लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २९४ गुन्हे दाखल

मुंबई दि. २५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये … Read more

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव : लॉकडाऊन जूनपर्यंत वाढण्याची शक्यता

अहमदनगर Live24 :- राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे .देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे तर राज्यात सर्वाधिक मुंबई-पुणे शहरात आहे. केंद्र सरकारने वाढवलेला लॉकडाऊन 3 मेपर्यंत असला तरी पुणे आणि मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राला त्यातून दिलासा मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.  येत्या 4 मे रोजी देशासह राज्यातील लॉकडाऊन कदाचित मागे घेतला जावू … Read more

रायगड जिल्ह्यात १० ठिकाणी स्वॅब टेस्टिंग बूथची उभारणी

अलिबाग, जि. रायगड, दि.25 (जिमाका) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक असून पीपीई कीट ची संख्या मर्यादित असल्यामुळे तपासणी करण्याबाबत मर्यादा आहेत. या विषाणूची लागण तपासणी करणाऱ्यांना होऊ नये, याकरिता उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून एमआयडीसी असोसिएशनतर्फे जिल्ह्यात नवीन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर :- आज अहमदनगर जिल्ह्यातील ४१ पैकी २४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात, जामखेड येथील १६, अहमदनगर शहर व तालुका ०५, संगमनेर ०१, अकोले ०१ आणि आष्टी तालुक्यातील ०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून अद्याप १७ अहवालाची प्रतीक्षा आहे. #FightAgainstCOVID19#Ahmednagar जिल्ह्यातील ४१ व्यक्तींच्या स्त्राव चाचणी अहवालाची प्रतीक्षा. आतापर्यंत १४८३ पैकी १३८१ अहवाल … Read more

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत प्रशिक्षण

मुंबई, दि. २५ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत मेडीकल, नर्सिंग आणि हेल्थ केअर सेक्टरमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आतापर्यंत एकूण १० हजार ८१५ युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्यात आले आहे. सध्या सुरु असलेल्या कोव्हीड-१९ साथरोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवकांची असलेली मोठी गरज लक्षात घेऊन सोसायटीने या युवक-युवतींची यादी आरोग्य विभागास तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन … Read more

एपीएल केशरी कार्डधारक लाभार्थ्यांना धान्याचे वितरण सुरु

मुंबई, दि. २५ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या एपीएल केशरी रेशन कार्डधारक नागरिकांना राज्य शासनाकडून तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ असे प्रति व्यक्ती पाच किलो अन्नधान्य रेशन दुकानांमधून देण्यात येत आहे. राज्यातील तीन कोटी आठ लाख एपीएल केशरीकार्ड धारक लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानांमधून १ मे ऐवजी आता २४ एप्रिलपासूनच १.५६ लक्ष … Read more

सहा महिन्यांच्या कोरोना मुक्त बालकाला डिस्चार्ज

रत्नागिरी दि. 25: सहा महिन्यांचा चिमुकला आपल्या आईच्या कडेवर बसून लिफ्टमधून बाहेर येताच रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय सहाय्यक स्टाफ आणि इतरांनी टाळ्यांचा गजर करीत या बालकाच्या कोरोनामुक्तीचे स्वागत केले.  15 दिवसांच्या उपचार व तपासणीनंतर साखरतर येथील या बालकाचा कोरोनावरील विजय हा संपूर्ण आरोग्य यंत्रणेचा विजय ठरला आहे. कोरोना अर्थात कोविड-१९ विषाणूचा पहिला रुग जिल्ह्यात आढळला … Read more

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या युवतीवर सामूहिक बलात्कार !

अहमदनगर Live24 : लॉकडाऊनमुळे राजस्थानच्या सवाईमाधोपूर जिल्ह्यात अडकलेली एक महिला गुरुवारी जयपूरला जाण्यासाठी पायी निघाली होती. रात्री उशीर झाल्याने ती वाटेतच एक शाळेमध्ये मुक्कामास थांबली. रात्री दोन वाजता महिलेला एकटे पाहून तीन तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी (शुक्रवार) पीडितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. एसपी सुधीर चौधरी यांनी सांगितले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्याला आग लागून सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान !

अहमदनगर Live24 :- संगमनेर तालुक्यातील युटेक शुगर या साखर कारखान्याच्या गोदामाला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले. आज पहाटे ही घटना घडली आगीने रौद्र रूप धारण केल्याने संगमनेर, प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखाने, देवळाली प्रवरा व राहुरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ज्वलनशील पदार्थ अधिक असल्याने आग भडकली. या आगीच्या … Read more

हॅन्ड ग्लोव्हज, सॅनीटायझर तसेच मास्क खरेदीसाठी प्रत्येकी दहा लाख

मुंबई, दि.२५ : कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याच्या ग्रामीण भागातील स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मार्फत ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छतेची कामे सुरू आहेत. या स्वच्छाग्रहींच्या सुरक्षिततेसाठी हॅन्ड ग्लोव्हज, सॅनीटायझर तसेच मास्क खरेदीसाठी   कोविड-१९ चा प्रादुर्भाव असलेल्या राज्यातील २७ जिल्ह्यांना प्रत्येकी दहा लाख याप्रमाणे  एकूण २ कोटी ७० लाख रुपयांचा निधी ‘जागतिक बँक प्रोत्साहन अनुदान’ अंतर्गत देण्यात आला आहे. या … Read more

ग्रामीण भागातील विकास कामांना चालना द्या

मुंबई, दि.२५ : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासकामांना मोठ्या प्रमाणावर चालना देऊन लॉकडाऊनच्या काळात अकुशल मजुरांना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून देता येईल. केंद्र सरकारच्या मनरेगा व राज्याच्या रोहयो अंतर्गत ग्रामीण भागातील विकास कामांना गती देऊन अकुशल कामगारांच्या रोजंदारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यापक काम करता येईल, अशी महत्त्वपूर्ण सूचना रोहयो मंत्री संदीपान भुमरे … Read more

डाकिया ‘जन’ धन लाया…

नंदुरबार, दि.25 : ‘बडे डाक खाने से आता लाता कभी रुपैया, कभी किताबें दे जाता है मुझ को हँस हँस भैया’….बालपणीच्या कवितेतील मुन्शीराम डाकियाचे वर्णन आठवण्याचे कारण म्हणजे आजच्या ‘डाकिया’ने संचारबंदीच्या काळात ग्रामीण जनतेला दिलेला दिलासा. इंडिया पोस्ट पेमेंट बँकच्या माध्यमातून पोस्टाचे प्रतिनिधी गावात जावून पैसे वाटप करीत असून आठवड्याभरात 2392 खातेदारांना 32 लाख 72 … Read more

आयटीसीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत

मुंबई, दि. २५ : आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ कोटी रुपयांची मदत देण्यात आली असून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी झाले आहेत. या युद्धात त्यांनी आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांची तसेच गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामात देखील पुढाकार घेतला आहे. या दातृत्वभावातूनच आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८० कोटी रुपये … Read more

कुकडीचे हक्काचे पाणी न मिळाल्यास जलसंपदा विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांचे विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- आ. पाचपुते

श्रीगोंदा :- श्रीगोंद्याच्या सिंचनासाठी हक्काचे सव्वा-दिड  टीएमसी पाणी मिळाले पाहिजे होते पण आत्तापर्यंत साडेसातशे ते आठशे एमसीएफटी पाणी मिळाले आहे अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या हक्कावर गदा येत असेल व  श्रीगोंदेकराना कुकडीचे हक्काचे पाणी मिळत नसेल तर  आपण विधानसभेत जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन चा कालावधी संपल्यानंतर  जर हक्काचे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिक आणि दुकानदारांसाठी महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 :- आजपासून देशभरातील दुकानं उघडण्यास सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे.गृहमंत्रालयानं काढलेल्या आदेशानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुकानं ही आजपासून सुरू करण्यात येणार आहे. कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून सगळीकडे अत्यावश्यक सेवेची दुकान म्हणजे अन्न धान्य, मेडिकल्स, दूध, भाजीपाला वगळता मॉल्स, व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव आणि अन्य प्रकारची दुकानं बंद करण्याचा निर्णय … Read more

नाटक करून बदनाम करू नका !

कोपरगाव :-  शहरात सॅनिटायझर वाटप करण्याचे नाटकी थोतांड करून नगर पालिकेला बदनाम करू नका, तुम्ही कोरोनाच्या परिस्थितीत नगर पालिकेला एक रुपयांची देखील मदत केलेली नाही. शहरात औषध फवारणी केली त्याबद्दल तुमचे आभार, खालच्या पातळीचे राजकारण करू नका, अशी टीका नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोल्हे यांच्यावर केली. शुक्रवार नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. … Read more

रमजानमध्ये मुकुंदनगर भागात मुलभूत सुविधांना सवलत देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या मुकुंदनगर भागामध्ये रमजान निमित्त मुलभूत जीवनावश्यक वस्तूंसाठी सवलत देण्याची तसेच पहाटे व संध्याकाळी दोन वेळच्या आजानला मुभा मिळण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक व समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्याकडे शहराध्यक्ष अजीम राजे यांनी निवेदन पाठवून केली आहे. कोरोनाचा … Read more

तर रमजान घरच्या घरीच साजरी करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पाथर्डी रोड येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसा बाराबाबळी (ता. नगर) येथील विलगीकरण कक्षातून 144 क्वॉरन्टाईन नागरिकांना शुक्रवार दि.24 एप्रिल रोजी सोडण्यात आले. मदरसाच्या विश्‍वस्त व स्वयंसेवकांनी क्वॉरन्टाईन नागरिकांना मास्कचे वाटप करुन कोरोनाच्या बचावासाठी घरा बाहेर न पडता स्वत:सह कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे व रमजानच्या महिन्यात नमाज, उपवास घरातच करण्याचे … Read more