समग्र शिक्षा अभियान : मोफत पाठ्यपुस्तकांच्या वितरणास शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. 18;  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती मार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्‍या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. १ ली ते इ. १२ वी च्‍या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्‍ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या वर्षी राज्यामध्ये समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत 5कोटी 73 लाख 30 हजार269 पाठ्यपुस्‍तके आणि बाजारातील … Read more

चार दिवसांत ६२ हजार ९१६ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री

मुंबई दि.18:  राज्यात 15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत गेल्या चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. 15 मे 2020 रोजी 5,434 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. तर 16 मे 2020 रोजी 8,268 ग्राहकांना, … Read more

तुम्हाला माहित आहेत चहाचे हे दुष्परिणाम ?

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- चहामुळे तंदुरुस्ती जाणवते, फ्रेश वाटते. काम करण्यास उत्साह वाढतो. त्यात अजून आल्याचा चहा असेल, तर तो सर्दी-डोकेदुखीही कमी करतो. मात्र, चहाचे सेवन किती करावे, याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. कधी-कधी जेवणाच्या आधी चहा घेतला, तर नंतर भूक लागत नाही. मग त्याचा परिणाम भुकेवर होऊन आपले आहाराचे वेळापत्रक बिघडून … Read more

रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांच्या सूचनेला यश; मनरेगासाठी देश पातळीवर अतिरिक्त ४० हजार कोटींची तरतूद

मुंबई दि.18 : शहरांमधून गावाकडे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावात मागणीनुसार काम उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने त्यांची नोंदणी करणे, त्यांना रोजगार पत्रक उपलब्ध करून देणे व त्यांना मागणीनुसार काम देणे यासाठी नियोजन करण्याची सूचना राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी केंद्र सरकारला सुचविले होते, या मागणीला यश आले असून  केंद्र सरकारने राष्ट्रीय … Read more

दोन हजार कुटुंबांची जेवण व पाण्याची व्यवस्था : मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांची सामाजिक बांधिलकी

मुंबई, दि.१८ : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री व मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी मालाडहून आपापल्या राज्यांकडे निघालेल्या स्थलांतरित मजूर व त्यांच्या कुटुंबियांची जेवण व पाण्याची सोय करुन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे. टाळेबंदीमुळे सध्या देशातील उद्योगधंदे ठप्प आहेत. रोजगाराच्या निमित्ताने देशातल्या शहरी भागांमध्ये स्थिरावलेल्या स्थलांतरित मजुरांपुढे त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रत्येकाला … Read more

एकाच दिवसात कोरोनाचे ७४९ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि.१८: राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज  ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८ हजार ४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या … Read more

हरित उद्योगासाठी उद्योजकांनी पुढे यावे, अटीशर्तींशिवाय मान्यता- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. १८:   कोरोना विषाणूला प्रतिबंध करताना अर्थचक्र सुरु राहावे यासाठी रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे. आजघडीला ७० हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून ५० हजार उद्योग सुरुही झाले आहेत. ५ लाख कामगार काम करत आहेत. हे चक्र अधिक गतिमान करताना महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात नव्याने भरारी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आदर्श गावाच्या सरपंचाना पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील आदर्शगाव लोहसर येथे रेशनच्या धान्य वाटपावरून दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेनंतर गावचे सरपंच तथा सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अनिल जगन्नाथ गिते यांना शनिवारी जिल्हा रुग्णालयातून पोलिसांनी अटक केली. रविवारी पाथर्डी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अस्मिता वानखेडे यांच्यासमोर हजर केले असता गीते यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फुगलेल्या अवस्थेतील तरुणाचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- नेवासे तालुक्यातील संत ज्ञानेश्वर मंदिरामागे चिंचबन शिवारात प्रवरा नदीत सोमवारी सकाळी नेवासे खुर्द येथील पप्पू अब्दुल पठाण (वय ३२) या तरुणाचा फुगलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृताचा भाऊ आयुब अब्दुल पठाण याने पोलिसांना खबर दिली. १८ मे रोजी सकाळी अकरा वाजता भाऊ त्याच्या चार मित्रांबरोबर मजुरीच्या कामासाठी गेला होता, असे त्यात म्हटले … Read more

तलवार बाळगल्याने दोघांसोबत झाले असे काही …

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  तलवार बाळगणाऱ्या दोन तरुणांकडून तलवार जप्त करून पोलिसांनी सोमवारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घोडेगाव रस्त्यावरील महाराजा टिंबर दुकानासमोर एमएच १६ सीआर ५४९८ या मोटारसायकलीजवळ दोघे संशयास्पदरित्या दिसले. पोलिस पाहून त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. दत्तात्रय मच्छिंद्र मेहेत्रे (मेहेत्रे वस्ती, औटेवाडी) व आदिनाथ छगन हिरडे … Read more

‘त्या’अहवालानंतर पारनेरकरांना दिलासा…

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रविवारी सायंकाळी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३४ वर्षांचा तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.दरम्यान, घशातील स्त्रावाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या घाटकोपर येथून हा तरुण, त्याची पत्नी, भाऊ व भावजय तीन दिवसांपूर्वी दरोडी येथे आले. स्थानिक समितीने चौघांनाही संस्थात्मक … Read more

ब्रेकिंग : संगमनेरमध्ये आणखी एक कोरोना रुग्ण आढळला !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- संगमनेर शहरातील इस्लामपुरामधील वयस्कर व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे अहवाल आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सात जणांना सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. आरोग्य तपासणी करून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाणार आहे. ८ मे रोजी एका शस्त्रक्रियेसाठी हा रुग्ण नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. संशयास्पद … Read more

कौटुंबिक वादातून आईने दोन मुलींसह घेतली विहिरीत उडी

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिराळ चिचोंडी येथील विवाहितेने पोटच्या दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेतली. आईचा मृत्यू झाला, मुली सुदैवाने बचावल्या. सोनाली संतोष तुपे (२५) या महिलेने रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून आरोही (अडीच वर्षे) व सई (चार वर्षे) या मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोनालीचा पाण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्वाॅरंटाइन पती-पत्नी दोन मुलांसह गायब !

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- राहुरी मध्ये क्वाॅरंटाइन केलेल्या पती-पत्नी आपल्या दोन लहान मुलासह पळून गेले आहेत. या जोडप्याने शाळेत क्वाॅरंटाइन केलेल्या एकाची मोटरसायकलही पळवून नेल्याने प्रशासनात खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक रविवारी पहाटेच्या वेळात ही घटना घडली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाहेरून गावात दाखल होणाऱ्यांची तपासणी करून क्वाॅरंटाइन करण्याचे आदेश आहेत. ३ दिवसांपूर्वी … Read more

CM Uddhav Thackeray Live Updates : लॉकडाऊन केला नसता तर काय झालं असतं याचा विचार करवत नाही…

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन – 4 ची कालपासून सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. Live Updates साठी पेज रिफ्रेश करा  रेड झोन हा लवकरात लवकर रेड झोन करणं ही दोन आव्हानं आहेत, ग्रीन झोन कोरोनामुक्त ठेवायचा आहे मनुष्यबळ कमी पडत असेल तर … Read more

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी साधला कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी संवाद

जळगाव, (जिमाका) दि. 18 : कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जळगाव जिल्ह्यातही कोरोनाचे 279 रुग्ण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथील सामान्य रुग्णालयातून जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर व रुग्णांशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला व तेथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे मनोधैर्य … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई दि.18 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी रश्मी ठाकरे, राजशिष्टाचार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता हे देखील उपस्थित होते.

रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि 18: “बाल नाट्य ते भयकथा असा विस्तृत पट आपल्या लेखणीतून  साकारणारे ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक,चित्रकार, आस्वादक, विज्ञानवादी रत्नाकर मतकरी यांच्या निधनामुळे, एका चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला महाराष्ट्र मुकला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. “मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, राज्य शासनाच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी, मार्च … Read more