स्वयंशिस्त पाळा, मी घरात थांबणार, मी कोरोनाला हरवणार’

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ‘स्वयंशिस्त पाळा, मी घरात थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ मुंबई : प्रत्येकाने स्वयंशिस्त राखली तर कदाचित १४ एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाऊन शिथिल होऊ शकेल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘स्वयंशिस्त पाळा, मी घरात थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा मंत्र दिला … Read more

कोरोना झालेल्या आईने दिला बाळाला जन्म ! वाचा पुढे काय झाले..

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  दिल्लीतील एम्समध्ये शुक्रवारी सायंकाळी एका कोरोनाबाधित मातेने सुदृढ बाळाला जन्म दिला. बाळाची प्रकृती सध्या तरी उत्तम आहे. कोरोनाबाधित महिलेच्या पोटी जन्माला आलेले हे दिल्लीतील पहिले बाळ असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. सद्य:स्थितीत बाळाची प्रकृती अतिशय चांगली आहे, असे डॉक्टर नीरजा भटला म्हणाल्या. आपल्या डॉक्टर पतीकडून या महिलेला गुरुवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर … Read more

महाराष्ट्रात कोरोना @ ५३७

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  भारतात कोरोनाचे नवे रुग्ण आणि बळींचा आकडा वाढण्याचा वेग कमी आहे, अशी दिलासादायक माहिती शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. राज्यात ४७ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ५३७ वर गेली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत ९६ जण दगावले असून रुग्णांचा आकडा ३ हजार ४८२ झाला आहे. यांमध्ये तबलिगी जमातशी संबंधित १ हजाराहून अधिक … Read more

ट्रम्प म्हणाले मलेरियाविरोधातील औषध कोरोनावर प्रभावी ठरतेय !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मलेरियाविरोधातील औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. कोरोनाविरोधी लढ्यात वैद्यकीय आणीबाणीत सैन्यदलाचा सहभाग वाढविण्याची गरजही यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केली. सर्जिकल मास्क हे कोरोनाविरोधात लढा देत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात कपड्यापासून तयार करण्यात आलेल्या मास्कचा वापर करावा. रोगनियंत्रण व प्रतिबंध केंद्र अर्थात सीडीसीने लोकांसाठी … Read more

कोरोनाशी लढा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला हा आदेश !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर उपचारासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा निर्माण होऊ देऊ नका, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिले आहेत. याचवेळी कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे देशभरातील रुग्णालये, वैद्यकीय सामग्री, मास्क, व्हेंटिलेटर आणि वैयक्तिक सुविधा परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कोविड-१९ च्या आव्हानाचा … Read more

कोरोनाविरोधी लढ्यात ९५ पोलीस अधिकारी आणि ४६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  चीनमध्ये कोरोनाविरोधी लढ्यात ९५ पोलीस अधिकारी आणि ४६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. चिनी वृत्तसंस्थेने शनिवारी याबाबतची माहिती दिली. या महारोगराईिवरोधी लढ्याचे बळी ठरलेल्या अधिकाऱ्यांबाबत चीनने प्रथमच खुलासा केला आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ८१ हजार ६३९ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३ हजार ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांची … Read more

राज्यात उन्हाच्या काहिलीने लोक हैराण

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असून आता महाराष्ट्रात ठिकठिकाणी उन्हाच्या काहिलीने लोकांना हैराण केले आहे. तापमान ४१ अंशापलीकडे गेल्याचे सोलापूर व अकोला येथे दिसून आले. यावेळी सोलापूर येथे हंगामामध्ये सर्वात अधिक तापमान ४१.१ व अकोल्यात ४१ अंश इतके नोंद झाले आहे.काही ठिकाणी असणारे हवामान हे पूर्वमोसमी पावसाला अनुकूल असून त्यामुळे विदर्भ व … Read more

लॉकडाऊनच्या दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नवी दिल्ली: देशासह राज्यातील विविध भागांत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मोदी सरकार या महिन्याच्या २० तारखेपर्यंत १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करू शकते, याविषयीची शक्यता वर्तवली जात होती. परंतु सरकार आता लॉकडाऊनच्याच दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. देशाच्या विविध भागांत २०१९ च्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ नगरसेविकेचे पद होणार रद्द !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेच्या स्वच्छता विभागातील दोन कर्मचार्‍यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून बंद पडलेले अत्यावश्यक सेवेचे काम शनिवारी दुपारपासून सुरू झाले. महापालिका कर्मचारी युनियनने काम बंद आंदोलन मागे घेत असताना संबंधित नगरसेविकेचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेचे स्वच्छता विभागाचे … Read more

श्रीगोंद्यातील राजकारणी कुठे गायब झाले ? पाचपुते, जगताप, नागवडे घरात बसले…

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- श्रीगोंदे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गरिबांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनासह सर्व यंत्रणा एकवटल्या, पण श्रीगोंद्यातील आजी-माजी आमदार, कारखादार, जि. प. सदस्य व नगरसेवक कुठे गायब झाले आहेत? ते जनतेची कधी मदत करणार असा सवाल राजेश डांगे यांनी बोलताना केला. डांगे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य हे गरिबांच्या मदतीला … Read more

मंत्री असावा तर नामदार शंकरराव गडाख यांच्यासारखा….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ना पोलिसांचा फौजफाटा, ना त्यांचा बंदोबस्त, ना विविध खात्याचे अधिकारी, ना हातात डायरी घेतलेला कुणीही स्वीय सहायक अशा पद्धतीने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी थेट मोटारसायकने जात लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. मंत्री गडाख यांनी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीने जात भेट … Read more

रावसाहेब दानवे म्हणाले या निर्णयाचा गरीबांंना मोठा फायदा होणार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- लॉकडाऊनमुळे गरीबांची जीवनावश्यक वस्तूंसाठी परवड होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन महिन्यांचे अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्राने महाराष्ट्राला २० लाख टन धान्य साठा दिला असून, राज्य सरकारने वितरणासंदर्भात काढलेल्या परिपत्रकातील जाचक अटी तात्काळ रद्द करुन नागरिकांना तीन महिन्यांचे नियमित व मोफत धान्य एकत्रितरित्या वितरीत करावे, असे आवाहन … Read more

खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा झाले ‘गायब’ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशावर कोरोना आजाराने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत. पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोरोनाच्या संकटकाळी पाठ फिरवली आहे. सर्वत्र करोनो आजाराने थैमान घातले असताना सर्व ठिकाणी कर्फ्यु लावल्याने गरीब जनतेला काहीच आधार राहिला नाही. लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता दररोजच्या जीवन खडतर झाले आहे. गोरगरीब जनतेचे … Read more

म्हणून ‘त्याने’ त्यांच्या नवजात बाळाचे नाव ठेवले ‘कोरोना’ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील होमगार्ड विभागातील एका कर्मचाऱ्याने आपल्या नवजात मुलाचे नाव कोरोना ठेवले आहे. उभांव पोलीस ठाणे हद्दीतील बिल्थर रोड पोलीस चौकीवर होमगार्ड म्हणून सेवा देणारे रियाजुद्दीन यांची पत्नी शमा परवीन हिने शुक्रवारी रात्री येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात एका मुलाला जन्म दिला. यानंतर रियाजुद्दीन यांनी नवजात बाळाचे नाव कोरोना ठेवले. सध्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धार्मिक द्वेष पसरविल्यावरून गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर : धार्मिक द्वेष निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या आरोपावरून येथील मनोज चिंतामणी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चिंतामणी याने एका व्हॉट्सॲप ग्रुपवर धार्मिक द्वेष वाढविणाऱ्या पोस्ट टाकल्या. चुकीचे संदेश प्रसारित केले. या संदेशामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ॲड. … Read more

कोरोनाच्या संकटात संजीवनीचे सॅनिटायझर बाजारात !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाच्या संकटात शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील डिस्टिलरीने ‘क्ि­लन ऑल’ या हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती केली आहे, अशी माहिती संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी दिली. सॅनिटायझरच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हे बोलत होते. आसवनी प्रकल्प आणि ज्या साखर कारखान्यांकडे आसवनी प्रकल्प आहेत, अशा साखर कारखान्यांनी सॅनिटाझरची निर्मिती करावी, असे आवाहन शासनाने केले होते. त्या … Read more

सावधान! घराबाहेर पडू नका. कोरोना घोंगावतोय’

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  संगमनेर : सध्या कोरोनाने जगभरात चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासन सर्वांची काळजी घेत आहे. मात्र, तरीही लोक बेजबाबदारपणे वागत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे ‘सावधान! घराबाहेर पडू नका. कोरोना घोंगावतोय’, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. सध्या राज्यात कोरोनाची संख्या वाढत … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या सीमा झाल्या बंद

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगर तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध गावांनी आपले रस्ते बंद करुन नो एन्ट्रीचे बोर्ड लावल्याचे चित्र दिसत आहे. जेऊर परिसरातील चापेवाडी रस्ता बंद करण्यात आलेला आहे. तसेच यापुर्वीच धनगरवाडी, शेंडी गावात रस्ते बंद करुन प्रवेश निषीध्द असे बोर्ड लावण्यात आले होते. रस्ते बंद करण्याचे लोन आता तालुक्यात वेगवेगळ्या गावात पोहचल्याचे दिसुन येत आहे. … Read more