कृषी केंद्र चालकांनी कृषी निविष्ठांचे दर व साठ्याचा फलक लावावा

बुलढाणा :  सध्या खरीप हंगामातील पेरणीची पूर्व तयारी शेतकरी बांधव करीत आहेत. शेतीसाठी लागणारे खत, बी-बियाणे शेतकरी खरेदी करत आहेत. याचा गैरफायदा काही कृषी केंद्र मालक दरवर्षी घेत असतात. जिल्ह्यातील कृषी केंद्र धारकांना त्यांच्याकडे असलेल्या खताचे दर व त्यांच्याकडे असलेला साठा याची नोंद असलेला फलक कृषी केंद्राच्या दर्शनी भागात लावावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहेत. खरीप … Read more

कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी राज्यात ३ लाख ५६ हजार पास वाटप

मुंबई दि.१५ –  लाकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी  ३ लाख ५६ हजार २३२ पास  पोलीस विभागामार्फत देण्यात आले. तसेच ३ लाख ३१ हजार १५१ व्यक्तींना काँरंटाईन (Quarantine) करण्यात आले आहे.अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. राज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते १४मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  १ लाख … Read more

पाणीटंचाई आराखड्याची अंमलबजावणी करा

नागपूर : पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या  उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अपूर्ण पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात. तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यात तीन टप्प्यात पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत असून … Read more

परजिल्ह्यातून आलेल्या मजुरांची काळजी घ्या

वाशिम, दि. १५ : लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर परजिल्ह्यात, परराज्यात असलेले मजूर जिल्ह्यात परतले आहेत. या मजूरांची काळजी घ्या, त्यांची आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन करा. तसेच विलगीकरण कक्षात त्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत … Read more

कोरोनायुद्धात हयगय खपवून घेणार नाही – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदर खाली आणण्याची गरज असतानाच कोरोनाविरोधातील युद्धात कुठल्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही,  असे सांगून कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महानगरपालिकेत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी … Read more

‘त्या’ महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-कोरोनामुळे निघोज येथील ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पारनेर तालुका हादरला होता. तथापि, मृताच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. इतर नऊ जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले असून एकाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने पिंपरी, निघोज, चिंचोली, पठारवाडी हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची चौकशी सुरू आहे. गुरुवारी … Read more

गोरेगाव येथील एक हजार खाटांच्या ‘कोरोना काळजी केंद्रा’ची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुंबई, दि. १५- मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्‍को मैदानावर उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र २ (CCC २) व्यवस्थेची आज सकाळी पाहणी केली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, सहआयुक्त (विशेष) आनंद वागराळकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी नेस्‍को मैदानावर सभागृह क्रमांक २ व ३ या ठिकाणी … Read more

रेशनकार्ड नसणाऱ्यांना धान्य उपलब्ध करून देण्याचे काम सुरू – नगरविकास मंत्री प्राजक्त तनपुरे

वर्धा : हातावर पोट असणाऱ्या मात्र रेशनकार्ड नसणाऱ्या गरजूंना धान्य उपलब्ध करून देण्याचे शासनाचे काम  युद्ध पातळीवर सुरू  आहे. या परिस्थितीत कुणीही उपाशी राहू नये यासाठी  आमचा प्रयत्न आहे. कुठे त्रुटी राहिल्या असतील तर त्या लक्षात आणून द्याव्यात. त्या प्रामाणिकपणे दूर करण्याचा शासन निश्चितच प्रयास  करणार आहे, अशी प्रतिक्रिया नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. वर्धा शहराला लागून असलेल्या उमरी मेघे मधील शांतीनगर येथील … Read more

शेती उत्पादनांच्या सक्षम विपणनासाठी प्रयत्न करावे – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करताना आर्थिक आघाडीवर ठामपणे उभे राहण्यासाठी विविध क्षेत्रांना उभारी देण्याचे अनेक निर्णय शासनाकडून घेतले जात आहेत. लॉकडाऊनच्या काळात फार्म टू फॅमिली उपक्रमात अनेक शेतकरी बांधव त्यांची उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवित आहेत. शेती उत्पादनांचे ब्रँडिंग व सक्षम विपणनाची जोड दिल्यास ते शेतकरी बांधवांसाठी हितकारक ठरेल. त्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश पालकमंत्री … Read more

कोरोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 15 : कोरोनाचे संकट दूर करणे ही सामूहिक जबाबदारी असून शासकीय यंत्रणांनी त्यासाठी कसून प्रयत्न करण्याचे आदेश उपमुख्‍यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. कोरोनाच्या संकटाचा सामना करतांना आर्थिक अडचणी किंवा मनुष्‍यबळाच्या अडचणी असतील तर त्याबाबत स्‍पष्‍टपणे सूचना करण्‍याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून उपमुख्‍यमंत्री पवार यांनी … Read more

आषाढी वारीसाठी निघणारी दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 15 : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे दिंडी किंवा पालखी प्रयाणासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके, माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, संदीप बिष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक संदीप … Read more

पुणे विभागातून ४५ हजार ३०२ प्रवाशांना घेऊन ३६ विशेष रेल्वेगाड्या रवाना

पुणे – लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार राज्यामधील ४५  हजार ३०२ मजूरांना घेऊन पुणे विभागातून ३६ विशेष रेल्वेगाड्या रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी १४, उत्तरप्रदेशसाठी १४, उत्तराखंडसाठी १, तामिळनाडूसाठी १, राजस्थानसाठी ३ व बिहारसाठी ३ अशा एकूण ३६ रेल्वेगाडया ४५ हजार ३०२ प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या आहेत. दि. १६ मे रोजी पुणे विभागातून … Read more

महाराष्ट्रात या, उद्योग सुरू करा : गुंतवणूकदारांसाठी उद्योग विभागाचा पुढाकार

मुंबई, दि. १५ – संकटासोबत संधीही निर्माण होते. कोरोनामुळे राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी मोठी संधी निर्माण झाली आहे. त्याचा देश-विदेशातील गुंतवणूकदारांना फायदा घ्यावा असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले. नव्याने उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसी औद्योगिक शेड उभे करून देणार आहे. विविध परवान्यांऐवजी महापरवाना घेऊन उद्योग सुरू करता येईल. याशिवाय एमआयडीसीबाहेरील जमीन अधिग्रहित करून … Read more

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी भोर नगरपरिषदेने विकसित केले ‘नगरसेतू’ मोबाईल ॲप

पुणे दि. १५ – कोरोना विषाणूला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा एकदिलाने व समन्वयाने कामकाज करीत आहेत. संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची नियोजनपूर्वक आखणी करुन  तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी … Read more

राज्यात ४ हजार ५९७ मद्य विक्री अनुज्ञप्ती सुरू

मुंबई दि.15: गर्दी टाळणे, संपर्क टाळणे व संसर्ग टाळणे या भूमिकेतून आजपासून सकाळी 10 वाजल्यानंतर घरपोच मद्यसेवा सुरू करण्यात आली. आज दिवसभरात राज्यातील ५ हजार ४३४ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री करण्यात आली आहे. यापैकी नागपूर आणि लातूर येथील ४ हजार ८७५ ग्राहक असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. राज्य शासनाने महाराष्ट्र … Read more

कोरोनाच्या उपचारासाठी मुंबईत लाखभर खाटा उपलब्ध करण्याचा प्रयत्न

मुंबई, दि. १५: कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मुंबईत रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी एक लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असून बीकेसी, वरळी एनएससीआय येथे व्यवस्था पूर्ण झाली असून नजीकच्या काळात गोरेगाव, मुलुंड, दहीसर, वरळी दुग्ध वसाहत येथेही लवकरच अशा प्रकारे कोरोना केअर सेंटर्स उभारली जातील. सोमवारपासून बीकेसी येथील कोविड केअर सेंटरमध्ये … Read more

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत ३० मेनंतर अंतिम निर्णय – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, 15 : कोरोनाची स्थिती पाहून ३० मे नंतर वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करून देहू, आळंदी तसेच आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला आमदार सुनील शेळके,माजी आमदार उल्हास पवार, विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर, पोलीस … Read more

‘या’ फुटबॉलपट्टूने केली पोटच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या

अंकारा तुर्कीमध्ये एका माजी फुटबॉल खेळाडूनी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या त्याच्या 5 वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सेव्हर टोकतास ( ३२ वर्ष) असे या खेळाडूचे नाव असून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 4 मे रोजी सेव्हरनं त्याचा मुलगा कासिमचे तोंड उशीनं दाबून त्याची हत्या केली, अशी माहिती अनाडालु एजन्सीने दिली. सुरुवातीला … Read more