शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्तांसाठी इतक्या कोटींचा निधी

मुंबई : राज्यात ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आकस्मिकता निधीतून साडेचार हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत. तसेच जुलैनंतर अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसलेल्या बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी ३८९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकारी मदत संबंधितांच्या थेट बँक खा त्यात जमा होणार आहे. या पैशांतून कोणतीही वसुली … Read more

अखेर ‘त्या’ ज्वेलर्सच्या फरार बंधूंना अटक

ठाणे : अखेर गुडविन ज्वेलर्सच्या फरार मालकांना बेड्या ठोकण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघांनाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हे दोघे भाऊ मागील दीड महिन्यापासून फरार होते. १ हजार १५४ गुंतवणूकदारांची अंदाजे २५ कोटी रुपयांची फसवणूक या दोघा भावांनी … Read more

परजातीच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने बापाने केली मुलीची हत्या आणि नंतर…

डोंबिवली : परजातीच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने बापाने मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना रविवारी टिटवाळा येथे घडली होती. धड व शीर नसलेला मृतदेह कल्याण स्टेशन परिसरात बॅगेत सापडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी बापाला पोलिसांनी अवघ्या ३० तासांत अटक केली. त्या वेळी त्याने आपल्या मुलीच्या शरीराचे तीन तुकडे करून शीर व धड दुर्गाडी ब्रिजवरून खाडीत टाकून दिल्याचे उघड … Read more

थंडीचा जोर वाढला !

मुंबई :- शुक्रवारी मुंबईतील तापमान १९.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. नोव्हेंबर महिना सुरू झाला की थंडी सुरू होते. मात्र मुंबईत जवळपास महिनाभर थंडी गायब झाली होती. त्यामुळे हिवाळा सुरू होऊन गुलाबी थंडीची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडी सुरू झाल्याने मुंबईकरांना हिवाळा जाणवू लागला आहे. मुंबईत माझगाव, दादर, पवई येथील कमाल तापमान २८ … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी … Read more

राहुल गांधींनी त्या वक्तव्या प्रकरणी माफी मागावी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचे शुक्रवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. भाजपाने या प्रकरणी राहुल यांच्या माफीची मागणी करत संसदेत काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ‘महिलांविषयी असे विधान करणाऱ्या राहुल यांना संसदेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही,’ अशी कडवट भूमिका भाजपाने यासंबंधी घेतली. दरम्यान, राहुल यांनी या … Read more

तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर वाचा हसण्याचे हे ‘७’ फायदे!

 हसण्यामुळे आरोग्यावर अनेक प्रकारचे चांगले परिणाम होतात. त्यामुळे व्यक्‍तीला आपण निरोगी असल्याची जाणीव होते. तणाव, निराशा आणि उच्च रक्‍तदाबासारख्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते. हसण्याचे शरीराला आणि मेंदूला खूप फायदे मिळतात.हसण्याने माणूस फक्त दीर्घायुषीच होत नाही तर ह्द्यविकार , रक्तदाबाचा धोखाही कमी होतो. केवळ आपल्या जराशा हसण्यामुळे फोटो चांगला येऊ शकतो, तर खळखळून हसल्यानं जीवनातील … Read more

या राज्यात बलात्कार प्रकरणाचा अवघ्या २१ दिवसांत होणार निपटारा!

वृत्तसंस्था :-  हैदराबादेतील एका पशुवैद्यक तरुणीची नुकतीच सामूहिक बलात्कारानंतर निघृर्ण हत्या करण्यात आली. या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर आंध्र विधानसभेने शुक्रवारी ‘आंध्र प्रदेश दिशा अधिनियम फौजदारी कायदा (आंध्र प्रदेश सुधारित) अधिनियम-२०१९’वर आपली मोहोर उमटवली. या विधेयकाद्वारे मृत पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. महिला व मुलांवरील अत्याचार विशेषत: लैंगिक अत्याचाराच्या खटल्यांची वेगवान सुनावणी … Read more

धक्कादायक : पॉर्न वेबसाईट वर लोकं करतात हे सर्च !

वृत्तसंस्था :- वर्षाच्या शेवटी कळतं की आपलं पूर्ण वर्ष कसं गेलं. लोकांना यावर्षी सगळ्यात जास्त काय आवडलं, कोणत्या गोष्टीला नकार दिला आणि कोणत्या गोष्टी यावर्षी ट्रेंडमध्ये राहिल्या, पूर्ण वर्षाचा लेखाजोखा बघण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे केले जातात. आता यामध्ये पॉर्न सुद्धा सामील आहे. अडल्ट पॉर्न वेबसाईट पॉर्नहब ने 2019 चा सर्वे केला आहे. या सर्वेमध्ये त्यांनी … Read more

धनंजय मुंडे यांना आपण कधीही साथ दिली नाही – देवेंद्र फडणवीस

मुंबई :- गोपीनाथगडावर खडसे ज्या प्रकारे बोलले ते बोलले नसते तर बरे झाले असते, अशी खंत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.  धनंजय मुंडे यांना आपण कधीही साथ दिली नाही. याउलट जेव्हा कधी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आरोप केले तेव्हा कायम विधिमंडळात मी पंकजा यांच्या पाठीशी उभा राहिलो. यापुढेही त्यांना साथ देईन, असेही … Read more

काय करणार आमदार शिवाजी कर्डिले पराभूत झाल्यानंतर ? वाचा

पाथर्डी :- मी पैलवान गडी आहे. कुस्तीतल्या मैदानाप्रमाणे राजकीय आखाड्यामध्ये अनेक जय पराजय पाहिलेत. अनेकवेळा माझ्यावर मोठे आघात झाले. अनेक संकटे माझ्यावर राजकीय सुडबुध्दीने लाधली गेली. मात्र नितीमत्तेच्या बळावर मी सर्व आडचणींवर मात करू शकलो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी माझ्या पराभवाने खचुन न जाता अध्र्या रात्री मला हाक द्या, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आजपासून आपण मतदार … Read more

शिर्डी – कोपरगाव राज्यमार्गावर मृतदेह आढळला

कोपरगाव : तालुक्यातील तीनचारी येथे शिर्डी- कोपरगाव दरम्यान राज्यमार्गावर शेती महामंडळाच्या जमिनीत काटेरी झुडपात अंदाजे ५८ वर्षे वय असणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळला आहे. शुक्रवारी (दिनांक १३) दुपारी ४ वाजेच्या सुमारास या भागात शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला हा मृतदेह दिसला. त्याने आसपासच्या नागरिकांना याबाबत सांगितले. ही माहिती पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी आले. या इसमाच्या डाव्या हाताच्या नसा … Read more

आमदार बबनराव पाचपुते व रोहित पवार यांची आमदारकी धोक्यात !

अहमदनगर :- दोन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आ.बबनराव पाचपुते आणि आ.रोहित पवार यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली. विधानसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावलेल्या पराभूत उमेदवारांनी आता कायदेशीर आखाड्यात उडी घेतली आहे. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते तर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज भरताना गुन्ह्यांची माहिती लपविणे, … Read more

जामीनदार न झाल्याने आतेभावाचा खून करणार्या आरोपीस जन्मठेप !

अहमदनगर :- जेलमध्ये असताना जामीनदार झाला नाही.याचा राग धरून आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे, रा.वडुले बु. काळे वस्ती ता.शेवगाव.याने त्याचा आतेभाऊ मयत संदिप दत्तात्रय जर्गे याचा चाकूने भोसकून खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायाधीश क्र. २ श्री.अशोककुमार भिल्लारे यांनी आरोपी ज्ञानेश्वर काळे याला जन्मठेप व १०,००० रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील … Read more

का झाला माजी आमदार अनिल राठोड यांचा पराभव ? हे दोन नगरसेवक हिटलिस्टवर !

अहमदनगर :- राज्यात आणि देशात युतीचे सरकार असूनही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अनिल राठोड यांना पराभवास सामोरे जावे लागले. तब्बल ११ हजार ११५ मतांनी आ.अनिल राठोड यांचा राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पराभव केला,हा पराभव राठोड यांच्यासह शिवसैनिकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. केवळ भाजपच नव्हे, तर शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी पक्षविरोधी काम केल्याची चर्चा आहे.आणि … Read more

विखे पाटील पिता पुत्रांवर शिवाजी कर्डिले यांची जोरदार टीका केले हे वक्तव्य !

राहुरी :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर प्रथमच माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या मनातील भावना मांडल्या आहेत,तनपुरे साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून थेट विखे पिता – पुत्रांवरच त्यांनी आरोपांचा हल्ला केला आहे. फक्त लोकसभा निवडणुकीत फायदा होण्याच्या राजकीय हेतूने विखे पिता-पुत्रांनी राहुरीचा डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू केला होता काय, असा संशय येतो, असे वक्तव्य … Read more

साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह !

औरंगाबाद: शिर्डी येथे साई दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून महिला, पुरुष आणि मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण भयावह असल्याची भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने व्यक्त केली आहे. व्यक्ती गायब होण्याच्या अशा प्रकारातून मानवी तस्करी किंवा मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत काय, असा प्रश्नही खंडपीठाने उपस्थित केला. खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एस. एम. … Read more

धक्कादायक : बापाकडून मुलीचा गळा दाबून खून

पुणे : पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तालय हद्दीतील दापाेडी येथे एका कुटुंबातील १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून सावत्र बापाने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीवर बापाने लैंगिक अत्याचार केला आहे का, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर ते स्पष्ट हाेईल, अशी माहिती भाेसरी पाेलिसांनी दिली. विजय बबन चव्हाण (४४, रा. दापाेडी) असे आराेपीचे नाव आहे.