यात अँटि-इन्फ्लेमेटरी घटक असतात ज्यामुळे श्वसनप्रणाली सुधारते. सर्दी, खोकला, ताप अशा समस्या दूर होतात. छातीत भरून आल्यास आणि नाकात सर्दी … Read more

‘अर्सेनिक अल्बम ३०’ बाबत जाणून घ्या ‘हे’सत्य

मुंबई/प्रतिनिधी आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या गोळ्यांचे सेवन करण्याचा सल्ला नागरिकांना दिला. त्यामुळे ठिकठिकाणी या गोळ्यांचे वाटप संस्था आणि तसेच राजकारण्यांकडून केले गेले. झोपडपट्टी परिसरात तसेच पोलीस आणि अन्य कोविड योद्ध्यांनाही त्या वाटल्या जात आहेत. मात्र त्याचे सेवन करण्यापूर्वी व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी आवश्यक असल्याने होमिओपॅथिक डॉक्टरचा सल्ल्यानेच त्यांचे सेवन करणे गरजेचे … Read more

काळजी वाढविणारी बातमी आणखी दोन महिलांना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. दिनांक १९ मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ७४ झाली असल्याची … Read more

मधुमेह टाळण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय

नवी दिल्ली रक्तातील साखर अनियंत्रित झाली की मधुमेहाचा त्रास होता. बदलती जीवनशैली, बैठी कामे, फास्ट फूडचे प्रमाण, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचे प्रमाण जास्त वाढले आहे. मधुमेहींना बाकीचे आजार होतात कारण त्यांची प्रतिकार क्षमता कमी झालेली असते. १. सातत्याने शारीरिक हालचाली सुरू ठेवा : नृत्य करणे, खेळणे, भरभर चालणे यामुळे टाईप टू डायबेटीसची शक्यता ३० टक्क्यांनी … Read more

तुम्हाला चालण्याची सवय आहे ? आता उलटे चाला, हे होतील फायदे

चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. बरीच लोकांना सकाळी किंवा सायंकाळी चालण्याची सवय असते. परंतु यात थोडा बदल करून उलटे चाललात तर?  स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार उलटे चालणे आणि धावणे हा चांगला कार्डिओ आहे. याचा वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक रचनेसाठी देखील फायदा होईल असे म्हटले आहे. जाणून घेऊयात आणखी काही फायदे – १) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आता या तालुक्यातही आढळला कोरोनाचा रुग्ण

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही आता कोरोनाचा रुग्ण आढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मुबंईहुन संबंधीत शिक्षक(वय 56) व त्यांचा मुलगा आपल्या मूळगावी लिंगदेव येथे आले होते. दिनांक 13 मे रोजी मुंबईहून लिंगदेव येथे आल्यावर त्यांना कोरंटाइन करण्यात आले होते. काल त्यांची कोरंटाईनची मुदत संपल्याने स्थानिक डॉक्टरच्या सल्ल्यानुसार संगमनेर येथील एका … Read more

धक्कादायक! नवजात जुळे बालक कोरोनाग्रस्त

सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असून अबाल वृद्धांपर्यंत कोणालाही याची लागण होऊ शकते. नुकतीच गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यात जनमालेल्या नवजात जुळ्या बाळांना करोनाची लागण झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. ही जुळी बाळं करोनाची लागण झालेले सर्वात लहान वयाचे रुग्ण ठरले आहेत. या बालकांची आई मोलीपूर गावात राहत होती. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. १६ मे रोजी महिलेने … Read more

‘या’ अभिनेत्याचा व त्याच्या गर्लफ्रेंडचा संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता ग्रेगरी टायरी बॉयस  आणि त्याची गर्लफ्रेंड नेटली यांचा संशयास्पद मृत्यू झाला असून या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. ग्रेगरीच्या भावाला त्याच्या घरी हे दोघे मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाशेजारी त्यांना पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. या पावडरमुळेच त्यांचा मृत्यू झाला की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. बीबीसीने दिलेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 3 कोरोनाबाधित झाले कोरोनामुक्त,आज बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज …

अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड-१९ चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली असून आज १५ व्यक्तीचे घशातील स्त्रावांची तपासणी करण्यात आली. त्यातील १० अहवाल निगेटीव आले असून एका अहवालाचा निष्कर्ष निघाला नसून उर्वरित ०४ व्यक्तींचे अहवाल पुन्हा तपासले जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान, आज … Read more

क्रिकेट प्रेमींची निराशा ; ट्वेन्टी-२० स्पर्धा लांबणीवर?

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच गोष्टी बंद ठेवण्यात आले आहेत. यातून क्रीडा क्षेत्रही वगळले गेले नाही. सध्या सर्वच सामने बंद आहेत. आता ऑस्ट्रेलियात रंगणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पुढे ढकलण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून पुढील आठवडय़ापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) याविषयी अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची निराशा होणार आहे. नियोजित वेळापत्रकानुसार १८ ऑक्टोबर … Read more

विनाकारण फिरणाऱ्या कोरोनामुक्त झालेल्या दोघांवर गुन्हा

सध्या कोरोनाचा प्रसार पाहता प्रशासन खूप काळजी घेत आहे. संचारबंदीचे अनेक नियम लागू केले आहेत. परंतु नागरिक म्हणावे असे सहकार्य प्रशासनास करत नाहीत. अशीच एक घटना मुकुंदवाडी भागातील संजयनगर व रामनगर भागात बरे झालेले कोरोना रुग्णांबाबत घडली आहे. बरे झाल्यानंतर घरात बसने गरजेचे असतानाही ते पुन्हा फिरत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यांनतर त्यांनी त्यांच्यावर दोन … Read more