लॉकडाऊन कालावधीत राज्यात आतापर्यंत ५० हजार गुन्हे दाखल

मुंबई, दि.17 : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च 17 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 49,756 गुन्हे दाखल झाले आहेत तर 10,276 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 32,424 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 70, … Read more

मानक कार्यप्रणाली (SOP) सुरू करणाऱ्या बाजार समित्यांचे व्यवहार २१ एप्रिल पासून सुरु करण्याची परवानगी द्यावी – मंत्री अमित देशमुख

मुंबई, दि.17 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समितीने स्वतःची मानक कार्यप्रणाली (SOP) तयार करावी. त्या प्रणालीची तपासणी जिल्हा उपनिबंधक यांनी करून योग्य मानक कार्यप्रणाली असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा व त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी दिनांक 21 एप्रिल 2020 पासून आशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे … Read more

राज्यात आज कोरोनाबाधित २८६ नवीन रुग्णांची नोंद, एकूण रुग्ण संख्या झाली ३२०२ !

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित २८६ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३२०२ झाली आहे. आज दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत !

अहमदनगर :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद आणि महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.कारण राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीला मंजरी दिली नाही तर उद्धव ठाकरे आमदार होऊ शकणार नाहीत – त्यामुळे उद्धव ठाकरे यांना २८ मे नंतर लगेचच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून … Read more

महत्वाची बातमी : लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू, शेती निगडित उद्योग आणि औद्योगिक प्रकल्प सुरू होणार, केंद्र आणि राज्य शासनाने दिलीय सवलत

अहमदनगर :- केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन काळात ज्या उद्योग आणि औद्योगिक प्रकल्पांना ते सुरू करण्याबाबत सवलत दिली आहे, अशा औद्योगिक प्रकल्‍प / उद्योगांना उत्‍पादन चालु करण्यासाठी किंवा उत्पादन क्रिया चालू ठेवण्यासाठी कोणत्याही लेखी वा इलेक्ट्रॉनिक पूर्वपरवानगीची आवश्यकता नसल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यात विविध जीवनावश्यक वस्तु शेतीशी निगडित उत्पादनांचा समावेश … Read more

चढ्या भावाने किराणा वस्तूंची विक्री करणार्‍या रिटेलर आणि होलसेल व्यापार्‍यांवर कारवाई होणार

अहमदनगर :- किराणा दुकानदार जीवनावश्‍यक किराणा वस्‍तूंची चढया भावाने विक्री करीत असल्‍याचे निदर्शनास आले आहे. तसेच ग्राहकांना खरेदी मालाचे बिल देत नसल्‍याच्‍या तक्रारी प्राप्‍त झाल्‍या आहेत. व्‍यापारी संघटनेच्‍या वेळोवेळी घेतलेल्‍या बैठकीमध्‍ये सर्वच टप्‍यावरच्‍या व्‍यवहाराची पक्‍की बिले ठेवणे व ग्राहकाला बिल देण्‍याबाबतच्‍या सूचना यापूर्वीच दिल्या असतानाही अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांनी … Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याला दीड तासाच्या प्रयत्नानंतर सहीसलामत बाहेर काढण्यात यश

राहुरी :- तालुक्यातील पिंपळगाव फुणगी येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याला दीड तासाच्या प्रयत्नानंतर सहीसलामत बाहेर काढण्यात वनिवभागाला यश आले. सोशल डिस्टनसिंगची मर्यादा पाळून उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाट करत राहुरी वनविभागाच्या या कामगिरीचे स्वागत केले. पिंपळगाव फुणगी येथील मच्छिंद्र रामभाऊ बाचकर यांच्या शेतीतील गट नंबर ९६ मधील विहिरीत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. भक्षाच्या शोधात … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सारी रुग्णाची संख्या ४२ वर !

अहमदनगर:-  जिल्ह्यात सारीचे रुग्ण आढळत असून ११ एप्रिलपासून ते आजपर्यंत ४२ रूग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये २३ पुरुष, १५ स्त्री आणि ०४ मुलांचा समावेश आहे. अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ०४ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह अहमदनगर – जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी रात्री … Read more

आता बातम्याच द्यायच्या नाहीत का? बातमी दिली म्हणून अहमदनगर जिल्ह्यात पत्रकारावर हल्ला

अहमदनगर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बातम्या देणेही आता पत्रकारांना अडचणीचे ठरू लागले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पत्रकार गावात, शहरात फिरून बातम्या देत आहेत. नागरिकांकडून कौतूक दूरच त्यांच्या रोषालाच सामोरे जावे लागत आहे. नगर जिल्ह्यात पानेगाव (ता.नेवासे) येथील १७ कुटुंबांना क्वारंटाइन केल्याची बातमी गावातील पत्रकार बाळासाहेब नवगिरी यांनी दिली होती. बातमी दिल्याच्या रागातून जमावबंदीचा आदेश मोडत गावातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर अनिवार्य, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा !

अहमदनगर Live24 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना चाा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने आणखी कडक पावले उचलली आहेत. सर्व सार्वजनिक ठिकाणी तसेच कामाच्या ठिकाणी आता प्रत्येक व्यक्तीला मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीवर संबंधीत प्राधिकरणाने दंडासह शिक्षा करावी, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. राज्य शासनाने कोरोना विषाणूचा … Read more

लॉकडाऊन काळात २१८ सायबर गुन्हे दाखल, ४५ आरोपींना अटक

मुंबई दि. 16- कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत .महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात 218 गुन्हे दाखल झाले आहेत तर पंचेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली. टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये  ज्या 218 … Read more

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच

मुंबई दि.16: अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरु आहे. काल दिनांक 15 एप्रिल 2020 रोजी राज्यात 112 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून  40 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच 5 वाहने जप्त करण्यात आली असून 32 लाख 34 हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 24  मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020 … Read more

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४७ कोटी रुपये जमा

मुंबई दि. 16:  कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून आज एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनने 1 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. या सर्व दानशूर हातांच्या मदतीमुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंत 247 कोटी रुपये जमा झाले आहेत. कोराना विषाणूविरुद्ध लढताना आपली एकजूट, सहकार्याचे हात आणि मोलाची साथ मला अपेक्षित आहे अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १० कोटी

मुंबई, दि.16 कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे.  या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उच्च … Read more

मधुमेही रुग्णाला अवघ्या तासाभरात घरपोच मिळाली ‘संजीवनी’

नाशिक दि.16 : मधुमेह म्हणजे आयुष्यालाच जडलेली व्याधी. औषधांची, डॉक्टरांची गरज कधी भासेल सांगता येत नाही. या रुग्णांसाठी औषधे ही ‘संजीवनी’पेक्षा कमी नसतात. दिपाली नगर (मुंबई नाका) येथील राहणाऱ्या एका नागरिकाची मधुमेहाची औषधे सकाळी संपली. घरात ते आणि त्यांची मुलगी दोघेच. बाहेर संचारबंदी असल्याने कसं बाहेर जायचं, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र त्यांच्या मदतीला नाशिकचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष … Read more

अहमदनगर क्राईम न्यूज : नवऱ्याचा मोबाईल तपासल्याने बायकोस मारहाण !

अहमदनगर Live24  :- श्रीगोंदा तालुक्‍यातील आढळगाव येथे राहात असलेली विवाहित तरुणी सौ. रुपाली विशाल छत्तीसे, वय २४ हिने तिचा पती विशाल अंकुश छत्तीसे याचा मोबाईल चेक केला ,याचा राग आल्याने आरोपी नवरा विशाल अंकुश छत्तीसे, संजना अंकुश शिंदे, अंकुश किशन छत्तीसे, रा. आढळगाव यांनी मारहाण करुन रुपाली हिला ढकलून दिले. ती भिंतीवर आदळून डोक्याला व … Read more

ग्रामसुरक्षा यंत्रणेचा फोन गेला आणि हिवरे बाजारमध्ये मोठा अनर्थ टळला….

अहमदनगर Live24  :- आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राला अचानक दि.१२ एप्रिल २०२० रोजी दुपारी आग लागली, वनक्षेत्राला आग लागल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून येताच हिवरे बाजार येथील ग्रामविकास तरुण मंडळाचे कार्येकर्ते व ग्रामस्थ अवघ्या काही मिनिटातच वनक्षेत्रातील आगीच्या ठिकाणी हजर झाले व आग आटोक्यात आणली.सदर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ कोरोना पेशंट्सना रूग्णालयातून सुटताच होणार अटक ….

अहमदनगर Live24 :-  धार्मिक कार्यक्रमासाठी  अहमदनगर जिल्ह्यात आलेल्या 29 परदेशी नागरिकांसह सहा परराज्यातील नागरिकांवर अटकेची टांगती तलवार आहे. पर्यटन व्हिसा असताना या सर्वांनी धर्मप्रसार केला, तसेच जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, काही क्वारंटाईन आहेत. यांची रुग्णालयातून सुटका झाल्यानंतर सर्वांच्या … Read more