…आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले!

नंदुरबार, दि.4 : …जिल्ह्यात कोविड-19 पॉझिटीव्ह रुग्ण आढळला आणि त्याच्या घराजवळील क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर झाले. या क्षेत्रात काही रुग्ण आणि वृद्ध व्यक्तीदेखील होते. त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा याकडे लक्ष देण्याची गरज असताना पोस्ट खाते मदतीला धावून आले आणि अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. कोविड-19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार आणि स्थानिक … Read more

एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी आणाव्यात

पुणे, दि. 04 : कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसत आहे. येत्या काळात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य त्या समन्वयाच्या दृष्टीने व नागरिकांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना तयार करुन सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन द्यावात, अशा सूचना … Read more

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश

मुंबई, दि ४ : अर्थचक्रही सुरु राहिले पाहिजे म्हणून आपण काही प्रमाणात झोन नुसार शिथिलता आणली पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून आपापले क्षेत्र लवकरात लवकर ग्रीन झोन्समध्ये कसे येतील ते पाहावे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप प्रसंगी योग्य तो निर्णय घ्यावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : क्वारंटाइन होण्यास सांगितल्याच्या रागातून ‘त्याने’ घेतले विष !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून मास्क न लावता फिरणाऱ्यास क्वारंटाइन होऊन गावातील विलगीकरण कक्षात रहा या कारणावरून संबंधित व्यक्तीने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. खळबळजनक घटना काल १२ . ३० वा . कोपरगाव तालुक्यातील मढी गावच्या शिवारात मोकळ वस्ती भागातील अजय भाऊसाहेब मोकळ याच्या घरात घडली. अजय मोकळ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘तो’ खून अनैतिक संबंधातूनच,पोलिसांनी एकास घेतले ताब्यात !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील मुकुंद वाकडे खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे सूत्रांकडून समजले. पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे. यातील एका आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, खून करण्याच्या कारणांचा पोलिस शोध घेत आहेत. आढळगाव येथील मुकुंद वाकडे या तरूण शेतकऱ्याचा अतिशय निर्दयपणे खून … Read more

महत्वाची बातमी : जिल्ह्यात कन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागात विविध बाबींना सवलती

अहमदनगर, दि.०४ – लॉकडाऊनची मुदत १७ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसुल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली या ठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास दिनांक 04 मे ते दि. 17 मे, 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत … Read more

अहमदनगरकरानों ही माहिती तुमच्यासाठी वाचा…तुमच्या परिसरात काय असेल चालू आणि बंद ?

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- लॉकडाऊनच्‍या मुलभूत तत्‍वांचे पालन करणे बंधनकारक करून कन्टेन्मेन्ट झोन वगळता अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून विविध बाबींना परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सविस्तर आदेश जारी केला असून नागरिकांना नियमांचे पालन करीत आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युवकाचा पाटात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- श्रीरामपूर येथील तेजस दळवी या १८ वर्षांच्या युवकाचा पाटाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी त्याचा मृतदेह सापडला. तेजस शनिवारी दुपारी दिऊरा रोडवरील गणपती मंदिराच्या मागे पोहोण्यासाठी चार-पाच मित्रांसह गेला होता. तेजसला पोहता येत नसल्याने व पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो बुडाला. तेजस पाण्यात वाहून गेल्याचे मित्रांच्या लक्षात आल्यानंतर शोधकार्य … Read more

‘त्यांच्या’ निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत : आमदार विखे

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत आले. सरकारची पणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. राहाता बाजार समितीने मात्र लॉकडाऊनच्या काळातही शेतीमाल खरेदी करण्यासाठी केलेली व्यवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासनाच्या नियमांचे पालन करुन शेतमाल खरेदी केला. त्याचा लाभ … Read more

कोरोनाचा शिरकाव झाल्याने ‘त्या’ भागात संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण तयार होऊन औषध दुकानेही बंद राहिली. येत्या मंगळवारपर्यंत शहरात संपूर्ण लाॅकडाऊन प्रशासनाने जाहीर केला. -पाथर्डी तालुक्‍यातील मोहोजदेवढे येथे पहिला करोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या … Read more

राज्यातील कंन्टेटमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

मुंबई, दि. 3 – राज्यातील कोविड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई  … Read more

नागपूरहून लखनऊसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना

नागपूर दि 3 –  लॉकडाउनमुळे नागपूर विभागात  वेगवेगळ्या निवारागृहात  असलेल्या 977 नागरिकांना घेऊन आज नागपूर ते लखनऊ  विशेष  श्रमिक स्पेशल रेल्वे  गाडी क्रमांक 01902 रात्रौ 7.30 वाजता रवाना झाली. पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी  आपल्या गावी परत जात असल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले. श्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये  … Read more

राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि. ३ : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत  ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या  १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण  १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात … Read more

घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका

मुंबई दि 3: परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची  आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. आज राज्यातील विभागीय आयुक्त, … Read more

राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी राहणार बंदच !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे. शैक्षणिक संस्था. शाळा, महाविद्यालये, सण, धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळंही सुरू ठेवता येणार नाहीत.विमान, रेल्वे किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम. … Read more

राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी होणार सुरु !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे. त्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. त्यावरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात मॉल्स वगळता, इतर सर्व प्रकारचे दुकाने सुरू करण्यास मुभा … Read more

प्रा.राम शिंदे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात यावी !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ बहुजन समाजाचे ओबिसी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते कर्तव्य दक्ष माजी कॅबिनेट मंत्री प्रा.राम शिंदे यांची विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवड करुन बहुजन समाजाला तसेंच ओबिसी व धनगर समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांच्या वतीने पांडुरंंग माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

अनैतिक संबंधाच्या वादातून झाली ‘त्याची’ हत्या ?

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८) या युवकाची गळा, छाती, दोन्हीही हातांचे पंजे आणि गुप्तांगावर धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. मुकुंदचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास मुकुंद ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या गट नं. १३३/१ मधील डाळिंब पिकावर … Read more