कोरोना व्हायरसचा धुमाकूळ : जाणून घ्या अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट्स या लिंकवर

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जगभर धुमाकूळ घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना व्हायरसने आता अहमदनगर शहरात देखील आपले पाय रोवण्यास सुरूवात केली आहे.जाणून घ्या कोरोना व्हायरसबाबत प्रशासनाचे अपडेट्स, उपाययोजना,निर्णय, माहिती व बातम्या या पेजवर.  (लास्ट अपडेट 4.22 AM 16-03-2020) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली आहेत.  नगरमध्ये कोरोनाचा आढळून आलेला रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती … Read more

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील या तरुणाची वर्णी लागणार ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- आमदार निलेश लंके यांचे निकटवर्तीय समजले जाणारे तसेच पारनेर नगर मतदार संघाचे नाव आपल्या वकृत्व गुणातून व सक्षम नेतृत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रात पोहोचविणारे शिवव्याख्याते जितेश सरडे यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मा.आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव अजिंक्यराणा पाटील हे या महत्वाच्या पदाची धुरा संभाळत होते. परंतु त्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : संभाजी महाराजांचा पुतळा बसविणा-या दहा जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शहरातील प्रोफेसर चौकात रविवारी (दि़ १५) पहाटे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी विनापरवाना छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविला. हे समजताच प्रशासनाने पुतळ्याचे पावित्र्य राखत तो काढून घेत सुरक्षित ठिकाणी हलविला. या घटनेनंतर प्रोफेसर चौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी … Read more

बोकड चोरण्याच्या इराद्याने गेलेल्या ‘त्याची’ नियत फिरली, आणि त्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केली !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील खानापूर येथील महिलेच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली आहे खानापूर येथील एका मतीमंद तरुणीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीस पोलिसांनी रविवारी पहाटे म्हाळादेवी शिवारातून अटक केली. ७ मार्चला या तरुणीवर अत्याचार करुन खून झाल्याची घटना घडली. याबाबत खून व अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कौन बनेगा करोडपतीच्या नावाखाली ४२ लाखांची फसवणूक !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अहमदनगर : ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला ६ करोडची लॉटरी लागल्याच्या नावाखाली एकाची ४२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची घटना कर्जतमध्ये घडली. या प्रकरणी सुरेश माधवराव शेजवह (वय ६८, रा.थिटेवाडी, ता.कर्जत) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार राणाप्रताप सिंग (रा.कोलकाता) व त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला … Read more

राज्यातील या भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार …

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पुणे : अरबी समुद्रातील पश्चिमी चक्रावात, बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने वाहणारे बाष्पयुक्त वारे, राज्यातील द्रोणीय स्थितीमुळे पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागांत सोमवारपासून (ता.१६) पुढील दोन-तीन दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सोलापूर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यांच्या … Read more

छोटा राजनच्या पुतणीने मागितली पन्नास लाखांची खंडणी

पुणे : कौटुंबिक वादाचे प्रकरण मिटविण्यासाठी गँगस्टार छोटा राजनची पुतणी प्रियदर्शनी निकाळजे आणि तिच्या दोन साथीदारांनी संगनमत करून शहरातील एका व्यक्तीकडे ५० लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिने छोटा राजन व माझा डीएनए एकच असल्याचे सांगत जीव प्यारा असेल, तर सांगितलेले सर्व ऐकण्याची धमकीही दिली. दरम्यान, तक्रारदाराकडून २५ लाखांची खंडणी घेण्यासाठी आलेल्यास … Read more

कोरोना मृतांच्या वारसांना मिळणार ४ लाख रुपये

नवी दिल्ली : कोरोना या विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८४ वर पोहचला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूची लागण झालेले दहा जण उपचारानंतर ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केल्याने आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश … Read more

धक्कादायक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय…  

अहमदनगर लाईव्ह24 टीम / मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, ती २६ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिली.  कोरोनाच्या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत म्हणजेच शहरी क्षेत्रातील सर्व सरकारी तसेच खासगी शाळा-कॉलेजेसना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या शिवाय मॉल्सदेखील बंद ठेवण्याचे … Read more

शाळा, कॉलेजसह आठवडे बाजार बंद

अहमदनगर लाईव्ह24 टीम / श्रीगोंदा : – कोरोनाच्या कोविड-१ या घातक विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार श्रीगोंदा शहरासह तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालय उद्या दि. १६ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद राहणार असून याबाबत पालक-विद्यार्थ्यांना शालेय प्रशासनाकडून सोशल मिडियामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून उद्याचा होणारा आठवडा बाजार रद्द करण्यासंदर्भात … Read more

रेल्वेस्थानकावर तब्बल १.१३ कोटीचे सोने जप्त

वृत्तसंस्था :- पश्चिम बंगालच्या कोलकाता शहराजवळील रेल्वेस्थानकावर १.१३ कोटी रुपयांचे २.७० किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन तस्करांना अटक केल्याची माहिती शनिवारी महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्याने दिली. कांचनजंगा एक्स्प्रेसमधून सोन्याची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती खबऱ्यांनी दिल्यानंतर डीआरआयच्या पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. अटक केलेल्या दोन तस्करांवर सीमा शुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल … Read more

मंगलदास बांदलची राष्ट्रवादीतून हकालपट्टी

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पुणे : एका नामांकित सराफाकडे ५० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पुणे पोलीस चौकशी करीत आहेत. हेच प्रकरण त्यांच्या अंगलट आले आहे. त्यामुळे बांदल यांची शनिवारी (ता.१४) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. दत्तवाडी पोलीस ठाण्यात … Read more

ट्रक भीषण अपघातात ५ ठार तर २४ जण जखमी

वृत्तसंस्था :- आसामच्या उदलगुडी जिल्ह्यात अनियंत्रित ट्रक झाडाला धडकून उलटल्यानंतर शनिवारी झालेल्या भीषण अपघातात ५ ठार तर २४ जण जखमी झाले. नववधूला सासरी सोडून तिचे नातलग ट्रकने गावाकडे परतत असताना नसोनसाली गावाजवळ ही दुर्घटना घडली. यावेळी भरधाव अनियंत्रित ट्रक झाडाला धडकल्यानंतर जागेवरच उलटला. या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू … Read more

कोरोना संशयित असलेल्या ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह24 टीम / बुलडाणा ;- सौदी अरेबियातून परतलेल्या चिखली येथील अकरा जणांपैकी कोरोना संशयित असलेल्या एका ७६ वर्षीय वृद्धाचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात १४ मार्च रोजी सायंकाळी मृत्यू झाला. कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्यानेे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. चिखली शहरातील एका मुस्लिम वस्तीमधील वेगवेगळ्या कुटुंबातील चार दाम्पत्य, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बस व दुचाकीच्या अपघातात एक ठार

अहमदनगर लाईव्ह24 टीम/ राहाता: राहाता तालुक्यातील राजुरी-बाभळेश्वर रस्त्यावर झालेल्या एसटी बस व मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीरामपूरकडून येणाऱ्या बसचा (क्र. एमएच १४ बीटी ५०७९) व बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या मोटारसायकलचा (क्र. एमएच ०६ एई १९३४) राजुरीजवळ अपघात झाला. यात मोटारसायकलवरील गवराम गुंजाळ (वय ५५, रा. खांडगाव, तालुका … Read more

ज्योतिरादित्यांच्या कारवर दगडफेक करत जीवघेणा हल्ला !

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ताफ्यावर शुक्रवारी सायंकाळी येथील काही अज्ञात लोकांनी दगडफेक केली. या प्रकरणी अज्ञात ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्त्यांन शिंदेंवर प्राणघातक हल्ला झाल्याचा दावा केला आहे. ‘ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कारचा ताफा शुक्रवारी सायंकाळी येथील कमला पार्क भागातून जात होता. त्यावेळी काही अज्ञात कार्यकर्त्यांनी … Read more

..या कारणामुळे प्रवाशांना मोफत मास्क!

अहमदनगर लाईव्ह24 टीम / वृत्तसंस्था :- कोरोनाने जगभरासह भारतातही दहशत निर्माण केली असताना प्रवाशांच्या आरोग्यासाठी कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसमधील वाहकाने शनिवारी प्रवाशांना मोफत मास्क वाटले. यासाठी बसचे वाहक एम. एल. नदाफ व चालक एच. टी. मयन्नावर यांनी स्वखर्चातून मास्क खरेदी केले होते. कोरोनाच्या भीतीने लोक एसटी प्रवास टाळत आहेत. त्यामुळे मास्क देऊन प्रवाशांना प्रोत्साहित … Read more

‘त्या’ बलात्कार प्रकरणात शिर्डीच्या उपनगराध्यक्षांसह पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम / शिर्डी :- एका तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करून फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डीत एका तरुणासह कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील धक्कादायक माहिती म्हणजे या प्रकरणात संशयित आरोपींमध्ये शिर्डीच्या विद्यमान उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन यांचा समावेश आहे. पीडित तरुणीने शिर्डी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिर्डी येथील आकाश … Read more