राहुरी कृषी विद्यापीठाचा दुधी भोपळा देशभर गाजणार! शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी !

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या भाजीपाला संशोधन प्रकल्पाने विकसित केलेला दुधी भोपळ्याचा सुधारित वाण आर.एच.आर.बी.जी. ५४ (फुले गौरव) याला राष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. पंजाब कृषि विद्यापीठ, लुधियाना येथे पार पडलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक आढावा बैठकीत हा वाण मध्य प्रदेश, गोवा आणि महाराष्ट्र या राज्यांसाठी प्रसारित करण्यास मंजुरी देण्यात आली. हा … Read more

मुंबईच्या ‘या’ रेल्वे स्थानकावरून युपीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘त्या’ 5 Railway स्थानकावर थांबा घेणार

Mumbai Railway News

Mumbai Railway News : यंदा आपल्या देशात 14 मार्चला होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. पण महाराष्ट्रात मात्र हो‌ळी 13 मार्चला आहे अन धुलिवंदन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्चला आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे या सणासाठी मोठ्या प्रमाणात लोक मूळ गावी जात आहेत. मूळ गावी जाण्यासाठी आत्तापासूनच नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे. या काळात मुंबई, पुणे वरून … Read more

Anandacha Shidha आणि शिवभोजन योजना बंद ! चालकांमध्ये भीतीचे वातावरण

राज्याच्या अर्थसंकल्पात ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ योजनेकरिता कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात न आल्याने जिल्ह्यातील लाखो लाभार्थ्यांवर संकट ओढवले आहे. ‘आनंदाचा शिधा’ योजनेच्या माध्यमातून दिवाळी, दसरा आणि गुढीपाडवा अशा सणांच्या वेळी गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरविल्या जात होत्या. याशिवाय, रोज हजारो गरीब आणि गरजू नागरिकांसाठी सुरू असलेली शिवभोजन थाळीही बंद होण्याच्या मार्गावर आहे. नगर जिल्ह्यात … Read more

अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला आणि मृत्यू झाला ? हरेगाव प्रकरणात नवा ट्विस्ट!

हरेगाव येथील अॅट्रॉसिटी प्रकरणातील फिर्यादी शुभम माघाडे आणि त्याचे सासरे भानुदास गायकवाड यांचा झालेला अपघाती मृत्यू हा केवळ योगायोग आहे की सुनियोजित कट, याचा सखोल तपास करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) आणि भीमशक्ती संघटनेने केली आहे. रविवारी संध्याकाळी एस कॉर्नर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी नोंदवले असले, तरी अपघातस्थळी कोणत्याही … Read more

Kanya Sumangala Yojna : झाडे लावा, पैसे मिळवा! ‘कन्या वनसमृद्धी योजना’ शेतकऱ्यांसाठी वरदान, पण प्रशासन झोपले का?

मुलींचा जन्मदर वाढावा आणि राज्यातील वनेतर क्षेत्र अधिकाधिक वृक्षलागवडीखाली यावे, या उद्देशाने २०१८ मध्ये सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘कन्या वनसमृद्धी योजना’ सुरू करण्यात आली. ही योजना पर्यावरणसंवर्धनासोबतच महिलासक्षमीकरणालाही चालना देणारी आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करतानाच कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि पर्यावरणाचे संरक्षण व्हावे, असा या योजनेमागील हेतू आहे. मात्र, योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्याने अनेक शेतकरी … Read more

कोणत्या योजना बंद केल्या ? वाचा सरकारच्या मोठ्या घोषणांचा खोटारडेपणा

राज्यातील महायुती सरकारने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या योजना बंद केल्या जात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभेत केला. मंगळवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. महिलांच्या योजना गुंडाळल्या विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी लाडकी बहिण योजनेसाठी १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याचे … Read more

शंभर फूट दरीत ट्रक कोसळून चालकाचा मृत्यू ! धोकादायक वळणाने घेतला आणखी एक जीव

माणिकदौंडी घाटात रविवारी संध्याकाळी भीषण अपघात घडला. बारामतीवरून छत्रपती संभाजीनगरकडे पुठ्ठा घेऊन जाणारा ट्रक घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने तो थेट खोल दरीत कोसळला. या अपघातात ट्रक चालक प्रवीण आजिनाथ मेंगुळे (वय ३९, रा. पिंपळगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुमारे १०० फूट खोल दरीत ट्रक कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले … Read more

विजेचे बिल शून्य? ‘सूर्यघर’ योजनेमुळे उन्हाळ्यात AC आणि पंखे मोफत चालवा!

उन्हाळ्याच्या दिवसांत विजेच्या मागणीत मोठी वाढ होते. फेब्रुवारी ते मे या कालावधीत कूलर, एसी आणि फ्रीजचा वाढता वापर विजेच्या तुटवड्याला कारणीभूत ठरतो. याच समस्येवर उपाय म्हणून केंद्र सरकारने “पंतप्रधान सूर्यघर योजना” कार्यान्वित केली आहे. या योजनेमुळे ग्राहक स्वतःच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज निर्मिती करू शकतात आणि विजेच्या वाढत्या खर्चातून मुक्तता मिळवू … Read more

कोपरगावमध्ये भीषण अपघात! नशेत असलेल्या स्कॉर्पिओ चालकाने एका कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला

कोपरगाव येथे भरधाव स्कॉर्पिओ गाडी हॉटेलमध्ये घुसून मोठा अपघात घडला आहे. या घटनेत सुनंदा साबळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-नागपूर महामार्गावर संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार चालक मद्यधुंद अवस्थेत होता. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई-नागपूर महामार्गावर भरधाव … Read more

अकोलेच्या नऊ गावांत पंतप्रधान कृषी सिंचन योजना जोरात तब्बल १६३ शेततळी पूर्ण; आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही केले कौतुक

अहिल्यानगर : पंतप्रधान कृषी सिंचन योजना याद्वारे पाणलोट विकास घटक प्रकल्पातून अकोले तालुक्यातील तालुक्यातील नऊ गावांत जलसंधारण उपक्रम राबवले जात आहेत. मागील दोन वर्षांत तालुक्यातील नऊ गावांमध्ये १६३ शेततळी पूर्ण झाली आहेत. पुढील कालावधीत आणखी काही जलसंधारणाची कामे पूर्ण करून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक उन्नतीसाठी नक्कीच लाभ होईल असा विश्वास आमदार डॉ. किरण लहामटे … Read more

आज सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता (DA) वाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार, GR पण निघणार

DA Hike

DA Hike : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होळीच्या आधी मोठी भेट मिळू शकते. म्हणून जर तुम्ही ही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या परिवारातून कोणी शासकीय सेवा बजावत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरेतर, केंद्र सरकार 14 मार्चला साजरी होणाऱ्या होळी सणापूर्वी महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत … Read more

अहिल्यानगरमध्ये लग्न समारंभात हायप्रोफाईल चोरी ! सीसीटीव्हीमुळे समोर आली १९ वर्षांच्या चोरट्या तरुणीची लबाडी

अहिल्यानगरमध्ये एका लग्न समारंभात कलवरी म्हणून आलेल्या १९ वर्षीय तरुणीने तब्बल ६७ तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी तिला अटक करून ५७ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. चोरीला गेलेले उर्वरित १० तोळे दागिने तिने एका सराफाला विकल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. घटना कशी उघड … Read more

Nagpur News : दगाबाज प्रियकराकडून अल्पवयीन प्रेयसी गर्भवती न्यायालयात गर्भपातासाठी अर्ज,प्रियकरावर फसवणुकीचा आरोप

नागपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची परवानगी मिळविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. १७ वर्षीय प्रेयसीने तिच्या प्रियकरावर फसवणुकीचा आरोप केला असून, त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिचे शारीरिक शोषण केल्याचे तिने सांगितले आहे. परिणामी, ती गर्भवती झाली. तिच्या पालकांनीही गर्भपातासाठी संमती दिली आहे, मात्र कायदेशीर अडचणींमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक ठरला आहे. … Read more

iQOO Neo 10R भारतात लाँच! 6400mAh बॅटरी, AI कॅमेरा आणि Snapdragon 8s Gen 3 फक्त….

Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10R भारतीय बाजारात लॉंच केला आहे. हा फोन शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि अत्याधुनिक AI फीचर्स घेऊन आला आहे. भारतीय ग्राहकांसाठी हा फोन मूनलाइट टायटॅनियम आणि रेजिंग ब्लू या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक फक्त ₹999 मध्ये हा स्मार्टफोन प्री-बुक करू शकतात. … Read more

6500mAh बॅटरी आणि 120Hz डिस्प्ले असलेला फोन ₹12,999 मध्ये? Vivo T4x 5G आज दुपारी 12 वाजता विक्रीसाठी!

Vivo ने आपला नवीन Vivo T4x 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीसाठी चर्चेत आहे. आजपासून म्हणजेच 12 मार्चपासून या फोनची पहिली विक्री ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. या फोनमध्ये जबरदस्त बॅटरी, शानदार कॅमेरा आणि हाय-परफॉर्मन्स प्रोसेसर देण्यात आला आहे. याशिवाय, फोनला मिलिटरी ग्रेड … Read more

Donald Trump यांनी Elon Musk ची Tesla कार खरेदी केली ! पण कधीच चालवता येणार नाही ? कारण धक्कादायक!

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच आकर्षक लाल रंगाची टेस्ला मॉडेल एस खरेदी केली असून, या कारचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे. ही खरेदी टेस्लाच्या सीईओ इलॉन मस्क यांच्या उपस्थितीत व्हाईट हाऊसच्या दक्षिण लॉनवर करण्यात आली. ट्रम्प यांनी मस्क यांना ‘देशभक्त’ असे संबोधित केले आणि टेस्ला कंपनीच्या कामगिरीचे कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान, टेस्लाची पाच … Read more

महाराष्ट्रासाठी गोड बातमी ! थोडे दिवस थांबा, 15 हजार 600 कोटी रुपयांच्या महामार्गाचे ‘या’ तारखेला होणार उद्घाटन

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्रातील नागरिकांचा 13 तासांचा प्रवासाचा पाच ते सहा तासांवर येणार आहे. हो बरोबर वाचताय आपण राज्यातील प्रवाशांचा 13 तासांचा प्रवास सहा तासांवर येणार, कारण राज्यातील एका बहुचर्चित महामार्गाचे काम आता लवकरच पूर्ण होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे. आम्ही ज्या महामार्ग प्रकल्पाबाबत बोलत … Read more

Adani Share Price अदानींसाठी मोठी लॉटरी ! शेअर्सवर होणार मोठा परिणाम

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहासाठी दोन अत्यंत सकारात्मक आणि महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. पहिली बातमी म्हणजे, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड (AGEL) अंतर्गत असलेल्या अदानी सोलर एनर्जी एपी एट प्रायव्हेट लिमिटेडने आंध्र प्रदेशातील कुड्डापाह येथे २५० मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. दुसरी मोठी बातमी म्हणजे, मुंबईतील ऐतिहासिक धारावी पुनर्विकास प्रकल्पात भाग … Read more