कोरोना व्हायरसने पाकमध्ये माजविला हाहाकार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   इस्लामाबाद : कोरोना विषाणूने पाकमध्ये अक्षरश: हाहाकार माजविला असून देशात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मंगळवारी तब्बल १,८७० झाली आहे. कोरोनाने आतापर्यंत २४ जणांचा बळी गेला असून उपचारानंतर देशात ५८ जण बरेसुद्धा झाले आहेत. देशातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, कोरोनाच्या संकटातून सावरण्यासाठी पाक सरकारने तब्बल १,२०० अब्ज रुपयांचे … Read more

लॉकडाऊनमुळे देशातील पती होतायेत नैराश्यग्रस्त, पत्नीवर गाजवतायेत रुबाब, तर काहींकडून पत्नींना मारहाण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  देशात केलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांना घरातच राहावे लागत आहे; परंतु याच दरम्यान कौटुंबिक हिंसाचार प्रचंड वाढल्याचे धक्कादायक तथ्य मंगळवारी उजेडात आले आहे. नैराश्यग्रस्त पतींकडून पत्नींना मारहाण केली जात असून, या अत्याचारासंबंधी तब्बल २९१ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तत्पूर्वी फेब्रुवारीमध्ये ३०२ आणि जानेवारीत २७० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे देशातील कुटुंबसंस्थेचा क्रूर चेहरा … Read more

मुकूंदनगर भाग मिलिटरीच्या ताब्यात देणार ! हा संदेश तुम्ही वाचला होता ? जाणून घ्या त्यानंतर काय घडले …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-   अहमदनगर : सोशल मिडियात कोरोना आजारासंदर्भात खोटा मेसेज पाठवून अफवा पसरविणाऱ्याविरुध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ताहिर शेख (रा.मुकूंदनगर,नगर) याने त्याच्या मोबाईल नंबरवरून कोरोना आजारासंदर्भात एका ग्रुपवर मुकूंदनगर, फकिरवाडा भाग मिलिटरीच्या ताब्यात देणार असून याबाबत नागरीकांनी नोंद घ्यावी तसेच मिलिटरी काही सरकारी … Read more

संगमनेर : ‘ती’ आकडेवारी लक्षात घेता शहरासह तालुक्­यातील स्थिती गंभीरतेकडे जाणारी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर येथे दोन परदेशी व्यक्ती कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने ते जिल्ह्यातील कोणाकोणाच्या संपर्कात आले याची माहिती जिल्हा प्रशासनाने काढली. त्याआधारे संगमनेरच्या प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरिया यांनी पथकासह … Read more

दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रात नको …

मुंबई :- दिल्लीतल्या मरकजमुळे कोरोनाच्या चिंतेत वाढ झाली. महाराष्ट्रात कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, प्रसंगी मी स्वत: त्यांच्या आयोजकांशी बोलेल पण कोरोनाचे संकट जाऊस्तोवर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी … Read more

परदेशी नागरिकांना मशिदीत आश्रय देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नेवासा : परदेशातील १० व्यक्तींना मशिदीत आश्रय देऊन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मशिदीचे ट्रस्टी आहेत. कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांनी मंगळवारी याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तीमध्ये म्हटले आहे की, काल मी तसेच, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, उपनिरीक्षक बी. एस. दाते, … Read more

कोरोनाचे संकट उंबरठयावर येऊन ठेपलय, आता तरी बेफिकीरपणा सोडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंदा : कोरोनाने सगळीकडे थैमान घातले असून, शहरी भागात कोरोना झपाट्याने पसरत आहे. आतापर्यंत ग्रामीण भाग कोरोनाच्या प्रसारपासून लांब होता. परंतु बारामती येथील एक रिक्षावाला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाल्यानंतर श्रीगोंद्याच्या उंबरठ्यावर कोरोना येऊन दाखल झाला आहे. याचे कारण म्हणजे बारामतीच्या ‘त्या’ कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील तीन व्यक्ती आल्यामुळे आता … Read more

नामदार तनपुरेंनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल जनतेमधून कौतूक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  पाथर्डी तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे विजेचे अनेक खांब पडले, तारा तुटल्याने गावठान तसेच शेतीपंपाचा देखील वीजपुरवठा खंडित झाला होता. सध्याची परिस्थिती लक्षात घेता वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा खंडित होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. अशा स्पष्ट सूचना या भागाचे लोकप्रतिनिधी तथा उर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना … Read more

जे घराबाहेर पडतील त्यांच्या हातात दिसणार ‘मी समाजाचा शत्रू’चे बोर्ड

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंदा : घरात रहा, सुरक्षित रहा रस्त्यावर फिरू नका, गर्दी करू नका, असे पोलिस व महसूल विभागाकडून वारंवार सांगूनसुद्धा काही लोक विनाकारण रस्त्याने फिरत असल्यामुळे आता या लोकांना अद्दल घडवण्यासाठी श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी यांनी आता नवीन शक्कल शोधून काढली आहे. जे लोक विनाकारण घराबाहेर रस्त्याने फिरताना दिसतील त्यांच्या हातात मी प्रशासनाने … Read more

कौतुकास्पद : जिल्हा मराठा विद्या प्रसारक देणार ५० लाखांचा निधी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नामांकित असलेल्या जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी.डी. खानदेशी यांनी दिली. संस्थेचे विश्वस्त, कार्यकारणी, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व मिळून हा निधी … Read more

कोरोना लढ्यासाठी खासदार लोखंडेंनी केली एक कोटीची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. या लढ्यासाठी सर्वच थरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही कोरोनाच्या लढ्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची मदत जाहीर केली आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच खासदार लोखंडे यांनी केंद्रीय सांख्यिकी विभागाला दिले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत … Read more

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकाराचे मोबाईल App !

मुंबई, दि. 1 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. ‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर’ ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत. महाकवच App  या डिजिटल प्लॅटफॉर्मची … Read more

‘या’ तालुक्यात पाच हजार नागरिक होम क्वारंटाईन

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे, मुंबई तसेच इतर राज्यात पोटापाण्यासाठी गेलेले तालुक्यातील नागरिक पुन्हा गावाकडे परतले आहेत. अशा परतलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाने तपासणी मोहीम हाती घेतली असून, ग्रामीण भागात ६७५९ नागरिक परत आले आहेत. यापैकी ५०८९ नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले आहेत. पोलिस पाटलांमार्फत या … Read more

कोरोनापासून जीव वाचविण्यासाठी घेतलेल्या औषधामुळे डॉक्टरचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- गुवाहाटी : कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी मलेरियावर प्रभावी ठरणारे हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन नामक औषध घेतल्याने एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरचा कथितरीत्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली. उत्पलजित बर्मन असे मृत डॉक्टरचे नाव आहे. डॉ. उत्पलजित बर्मन हे अनेस्थेशियामधील तज्ज्ञ होते. कोरोना विषाणूची बाधा होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून ४४ वर्षीय बर्मन … Read more

१२ हजार बनावट मास्क जप्त !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  बंगळुरू येथील एका गोदामातून तब्बल १२ हजार बनावट एन-९५ मास्क जप्त करण्यात आले. या मास्कची किंमत २० लाख रुपये असल्याची माहिती मंगळवारी पोलिसांनी दिली . जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे भारतात ३२ जणांचा मृत्यू झाला असून १,२५१ हून अधिक नागरिकांना संक्रमण झाल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मास्कची मागणी वाढली आहे. … Read more

भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवेसाठी सज्ज ! ८० हजार खाटांची व्यवस्था केली जाणार

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली : कोरोना संकटाविरोधात जगभर लढा सुरू असताना रेल्वेनेही आपली भव्य ताकद या कार्यात झोकून देण्याच्या दिशेने अभूतपूर्व तयारी केली आहे. या संकटात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज होत २० हजार डब्यांचे अलगीकरण वॉर्डात रूपांतर करण्याची योजना रेल्वेने आखली आहे. त्यानुसार जवळपास ३.२ लाख रुग्णांना यामध्ये वेगळे ठेवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. लॉकडाऊनदरम्यान, … Read more

धक्कादायक : दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात सहभाग घेवून अहमदनगर जिल्ह्यात परतले ३४ जण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील ३४ जण असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी २९ जण परदेशी नागरिक आहेत. या परदेशी नागरिकांपैकी १४ जणांची स्त्राव चाचणी अहवाल अद्यापपर्यंत आले असून दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ४३७ … Read more

अजित पवार भडकले ! म्हणाले आता सहन केल जाणार नाही …

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला. राज्यात कोरोनाची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहेत. त्यातच घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी … Read more