दिवसभरात २० हजार ४८५ ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

मुंबई, दि.१७ : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती पैकी 4,713 अनुज्ञप्ती सुरू आहेत. आज दिवसभरात 20 हजार 485 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर  मार्गदर्शक … Read more

खासदार सुप्रिया सुळे यांची बदनामी केल्याप्रकरणी श्रीगोंद्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- फेसबूकवर खा.सुप्रिया सुळे यांच्या फोटोसह आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याप्रकरणी विजय पवार याच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात राज्यात सर्वत्र मद्यविक्री बंद होती. मध्यंतरी राज्य सरकारने काही शहरांत व ग्रामीण भागात मद्यविक्रीला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरच्या पत्नीची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- अकोले तालुक्यातील कोतूळ येथील डॉ. रोहित भुजबळ यांची पत्नी अश्विनी (वय २७) यांनी रविवारी दुपारी साडेबारा वाजता राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली. डाॅ. भुजबळ यांचा विवाह चार वर्षांपूर्वी नवलेवाडी-माळीझाप येथील अश्विनी यांच्याशी झाला होता. त्या औषध निर्माण शास्रातील पदवीधर होत्या. पती, सासरे, सासू, दीर हे सर्व … Read more

धक्कादायक…. अहमदनगर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील सात जण कोरोनाबाधित !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील ७ जण बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते मूळचे अहमदनगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथील रहिवासी आहेत. हे कुटुंब मुंबईहून थेट आष्टी तालुक्यातील सांगवी पठाण येथे नातेवाईकांकडे आले होते, दि. १४ तारखेला आल्यानंतर त्यांना शेतात क्वारंटाईन केले. २ दिवसांपासून त्यांना लक्षणे जाणवू लागली. बीड जिल्हा … Read more

मोठी बातमी : अहमदनगर जिल्ह्यातील ‘ही’ बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मोठ्या कालावधीनंतर श्रीरामपूरची बाजारपेठ खुली झाली होती; मात्र त्यासाठी प्रशासनाने काही नियम घालून दिले होते; मात्र बाजारपेठ खुली झाल्यानंतर या नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे प्रशासनाने बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने बंद होती. त्याप्रमाणे श्रीरामपूरची बाजारपेठही बंद होती. … Read more

…मग ते कार्यक्रम करतात, मंत्री तनपुरेंचा ‘त्या’ नेत्यास इशारा

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पवार कुटुंबीय सभ्य, सुसंस्कृत आहे. मात्र टप्प्यात आल्यावर ते कार्यक्रमही करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी खासदार निलेश राणे यांना इशारा दिला आहे. तनपुरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हणले आहे की, ‘पवार कुटुंब सभ्य आहे. ते अभ्यासू तर आहेत. परंतु सुसंस्कृतही आहेत. मात्र, टप्प्यात आले तर कार्यक्रमही … Read more

अहमनगर करांसाठी आंनदाची बातमी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील ६ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवले होते. त्यापैकी सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २ अद्याप प्रलंबित आहेत. दरम्यान आज जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला. अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता … Read more

आज कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ,कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 33 हजारवर !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ५३ झाली आहे. आज २३४७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६०० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७६८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २४ हजार १६१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. आजपर्यंत … Read more

मोदी सरकारकडून सामान्य जनतेला दिलासा नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या जनतेला आर्थिक मदतीची तात्काळ गरज असताना मोदी सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली आहे. पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे. मोदी सरकारकडे जनतेला तात्काळ दिलासा देण्याकरिता कोणतीही ठोस योजना नसल्याने आता जनतेला तहान लागली असताना … Read more

दोन महिन्यांत शिर्डीत ‘हा’ एकही गुन्हा झाला नाही

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याची सवय असलेल्या गुन्हेगारी क्षेत्रातील तरुणांना घरातच राहाण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यात शिर्डी शहरात एकही पाकिटमारीसारखी घटना घडली नाही. हे पहिल्यांदाच घडत आहे, असा सुर जागरूक नागरिकांनी व्यक्त केला आहे. कमी शिक्षण व समाजाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या, वाईट संगतीने गुन्हेगारी क्षेत्रात पाय टाकलेल्या … Read more

लॉकडाऊनच्या काळात सुशिक्षित युवकांना भत्ता मिळावा

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  संपूर्ण जगामध्ये कोरोना कोविड (१९) च्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यवसाय, व्यापार, बाजारपेठ बंद असल्याने कामगार वर्गाच्या हाताला काम राहिले नाही. काम नाही तर त्यांना वेतनही नाही अशा दुहेरी संकटामुळे युवक वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाकडून बेरोजगार भत्ता मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शेवगाव … Read more

ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली ही मागणी !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक कर्जाची जाचक अटी शिथिल करून पीक कर्ज वाटप करावे. अशी मागणी केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड प्रतापराव ढाकणे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात पर्जन्यमान अत्यंत कमी झाल्याने शेतकरी सध्या दुष्काळाशी सामना करावा लागत … Read more

चारित्र्याचा संशय घेवून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  चारित्र्याचा संशय घेवून एका महिलेस आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका जणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील भातोडी येथील किरण किसन काळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. साक्षी किरण काळे असे आत्महत्या केलेले महिलेचे नाव आहे. साक्षी काळे यांनी कापूरवाडी येथील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी भाऊसाहेब राजाराम धामणे … Read more

‘त्या’ कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील ३ जणांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. सदर खुनाचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा … Read more

साखर कारखान्यामध्ये लागली अचानक आग, बगॅसचा डेपो भस्मसात !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या भुस्सा डेपोला शनिवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत बगॅसचा एक डेपो भस्मसात झाल्याने कारखान्याचे अठरा लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक तासानंतर ही आग आटोक्यात आली. शनिवारी रात्री साडेआठ वाजता कारखान्याच्या बगॅस (भुस्सा) डेपो … Read more

‘या’कारणामुळे शेतकरी करणार ‘कापूस जाळा’ आंदोलन !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कापसाची जर आधारभूत किमतीनुसार खरेदी झाली तर शेतकऱ्यांना ते फायदेशीर ठरते. परंतु सध्या त्यामध्ये सरकारकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा कापूस खरेदीवाचून राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी २२ मे रोजी कापूस उत्पादक जिल्ह्यात प्रत्येक शेतकरी मूठभर कापूस जाळण्याचे आंदोलन करणार आहेत. अशी माहिती … Read more

पाटाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुळा पाटचारीचे पाण्यात मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात शनिवारी ही घटना घडली. राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) असे मृताचे नाव आहे. पोहोताना पाण्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र बुडाले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याचा प्रवाह ओसरण्यासाठी हनुमान टाकळी … Read more

नाशिक-पुणे महामार्गावर अपघात;दुचाकीस्वार ठार

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील माहुली घाटानजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दिल्याने विवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात घडला. एकनाथ नामदेव मोहिते (वय ५०, रा. जांबुत बुद्रुक, ता.संगमनेर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हा दुचाकीस्वार नाशिक-पुणे महामार्गाने संगमनेरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने … Read more