कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना समन्वय समित्यांची स्थापना

पुणे, दि.28 : पुणे विभागामध्ये कोरोना विषाणू (कोवीड -19) संसर्गजन्य आजाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. हा विषाणू अतिसंसर्गजन्य असल्यामुळे त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याने, राज्यात साथरोग अधिनियम -1897 च्या अनुषंगाने महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम 2020 नियम अस्तित्वात आले आहेत व ते दि.15 मार्च 2020 पासून लागू झालेले आहेत. कोरोना (कोवीड -19) प्रादुर्भाव नियंत्रित … Read more

देहविक्रयातील महिलांना रेशन, वैयक्तिक स्वच्छता साधनांचा पुरवठा

मुंबई, दि.२८: देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांच्या समस्यांकडे एरवी समाजाचे लक्ष जात नाही. या व्यवसायात नाईलाजाने आलेल्या महिलांची परिस्थिती सुधारण्यासाठी, त्यांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी महिला व बालविकास विभाग प्रयत्न करतो. सध्याच्या ‘कोविड-19’ परिस्थितीत लॉकडाऊनमुळे या महिलांचे उत्पन्न बंद झाल्याने कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती … Read more

अवैध दारूविक्री विरोधात कठोर कारवाई करा

अमरावती, दि. 28 : कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. या काळात अवैध दारूनिर्मिती व विक्री होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.  कायद्याचा धाक नसेल तर असे प्रकार फोफावतात. त्यामुळे अशा प्रकारांविरुद्ध कठोरपणे कारवाई करावी व विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज … Read more

कोरोनावर मात करीत दोन रूग्ण परतले स्वगृही…!

बुलडाणा, (जिमाका) दि. 28 : कोरोना या शब्दाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. त्यामध्ये आपला देश, राज्य व जिल्हाही अपवाद नाही. कोरोना विषाणूच्या थैमानाने जग मेटाकुटीस आले आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातून कोरोनाच्या या हल्लकल्लोळात काही सुखद वृत्तही येत आहे. आज 28 एप्रिल रोजी आणखी दोन रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरे झाल्याने मलकापूर व बुलडाणा येथील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मामा भाच्याच्या वाद; मामाने पिले किटकनाशक तर भाच्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

अहमदनगर Live24 / श्रीरामपूर :- तालूक्यातील टाकळीभान येथे मामा भाच्याच्यात झालेल्या वादातून मामाने विषारी किटकनाशक पिल्याने घाबरलेल्या भाच्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या विषयी माहिती अशी की, टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय ३० वर्ष) व त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय २२ वर्ष) हे त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. … Read more

अहमदनगर शहरातील 23 मशिदीमध्ये एक वेळच्या आजानची परवानगी

अहमदनगर Live24 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या लॉक डाउन काळात शहरातील सर्व मशिदी बंद आहेत. मात्र रमजान काळात राज्यांसाठी सवलत देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत जिल्हा पोलीस दलाने शहरातील 23 मशिदी मध्ये उपवास सोडण्यासाठी फक्त (मगरिब) संध्याकाळची आजानला पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार एक वेळच्या आजानची परवानगी देण्यात आली आहे. … Read more

ब्रेकिंग : अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन,रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

अहमदनगर Live24 :- हिंदूत्ववादी कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांचे आज निधन झाले आहे.प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.त्यांनी सोलापुरातील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  अपर्णा रामतीर्थकर या चांगल्या वक्त्या होत्या आणि त्यांची मते त्या परखडपणे मांडत होत्या. पत्रकार अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. सोलापुरातील पाखर संकुल या अनाथ मुलांच्या वसतीगृहाच्या उभारणीत त्यांचा सहभाग होता. … Read more

मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत, असं म्हंटले जाते पण, मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत….

श्रीगोंदा : मुली घराबाहेर सुरक्षित नाहीत, असं म्हंटले जाते पण जन्मदात्या बापाकडूनच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार होत असतील, तर मुली घरातही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. आपल्या पोटच्या १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याची घटना दि.२५एप्रिल शनिवारी रात्री पीडित मुलीच्या घरी घडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात अत्याचार व पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या … Read more

आ.रोहित पवार यांच्याकडून ३० हजार कुटूंबाना मदत

जामखेड : मतदारसंघाला नेहमीच आपलं कुटुंब समजुन,अडचणीच्या काळातही प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून दात्रुत्व स्विकारणारा आमदार रोहित पवार यांचा ‘मदतीचा हात’ कर्जत जामखेडच्या गरजू,गोरगरीबांना ‘आपला हक्काचा माणुस’ असल्याची जाणीव करून देत आहे. आ.रोहित पवार यांच्या याच दात्रुत्वातुन कर्जत-जामखेडसाठी पुन्हा एकदा भक्कम ‘मदतीचा हात’ पुढे आला आहे. कर्जत व जामखेड या दोन्हीही तालुक्यातील तब्बल ३० हजार … Read more

विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू

राहाता तालुक्यातील वाकडी येथील गणेशनगर रोड जाधव वस्ती येथील आदिनाथ भास्कर जाधव (वय ३८) या शेतकऱ्याचा विहिरीत तोल जाऊन मुत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे वाकडी परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाकडी – गणेशनगर रोडवर असलेल्या जाधव वस्ती भागात राहणारा अल्पभूधारक शेतमजूर आदिनाथ भास्कर जाधव हा शुक्रवारी (दि. २४) दुपारनंतर … Read more

साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या बोल्हेगाव, गांधीनगर येथील चोभे कॉलनीत शंभर गरजू कुटुंबीयांना साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने जीवनावश्यक अन्न-धान्य व भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय पारखे, शंकर बोरुडे, सचिव सोमनाथ बोर्‍हाडे, श्रीपाद वाघमारे, अतुल मिसाळ, दिनेश शिंदे, राजू पंचमुख, मल्हारी वाव्हळ, उमेश क्षिरसागर, नितीन पोता, … Read more

हेल्प देम ग्रुपच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या युध्दात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत खर्‍या बातम्या देऊन जागृतीचे काम करणार्‍या माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार व वृत्त छायाचित्रकार यांचा भिंगार येथील हेल्प देम ग्रुपच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर या युध्दात माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रेरणा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. हेल्प देम ग्रुपचे युवक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देऊन विविध … Read more

अन आमदार लंके यांनी थेट गाठले रेशन दुकानदाराला

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निंबळक येथून वारंवार पुरेसे धान्य मिळत नसल्याची तक्रार येत असल्याने आमदार निलेश लंके यांनी थेट निंबळक गावात रेशन दुकानदाराला गाठले. तर रेशन दुकान उघडून मोफतचे धान्य, केशरी कार्डसाठी आलेले धान्य व पुरवठा करण्यात आलेल्या धान्यासह शिल्लक असलेल्या धान्य साठ्याची माहिती घेतली. अत्यंत अभ्यासू व आक्रमकपणे आमदार लंके यांनी रेशन दुकानदारांना विविध … Read more

आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागास पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- देशासह महाराष्ट्रात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्याच्या लढ्यात महत्त्वपुर्ण योगदान देणार्‍या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांसाठी आमदार रोहित पवार व राष्ट्रवादीच्या वतीने पाचशे लिटर सॅनीटायझरचे वाटप करण्यात आले. तेलीखुंट पॉवर हाऊस जवळील जुने सिव्हिल हॉस्पिटल येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सॅनीटायझरचे बॅरल देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे … Read more

लॉकडाऊननंतर विवाहसोहळा -ना.तनपुरे

राहुरी शहर : डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सेवा भावी संस्थेच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी अक्षय तृतीयेला रविवार, २६ एप्रिल २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देशात लॉकडाऊन असल्याने हा विवाह सोहळा लॉकडाऊन संपल्या नंतर घेतला जाणार असल्याचे नगर विकास ऊर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी सोशल … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकविला धडा

शिर्डी : पहिल्यांचा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा, हातजोडुन विनंती, अन्य गांधीगिरी मार्गाचा अवलंब करूनही शिर्डीत विनाकारण फिरणाऱ्या चाकरमान्यांना लगाम बसत नसल्याने अखेर शिर्डी पोलीस व वाहतूक शाखेने संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेत विनाकारण दुचाकी किंवा पायी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांना पकडून थेट रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साईसंस्थानच्या रुग्णालयात पाठविले. या अनोख्या … Read more

Big Breaking : मंदिराच्या आवारातच दोन साधूंची धारदार शस्त्राने हत्या !

अहमदनगर Live24 :- महाराष्ट्रातील पालघरमध्ये दोन साधूंच्या मॉब लिंचिंगची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशमध्ये दोन साधूंची हत्या घडली आहे. बुलंदशहरमधील अनुपशहर कोतवालीच्या पागोना गावात मंदिर परिसरात झोपलेल्या दोन साधूंवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. जमावाने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साधू जगन दास (55 … Read more

अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक, ग्रामस्थ भयभीत !

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे गेल्या एक महिन्यापासून अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून हा मूर्खपणा कोण करतो आहे,याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली असुन आवश्यक ती पावलेही उचलली आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या लॉकडाऊन असल्याने लोक घरातच थांबलेले आहेत. अशातच सोनेवाडीमध्ये गेल्या एक महिन्यापासून विचित्र … Read more