iQOO Neo 10R भारतात लाँच! 6400mAh बॅटरी, AI कॅमेरा आणि Snapdragon 8s Gen 3 फक्त….

Published on -

Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10R भारतीय बाजारात लॉंच केला आहे. हा फोन शक्तिशाली प्रोसेसर, मोठी बॅटरी, प्रीमियम डिस्प्ले आणि अत्याधुनिक AI फीचर्स घेऊन आला आहे. भारतीय ग्राहकांसाठी हा फोन मूनलाइट टायटॅनियम आणि रेजिंग ब्लू या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहक फक्त ₹999 मध्ये हा स्मार्टफोन प्री-बुक करू शकतात. शिवाय, निवडक बँक कार्ड्सवर ₹2000 पर्यंतचा डिस्काउंट देखील मिळेल.

iQOO Neo 10R हा गेमिंग, फोटोग्राफी आणि मल्टीटास्किंगसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. त्याची तगडी बॅटरी, फास्ट चार्जिंग, AI फीचर्स आणि दमदार प्रोसेसर यामुळे तो या प्राइस रेंजमधील एक परफेक्ट स्मार्टफोन ठरतो.

iQOO Neo 10R ची किंमत

iQOO ने हा स्मार्टफोन तीन वेगवेगळ्या स्टोरेज पर्यायांमध्ये आणला आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या गरजेनुसार योग्य पर्याय निवडता येईल. 8GB RAM + 128GB स्टोरेज – ₹26,999, 8GB RAM + 256GB स्टोरेज – ₹28,999, 12GB RAM + 256GB स्टोरेज – ₹30,999, ग्राहक फक्त ₹999 मध्ये प्री-बुकिंग करू शकतात, तसेच निवडक बँक कार्डांवर ₹2,000 पर्यंतची विशेष सूट मिळेल. हा फोन 11 मार्चपासून iQOO च्या अधिकृत वेबसाइट आणि प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल.

Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर

iQOO Neo 10R मध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो हा स्मार्टफोन या सेगमेंटमधील सर्वात वेगवान आणि पॉवरफुल डिव्हाइसमध्ये सामील करतो. कंपनीच्या मते, हा फोन गेमिंग आणि हाय-एंड टास्कसाठी आदर्श आहे. याशिवाय, कंपनीने 3 वर्षे Android OS अपडेट्स आणि 4 वर्षे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे हा फोन भविष्यातही अप-टू-डेट राहील. डिव्हाइस Android 15 वर चालणार आहे, त्यामुळे नवीनतम सॉफ्टवेअर अनुभव मिळेल.

AI फीचर्स

iQOO Neo 10R हा AI-पॉवर्ड स्मार्टफोन आहे, जो युजर एक्सपिरियन्स अधिक स्मार्ट आणि सोयीस्कर बनवतो. यात काही खास AI फीचर्स देण्यात आले आहेत, AI Eraser – अनावश्यक ऑब्जेक्ट्स हटवून परफेक्ट फोटो मिळवता येतो. AI Instant Cut Out – फास्ट फोटो एडिटिंगसाठी हे फिचर मदत करते. AI Circle To Search – स्क्रीनवर काहीही सर्च करणे अधिक सोपे करते.

6400mAh बॅटरी

iQOO Neo 10R मध्ये 6400mAh ची तगडी बॅटरी देण्यात आली आहे, जी संपूर्ण दिवसाचा बॅकअप देते. हा फोन 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, ज्यामुळे काही मिनिटांतच बॅटरी चार्ज होते. गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा दीर्घ कॉल्ससाठीही ही बॅटरी भरपूर बॅकअप देते.

iQOO Neo 10R डिस्प्ले

iQOO Neo 10R मध्ये 6.78-इंच 1.5K AMOLED LTPS डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 3804Hz PWM डिमिंग आणि 1800 nits चा ब्राइटनेस सपोर्ट करतो. यामुळे स्क्रीनवर स्मूद स्क्रोलिंग आणि उजळ व्हिज्युअल्स मिळतील. गेमिंग आणि व्हिडिओ स्ट्रीमिंगसाठी हा डिस्प्ले उत्कृष्ट पर्याय ठरणार आहे. त्याशिवाय, Schott Xensation Up डिस्प्ले प्रोटेक्शन देण्यात आले आहे, जो स्क्रीनला स्क्रॅच आणि डॅमेजपासून वाचवतो.

50MP AI कॅमेरा प्रोफेशनल फोटोग्राफी

iQOO Neo 10R मध्ये 50MP Sony LYT600 प्राथमिक कॅमेरा आहे, जो उत्तम दर्जाची फोटोग्राफी सुनिश्चित करतो. याशिवाय, 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर दिला आहे, जो वाइड-अँगल फोटोग्राफीसाठी उपयुक्त आहे. सेल्फीप्रेमींसाठी 32MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे, जो स्पष्ट आणि नैसर्गिक सेल्फी कॅप्चर करण्यास मदत करतो. नाईट मोड, पोर्ट्रेट मोड, स्लो मोशन आणि प्रो मोड यांसारखी AI-आधारित कॅमेरा फीचर्स मिळतात, ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक समृद्ध होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe