गोदावरी नदीत उसाचा ट्रॅक्टर कोसळला !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोपरगाव तालुक्यातील वारी गोदावरी नदीच्या पुलावरून ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली गोदावरी नदीत कोसळली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी झाली नाही,ट्रॉलीचे व शेतक-याच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा मात्र ऊस वाहतूक करणा-या चालकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्याच डल्लमची वाहतूक क्षमता वाढवून त्याला बैलाऐवजी ट्रॅक्टर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून मृतदेह जाळल्यानंतर आरोपी पोलिसात हजर !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  माणुसकीला काळिमा फासणारी आणखी एक घटना नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकुरखे गावात घडली आहे.चारीत्र्याच्या संशयावरून पतीने त्याच्या पत्नीचा निर्घृणपणे हत्या करत तिचा मृतदेह जाळला. याबाबत सविस्तर माहीती अशी की सुनील जनार्दन लेंडे हा एकुरखा शिवारात राहायचा त्याचे 2008 साली छाया हिच्यासोबत लग्न झाले होते त्यांना तीन मुले आहेत. सुनील हा … Read more

दम असेल तर अकोल्यात येऊन दाखवा मुंडन करुन परत पाठवू

अहमदनगर : कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अकोल्यात आज मोर्चा काढण्यात आला. या सभेत बोलताना शिवसेनेच्या कार्यकर्त्या स्मिता आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांच्यावर हमाला चढवला. तृप्ती देसाई यांनी हिंमत असेल तर अकोल्यात येऊन दाखवावं, त्यांचं मुंडन करुन परत पाठवू, असा इशारा  आष्टेकर यांनी तृप्ती देसाई यांना दिला. “तृप्ती देसाई नगर जिल्ह्यात जेव्हा आल्या तेव्हा इतका मोठा … Read more

सत्तेत सहभागी होताना दिलेल्या आश्वासनांचा विसर खुद्द मुख्यमंत्र्यांना पडला !

शिर्डी :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची केलेली फसवणूक आणि सरकारला  महीला अत्याचाराच्या घटना रोखण्यात येत असलेले अपयश स्पष्टपणे समोर आले आहे. सुरु असलेल्या योजनां बंद करुन स्वतःचे अपयश झाकणाऱ्या या नाकर्त्या स्थगिती  सरकारला जाब विचारण्यासाठी २५ फेब्रुवारी रोजी सर्वच तहसिल कार्यालयांवर आयोजित केलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे  आवाहन माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे … Read more

‘चलो एक पहल की जाये नये रास्ते की ओर’ म्हणजे नक्की काय ?

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनी शहरात स्वत:च्या नावे संपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्यात भाजप अथवा जनसेवा मंडळाला त्यात कुठलेही स्थान दिले नाही. मात्र, भाजप कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वीसहून अधिक नगरसेवकांची मोट बांधत विखे यांनी श्रीरामपुरात तयार केलेला ‘चलो एक पहल की जाये नये रास्ते की ओर’ हा … Read more

कोरोनामुळे चिकन झाले इतके स्वस्त …

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  कोरोनामुळेे कुक्कुटपालनाला लागलेले अफवांचे ग्रहण अधिकच गडद झाले आहे. मांसाहाराने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्यानंतर चिकनचे कोसळणारे दर सावरलेले नाहीत. त्यामुळे कुक्कुटपालन व त्या संलग्न शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. करोनाचा प्रभावामुळे राज्यात चिकनची मागणी घटली. नगर जिल्ह्यातील चिकन विक्रीचा दर 50 रुपयांनी कमी झाला आहे. करोनाच्या अफेवेमुळे राज्यात … Read more

आमदार नसल्याचे दुःख नसून जनता हीच आमचा देव धर्म

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी खासदार (स्व.) दादा पाटील शेळके हे चार वेळा आमदार तर दोन वेळा खासदार राहिले. जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांची राज्याला वेगळी ओळख होती. शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावून मोठया कष्टाने त्यांनी नगरचे नाव राज्याच्या व देशाच्या नकाशावर नेले, त्यामुळे बाजार समितीचे नामांतर कुठल्याही राजकीय हेतूने केले नसल्याचा टोला माजी मंत्री … Read more

ज्याच मन शुद्ध असत त्याला यश नक्कीच मिळतं …

आजपासून आपल्या दिवसाची सुरवात करणार आहोत अध्यात्मिक आणि प्रेरणादायी विचारांनी चला तर वाचुयात आपल्या मनाविषयी एक सुंदर लेख  शुद्ध मन हा आपल्याजवळचा सर्वांत मोठा अलंकार आहे. इतर अलंकार शरीराचे सौंदर्य वाढवतात; परंतु मनाच्या शुद्धतेचा प्रवाह अंतरंगाकडे असतो. म्हणूनच माणसाच्या मनातील शुद्धता संतांना लाखमोलाची वाटते. आपला खिसा एकवेळ भरलेला नसला तरीही चालतं. आपला खिसा गरम नसला तरीही … Read more

कोरोनाच्या धास्ती मुळे झाली तब्बल ६००० सर्जिकल मास्कची चोरी !

जपानमधील रेडक्रॉस हॉस्पिटलमधून सुमारे ६००० सर्जिकल मास्कची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. कोरोना नावाच्या आजाराच्या धास्तीमुळे मास्कची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे मास्कची जबरदस्त टंचाई निर्माण झाली आहे . या आजारापासून बचाव करण्यासाठी अनेक लोकं मास्क खरेदी करत आहेत,  मास्कच्या किमतीसुद्धा भरमसाट वाढल्या आहेत. कोबे शहरातील रेडक्रॉस हॉस्पिटलच्या स्टोअररूममधून मास्कचे मोठे ४ बॉक्स चोरीस गेल्याचे सकाळीच … Read more

या दोन गोष्टींमुळे होतोय ब्रेकअपचा जास्त त्रास !

Photo- Sheen Magazine

ब्रेकअप हा आयुष्यातला सर्वात कठीण काळ असतो. बऱ्याच जणांना यातून बाहेर येणं खूपच कठीण होऊन बसतं. यातून बाहेर येण्यासाठी बरीच वर्षही लागतात. आयुष्य काही कामाचं नाही आणि सगळं जग मतलबी असल्यासारखं वाटायला लागतं. पण यातून बाहेर येणं अत्यंत गरजेचं असतं पण यात अनेक अडथळेही असतात. काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका संशोधनामुळे आजच्या पिढीला इन्स्टाग्राम , … Read more

१ कोटी ३३ लाखांची फसवणूक

संगमनेर: संगमनेर येथील सुकेवाडी भागातील व्यापारी मनोहर दगडू सातपुते यांच्याकडून उत्तर प्रदेश येथील आरोपी अमन राजपूत , मनोहर राजपूत रा . ललई , पोस्टे खेरगड , फिरोजाबाद या दोघांनी वेळोवेळी कांदा माल खरेदी केला. हा कांदा ट्रकने पाठविण्यात आला . या सर्व कांद्याची रक्कम १ कोटी ३३ लाख ६६ हजार ८०३ रुपये झाली. हे पैसे … Read more

विवाहितेचा विनयभंग करून पतीच्या डोळ्यात फेकली मिरची

संगमनेर- संगमनेर शहरात शिवाजीनगर परिसर विद्यानगर भागात राहणारी एक २६ वर्षाची विवाहित तरुणी महाशिवरात्रीला दर्शनासाठी जाण्यासाठी गाडीत बसत असताना  आरोपी सागर बाळासाहेब कळंबे, रा. शिवाजीनगर, राहुल आव्हाड , रा. विद्यानगर या दोघांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन धरुन ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करुन विनयभंग केला. महिलेने प्रतिकार करताच गाडीच्या बाहेर ओडून मारहाण केली. यावेळी … Read more

मुळानदीत कृषी विद्यापिठातील कर्मचाऱ्याची आत्महत्या

राहुरी : राहुरीच्या कृषी विद्यापिठात ठेकेदार मार्फत नोकरीस असलेल्या २३ वर्षिय युवकाचा मुळा नदीपात्रात आज शनिवार दि . २२ फेब्रुवारी रोजी सकाळी मृतदेह आढळुन आला असल्याने मोठी खळबळ उडाली असुन या घटनेमुळे परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. याबाबत राहुरी पोलिसात सुरवातीस मिसिंग दाखल करण्यात आली होती तर आज आकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली … Read more

एकाची पाण्याची टाकीत तर दुसऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

 संगमनेर :  शहरातील श्रीरामनगर येथील सूरज चंद्रकांत अभंग , वय २३ या तरुणाने घराच्या छतावर असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली . तर घोडेकर मळ्यातही संदीप प्रभाकर कांबळे, वय ३२ याने राहत्या घरातील सिलिंगच्या हकला साडी बांधून गळफास घऊन आत्महत्या कल्याचा घटना बुधवार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भरदिवसा शेतात तरुण महिलेवर सामूहिक बलात्कार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालक्यातील संवत्सर शिवारात एक ३२ वर्षाची तरुण महिला शेतात गवत कापत असताना तिच्यावर 3 नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी ३ च्या सुमारास संवत्सर शिवारातील एका शेतात आरोपी राहुल पंढरीनाथ सोनावणे , वय २६ , विशाल रामराव गिरे , वय ३६ , सोमनाथ तुकाराम गायकवाड , … Read more

अहमदनगर जिल्ह्याचा कायापालट करणार

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. आपल्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना जे काम करायचे आहे, ते प्रामाणिकपणे करू ! पाहिजे तसा जिल्ह्याचा विकास झाला नाही. मात्र, शहरासह जिल्हा विकसीत आणि सुंदर करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. तसेच नगर जिल्हा विकासाच्या बाबतीत राज्यात अव्वल राहील, यासाठी प्रयत्न करू, … Read more

लासलगाव जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई : नाशिक येथील लासलगाव बस स्थानकात पेट्रोल अंगावर पडून गंभीर भाजलेल्या पीडित महिलेचा मुंबईत उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला . गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेली पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर संपली. भायखळा येथील मसिहा रुग्णालयात शुक्रवारी रात्री १२.३० वाजता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे. मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत … Read more

श्रीगोंदा तालुका भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर 

श्रीगोंदा : भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये ७ उपाध्यक्ष, ७ सरचिटणीस, ७ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, ३ कार्यालयीन चिटणीस, १ प्रसिद्धी प्रमुख,   विविध आघाड्याचे  अध्यक्ष, २२ कार्यकारणी सदस्य असा एकूण १८५ जणांची समावेश असल्याची माहिती तालुकाध्यक्ष  संदीप नागवडे यांनी दिली. यामध्ये सर्वच नव्या – जुन्याचा मेळ घालून काहींना पुन्हा संधी … Read more