मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्व्वोचपदी विराजमान !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली : ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे भारतीय सैन्याचे नवे लष्करप्रमुख होणार आहेत. नरवणे यांच्या रूपाने मराठी माणूस देशाच्या लष्कराच्या सर्व्वोचपदी विराजमान होणार आहे. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. नरवणे हे मूळचे पुण्याचे आहेत. ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असलेल्या मनोज नरवणे यांनी एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहराडून … Read more

दृष्टिकोन बदलल्याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबणार नाही – आ. राजळे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शेवगाव: देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना समाजात महिला सुरक्षित नाहीत, स्त्रीमुक्तीचा जागर झाला असला तरी समाजाची महिला भगिनींकडे बघण्याची मानसिक्ता आणि दृष्टिकोन बदलल्याशिवाय महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. शेवगावच्या राजीव राजळे प्रतिष्ठानच्या वतीने विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल आ. राजळे … Read more

पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी शिर्डीत सर्वपक्षीय बैठक

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / शिर्डी :- शहरात वाढती गुन्हेगारी, मोठ्या प्रमाणावर साईभक्तांचे होणारे शोषण, साईभक्तांना होणारा वाहतूक पोलिसांचा त्रास, आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या टोळ्या या विषयावर पोलीस प्रशसानाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते, माजी नगराध्यक्ष कैलासबापु कोते, रज्जाक शेख व सर्वपक्षिय शिर्डी ग्रामास्थांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामस्थ, राजकिय पदाधिकारी, माजी नगरसेवक, … Read more

महापालिकेकडून ‘अब की बार, थ्री स्टार’चा नारा

अहमदनगर – अहमदनगर महानगरपालिकेकडून स्वच्छता विषय उपाययोजनांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेची जनजागृती व प्रोत्साहन दिले जात आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिकेच्या उत्कृष्ट सफाई कर्मचार्‍यांचा व शहरातील शाळा, शासकीय कार्यालये, हॉस्पिटल व हॉटेल या आस्थापनांना स्वच्छता पुरस्कारांचे वितरण सोमवारी (दि.16) शानदार सोहळ्यात करण्यात आले. महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्वांना शुभेच्छा देतांनाच ‘अब … Read more

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम करताना बीएड अथवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाने नोटिसा पाठवल्या आहेत. नोटीस पाठवलेल्या १३३ जणांवर कारवाईची टांगती तलवार असून, या शिक्षकांकडून पुराव्यासह लेखी खुलासा प्रशासनाच्या वतीने मागवण्यात आला आहे. पदोन्नती, वेतनश्रेणीत वाढ होण्यासाठी शिक्षकांना बीएड, पदवीची आवश्यकता असते. अनेकदा शिक्षक त्यासाठी मुक्त विद्यापीठ … Read more

त्याने तरुणीचा विनयभंग केला आणि म्हणाला ‘मी उद्या पुन्हा येईल’!

अमरावती :- विधानसभा निवडणूक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईल ह्या विधानाने चांगलीच गाजली, फडणवीस यांचे हेच वाक्य चक्क एका तरुणाने विनयभंग करताना वापरलेय. याबाबत सविस्तर माहिती अशी कि  कपडे धुणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेची छेड काढून ‘मी उद्या पुन्हा येईल’ अशी धमकी देणाऱ्या एका २८ वर्षीय युवकाविरुद्ध माहुली पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून रविवार, … Read more

संतापजनक : आई आणि मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार !

अमरावती ;- हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात निषेध नोंदवला जात असताना अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.  अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेसह तिच्या २१ वर्षीय मुलीवर दहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रविवारी (दि. १५) दहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा … Read more

शेतमजुरीचे नियम आणि दर पत्रक ठरवणारे पहिले गाव

अहमदनगर :- कधी आस्मानी तर कधी सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजापुढे आता एक नवी समस्या उभी ठाकली आहे ती म्हणजे शेतीकामासाठी शेतमजूर मिळणे. हिच समस्या सोडविण्यासाठी टाकळीमियॉ येथील शेतकर्यांनी एक शकल लढविली परंतू यामधे शेतकरी अन् शेतमजुर यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ग्रामीण भागात सर्वत्र शेतमजूर आणि त्यांच्या मोबदल्याचा प्रश्न गंभीर … Read more

नेवाशाच्या नगराध्यक्षपदासाठी सरळ लढत

नेवासा – नेवासाच्या नगराध्यक्षपदाची उद्या बुधवारी निवड होणार आहे.  काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने भाजपा- काँग्रेस व अपक्षांच्या नगरपंचायत विकास आघाडी व आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीकारी शेतकरी पक्षात सरळ लढत होणार आहे. भाजपच्या डॉ. सौ. प्रमिला सांगळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्या … Read more

‘त्या’ दिवसानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी होणार बिनकामाचे

अहमदनगर: जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकार्‍यांची मुदत येत्या 20 डिसेंबरला संपणार आहे. त्यानंतर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसतो पण काही  तांत्रिक कारणामुळे या पदाधिकार्‍यांना काळजीवाहू स्वरूपात जिल्हा परिषदेत पुढील पदाधिकारी निवडीपर्यंत काम करावे लागणार आहे. या विद्यमान काळजीवाहू पदाधिकार्‍यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही . जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच विषय समित्यांचे सभापती यांचा कार्यकाल … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार

संगमनेर: तळेगाव दिघे येथील अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेऊन अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी सोनू ऊर्फ सुधीर संपत मोकळ याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. मुळानगर (ता. राहुरी) येथील रहिवासी व सध्या तळेगाव दिघे येथे मोलमजुरीसाठी राहणाऱ्या महिलेची मुलगी ५ डिसेंबरला सकाळी शौचास जाते असे सांगून घरातून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कार कोसळून आजी व नात ठार

पाथर्डी : मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेऊन मढीकडे येणाऱ्या भाविकांची होंडा कार खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात आजी व नात ठार, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. मायंबा घाटात कार तीनशे फूट खोल दरीत कोसळली. तेजल सचिन वाघ (२ वर्षे) या मुलीला जखमी अवस्थेत नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी … Read more

कांद्याला ९००० रुपये भाव

राहुरी : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल कांद्याच्या २,७०२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ९००० रूपये भाव मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ७५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असून दोन नंबर कांद्यास ४००० ते ७४९५, तीन नंबर कांद्यास ५०० ते ३०९५ रुपये तर गोल्टी कांद्यास १००० ते … Read more

किरकोळ कारणावरून महिलांना मारहाण

अहमदनगर : तुझ्या पतीला जेलमधून सोडवण्यासाठी किती खर्च आला.अशी विचारणा करत शिवीगाळ करून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घडली. या घटनेत कविता सागर पवार व शकुंतला याद्या पवार या दोघी जखमी झाल्या आहेत.याप्रकरणी कविता पवार यांच्या फिर्यादीवरून शेख याद्या पवार सुविधा शेख पवार या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more

व्यापाऱ्यास मारहाण करून लुटले

अहमदनगर : कापड दुकान बंद करून रात्रीच्यावेळी घरी जात असलेले व्यापारी कमलेश अमरलाल अहुजा (रा.द्वारकानगर, बालिकाश्रमरोड) यांना पत्रकार चौकात तिघांनी दुचाकी आडवी लावून धक्काबुकी करत त्यांच्याजवळील ६० हजारांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी अहुजा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अहुजा यांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री एमजीएम रोडवरील कापड दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे चालले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :- बंगला नावावर करण्याची धमकी,महिला डॉक्टरने अखेर संपविले जीवन !

अहमदनगर :- अहमदनगर शहरात गुलमोहोर रोड, नवनाथनगर, कोहिनूर मंगल कार्यालयाच्यामागे प्लॉट क्र. २ संतोषी निवास येथे राहणाऱ्या डॉ. सुजाता आसाराम साळवे, वय ४९ या डॉक्टर महिलेला चौघा आरोपींनी वेळोवेळी त्यांच्या नावावरील बंगला आरोपींच्या नावावर करण्यासाठी मारहाण करुन शिवीगाळ केली दमदाटी केल्याने डॉ . सुजाता आसाराम साळवे, वय ४९ (अहमदनगर) या महिलेने आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. सुजाता … Read more

तुम्हाला जगायचे का? म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ

नेवासा :-  तालुक्यातील गोयेगव्हाण येथे राहणारी विवाहित तरुणी सौ. प्रिती प्रदीप नवथर, वय २७ हिचे पती प्रदीप नवथर, सासरे संभाजी नवथर या तिघांना ५ जणांनी मोटार सायकलवर येवून काही एक कारण नसताना विनाकारण तुम्हाला जगायचे का? असे म्हणत लाथाबुक्क्याने मारहाण करत शिवीगाळ केली. दगडाने प्रदीप नवथर यांच्या पायावर मारले. यात तरुणीचे मंगळसूत्र गहाळ झाले. सौ. … Read more

आजोबासह नातवास जबर मारहाण

अहमदनगर : आपल्या आजोबाची वाट पाहत थांबलेल्या चंद्रकांत युवराज मजानवर यांना काही एक कारण नसताना पाच जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत ते जखमी झाले आहेत.ही घटना दि.१४ डिसेंबर रोजी जामखेड तालुक्यातील वाकी लोणी फाटा येथे घडली. या प्रकरणी चंद्रकांत मजानवर यांच्या फिर्यादीवरून आसाराम मुळशीराम सावंत (वय ४५, रा.वाकी),वैभव आसाराम सावंत (वय २५ रा.वाकी),अनिता आसाराम … Read more