‘त्यांच्या’ निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत : आमदार विखे

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी अडचणीत आले. सरकारची पणन व्यवस्था शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. राहाता बाजार समितीने मात्र लॉकडाऊनच्या काळातही शेतीमाल खरेदी करण्यासाठी केलेली व्यवस्था शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली असे आमदार राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. राहाता बाजार समितीने शासनाच्या नियमांचे पालन करुन शेतमाल खरेदी केला. त्याचा लाभ … Read more

कोरोनाचा शिरकाव झाल्याने ‘त्या’ भागात संपूर्ण लाॅकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- पाथर्डी तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शहरासह संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण तयार होऊन औषध दुकानेही बंद राहिली. येत्या मंगळवारपर्यंत शहरात संपूर्ण लाॅकडाऊन प्रशासनाने जाहीर केला. -पाथर्डी तालुक्‍यातील मोहोजदेवढे येथे पहिला करोना रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 26 संशयितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्या … Read more

राज्यातील कंन्टेटमेंट झोन वगळून इतर भागातील एकल दुकाने सुरू करण्यास परवानगी

मुंबई, दि. 3 – राज्यातील कोविड 19 चा प्रभाव असलेले कंटेन्टमेंट झोन वगळता इतर भागातील जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची एकल (स्टॅंड अलोन) दुकाने सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, कोविड 19 संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता रुग्णांच्या संख्येच्या आधारावर तीन भाग करण्यात आले आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन. रेड झोनमध्ये दोन भाग आहेत – पहिला मुंबई  … Read more

नागपूरहून लखनऊसाठी श्रमिक स्पेशल रेल्वे रवाना

नागपूर दि 3 –  लॉकडाउनमुळे नागपूर विभागात  वेगवेगळ्या निवारागृहात  असलेल्या 977 नागरिकांना घेऊन आज नागपूर ते लखनऊ  विशेष  श्रमिक स्पेशल रेल्वे  गाडी क्रमांक 01902 रात्रौ 7.30 वाजता रवाना झाली. पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी  आपल्या गावी परत जात असल्याबद्दल सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या व टाळ्या वाजवून या विशेष गाडीला रवाना केले. श्रमिक स्पेशल रेल्वे मध्ये  … Read more

राज्यात कोरोनाचे २११५ रुग्ण बरे होऊन घरी

मुंबई, दि. ३ : राज्यात आज ११५ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  २११५ रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधीत  ६७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या  १२ हजार ९७४ झाली आहे. तर एकूण  १० हजार ३११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात … Read more

घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका

मुंबई दि 3: परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळते आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची  आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करून रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारू नये अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. आज राज्यातील विभागीय आयुक्त, … Read more

राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी राहणार बंदच !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे. शैक्षणिक संस्था. शाळा, महाविद्यालये, सण, धार्मिक स्थळं, प्रार्थना स्थळंही सुरू ठेवता येणार नाहीत.विमान, रेल्वे किंवा आंतरराज्य रस्ते वाहतूक यांना बंदी कायम. … Read more

राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर : अहमदनगरमध्ये या गोष्टी होणार सुरु !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- राज्यात तिसरा लॉकडाऊन जाहीर झाला असून, त्याची सुरुवात आज सोमवारपासून होत आहे. मात्र या काळात काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याची नवी यादी सरकारने जारी केली आहे. त्यात अनेक गोष्टींना मुभा देण्यात आली आहे. त्यावरून जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात मॉल्स वगळता, इतर सर्व प्रकारचे दुकाने सुरू करण्यास मुभा … Read more

प्रा.राम शिंदे यांची विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करण्यात यावी !

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :-  भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ बहुजन समाजाचे ओबिसी समाजाचे महाराष्ट्र राज्याचे नेते कर्तव्य दक्ष माजी कॅबिनेट मंत्री प्रा.राम शिंदे यांची विधान परिषेदेवर आमदार म्हणून निवड करुन बहुजन समाजाला तसेंच ओबिसी व धनगर समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांच्या वतीने पांडुरंंग माने यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

अनैतिक संबंधाच्या वादातून झाली ‘त्याची’ हत्या ?

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- आढळगाव येथील मुकुंद जयसिंग वाकडे (वय २८) या युवकाची गळा, छाती, दोन्हीही हातांचे पंजे आणि गुप्तांगावर धारदार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. मुकुंदचे वडील जयसिंग विठ्ठल वाकडे यांच्या फिर्यादीवरून रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास मुकुंद ट्रॅक्टर घेऊन स्वतःच्या गट नं. १३३/१ मधील डाळिंब पिकावर … Read more

अहमदनगरच्या दारू दुकानांबाबत प्रशासनाचा ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  दारूचे दुकाने खुली केली जातील, असे सरकारने सांगितले असले. परंतु, नगर जिल्ह्यातील दुकाने तात्काळ सुरू करू नयेत, असा आदेश उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी काढले आहेत.  सरकारने दारू दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहे. नगर जिल्हा ऑरेंज … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाउन कालावधीत सुरू करण्याच्या विविध बाबीसंदर्भात सूचना दिल्या असल्या तरी जिल्हा प्रशासनाचे यासंदर्भात स्वतंत्र आदेश आल्याशिवाय कोणीही त्यांच्या आस्थापना/ दुकाने सुरू करू नयेत.असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. अहमदनगरच्या दारू दुकानांबाबत प्रशासनाचा ‘हा’ निर्णय दारूचे दुकाने खुली केली जातील, असे सरकारने सांगितले असले. परंतु, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘त्या’ ३३ व्यक्तींचे रिपोर्ट्स आले, वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ३७ अहवालापैकी ३३ अहवाल निगेटीव आले आहेत. यात, पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील २५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आता उर्वरित ०४ अहवालाची प्रतीक्षा आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर  ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

महाराष्ट्रातील या भागांत वादळी पाऊस पडण्याची शक्यता

Maharashtra Rain Alert

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- महाराष्ट्रात विविध भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने दणका दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर तर विदर्भात नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा दिला गेला आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये ढगाळपणा असेल, तर उष्ण व … Read more

त्याने पोलिसाच्या वर्दीवरच टाकला हात, शर्टही फाडला.. शेवटी पोलिसांनी केले असे काही…

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :- रस्त्याने विनाकारण फिरणार्‍या सराईत गुन्हेगाराने ड्युटीवरील पोलिस कर्मचार्‍याच्याच वर्दीवर हात टाकला. त्याची कॉलर पकडून धक्काबुक्की करीत शर्ट फाडला. सावेडीतील सिव्हिल हडको परिसरातील या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आरसीपी पथकातील पोलिस कर्मचारी महेंद्र सागर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात प्रमोद ऊर्फ भावड्या दादू पगारे (वय 26, रा. भारत चौक, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिलोविरुद्ध नगरमध्येही गुन्हा !

अहमदनगर Live24 ,3 मे 2020 :-  पोलिस असल्याची तोतयागिरी करणाऱ्या केडगावच्या महिलेविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम मोमीन ऊर्फ समीना गफूर मोमीन (रा. केडगाव देवीमंदिरामागे, केडगाव) हिच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच अंमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता नगरलाही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने चर्चेला उधाण आले आहे. याबाबत माहिती अशी की, शबनम … Read more

लॉकडाऊन कालावधीत कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ९१ हजार गुन्हे दाखल

मुंबई दि.०३-  लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते २ मे  या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ९१ हजार २१७ गुन्हे दाखल झाले असून १८ हजार ४८ व्यक्तींना अटक करण्यात आली. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी २५ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात … Read more

गोरखपूरला जाणारी श्रमिक ट्रेन भिवंडीहून रवाना

ठाणे दि. ३ –  केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील  भिवंडी रोड रेल्वे स्टेशन ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक रेल्वे 1104 मजुरांना घेऊन  रात्री  1 वाजता रवाना झाली. या रेल्वेतील प्रवाशांना टाळ्यांच्या कडकडाटात जिल्हा प्रशासनाने निरोप दिला. सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज … Read more