धक्कादायक : दुपारच्या सुट्टीत वर्गात शिरून विद्यार्थिनीचा विनयभंग !

नेवासा : तालुक्यातील शिरसगाव येथे एकाने शाळेत दुपारच्या सुट्टीत वर्गात शिरून एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना दि. ६ डिसेंबर राजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यावर मुलीचे वडील समजाऊन सांगण्यासाठी गेले असता, त्यांना मारहाणही करण्यात आली आहे. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की तुषार राजेंद्र पोटे याने या विद्यार्थिनीच्या वर्गात जाऊन तिला लज्जा उत्पन्न होईल, … Read more

पूरग्रस्तांच्या नावे साडे चार लाखांची फसवणूक

अहमदनगर- सावेडी परिसरातील गुलमोहोर रोडवर नवलेनगर येथे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुम्हाला पैसे पाठवतो, असे सांगून अज्ञात इसमाने साडे चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि.५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भाऊसाहेब विष्णू डमाळे (वय ४१, रा.गजानन कॉलनी, नवलेनगर, सावेडी) यांना अज्ञात इसमाने ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान कँरोल डायन … Read more

अपघातात मोटारसायकलस्वार ठार

 संगमनेर : शहरातील तीन बत्ती चौकात एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार दि. १३ डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. भावडू रमेश ढेपणे (वय २२, हरसूल, जि. नाशिक) असे मोटरसायकलस्वराचे नाव आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यप्रदेशातील भावडू ढेपने हा संगमनेरात एका मंडपवाल्याकडे काम करत … Read more

शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन अहमदनगर जिल्ह्यातील या संस्थेने केली तब्बल 15 लाखांची फसवणूक !

अहमदनगर : शिक्षक म्हणून नोकरी देतो असे सांगुन सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठाणने दोघांची १५ लाख रूपयांची फसवणुक केल्याची घटना भिंगार परिसरातील सैनिक नगर येथे घडली. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद गुरुवारी (दि.१२) करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भिंगार परिसरातील बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार … Read more

आ. प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या ह्या कामाचा तुम्हालाही अभिमान वाटेल !

राहुरी :  राहुरी शहर व तालुक्यातील सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतमजुर, मजूर, ग्रामीण भागातील नागरिकांचा डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सेवाभावी संस्थेच्या वतीने आ.प्राजक्त तनपुरे यांनी एक लाख रुपयांचा विमा काढला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन आ.प्राजक्त तनपुरे यांनी सदर कार्यक्रम राहुरी नगरपालिका सभागृहात आयोजीत के ला होता. यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप … Read more

अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ही मागणी

संगमनेर :- कर्जबाजारीपणामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचा करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निळवंडे (ता. संगमनेर) येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, काँग्रेस सेवादलाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष कचरू पवार यांनी केली आहे. मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधानसभेचे सभापती नाना पटोले यांची भेट घेत सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे … Read more

‘तनपुरे’ कारखान्याचे भवितव्य पुन्हा अंधारात!

अहमदनगर : उत्कृष्ट कामगिरीची ओळख असलेल्या साखर कारखान्यांमध्ये डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर करखाना अग्रेसर होता. कारखान्याच्या स्थापना काळापासूनच जिल्हा बँकेने कारखान्यास पतपुरवठा केला. कार्यक्षेत्रात अंदाजे वीस लाख टन उसाचे उत्पादन असूनही कारखाना मात्र बंद आहे. मधल्या काळात शेतकरी, कामगारांची कामधेनू पुनर्जीवित होण्यासाठी बँकेने सहकार्य केले. मात्र, कारखाना बंद असल्याने थकबाकीत वाढ होत आहे. … Read more

अहमदनगर जिल्हापरिषदेत ह्या निर्णयामुळे सदस्य झाले आक्रमक

अहमदनगर : शासनाने ग्रामपंचायत विभागाचा चौदाव्या वित्त आयोगातून परस्पर जो निधी कपात केला आहे. त्यात नगर जिल्ह्याचे एकूण ७४ कोटी रूपयांचा निधी कपात केलेला आहे. या निधी कपातील अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध दर्शवला. हा कपात केलेला निधी कोठे गेला. याबाबत जोपर्यंत शासन योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत कोणत्याही पाणीयोजनेचे वीज कनेक्शन तोडू नयेत, अशी … Read more

निर्मला सीतारमण यांनी मिळविला ह्या यादीत ३४ वा क्रमांक

नवी दिल्ली: देशाच्या आर्थिक स्थितीवरून विरोधकांच्या निशाण्यावर असलेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा जगातील १०० सर्वात सामर्थ्यशाली महिलांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘फोर्ब्स’ मासिकाने सीतारमण यांना आपल्या यादीत ३४वे स्थान दिले आहे. तर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल सलग नवव्या वर्षी अव्वल स्थानी आहेत. ‘टाइम’च्या पर्सन ऑफ द इअरची मानकरी ठरलेल्या १६ वर्षीय ग्रेटा … Read more

‘निर्भया’ची आई पुन्हा सुप्रीम कोर्टाच्या दारात

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार व हत्याकांडातील एका आरोपीच्या फेरविचार याचिकेविरोधात पीडितेच्या आईने शुक्रवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी आरोपीची फेरविचार याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. अवघ्या देशाला हलवून सोडणाऱ्या या प्रकरणातील अक्षय कुमार नामक आरोपीने आपल्या मृत्युदंडाविरोधात सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली आहे. कोर्ट त्यावर … Read more

जूनअखेर हे काम पूर्ण करा – मंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई : निळवंडे धरणाचे काम येत्या जूनअखेर पूर्ण करून धरणात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होईल, यासाठी निळवंडे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देऊन, कालबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्याचे आदेश महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. मंत्रालयात उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे-२) संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रकल्पाचा पूर्ण आढावा घेऊन प्रकल्पाच्या कामात काय … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्तांसाठी इतक्या कोटींचा निधी

मुंबई : राज्यात ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आकस्मिकता निधीतून साडेचार हजार कोटी रुपये वितरीत केले आहेत. तसेच जुलैनंतर अतिवृष्टी आणि पुराचा तडाखा बसलेल्या बाधित व्यक्तींच्या मदतीसाठी ३८९ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकारी मदत संबंधितांच्या थेट बँक खा त्यात जमा होणार आहे. या पैशांतून कोणतीही वसुली … Read more

अखेर ‘त्या’ ज्वेलर्सच्या फरार बंधूंना अटक

ठाणे : अखेर गुडविन ज्वेलर्सच्या फरार मालकांना बेड्या ठोकण्यात ठाणे आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुडविन ज्वेलर्सचे मालक सुनीलकुमार मोहनन अकराकरण आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघांनाही ठाणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. हे दोघे भाऊ मागील दीड महिन्यापासून फरार होते. १ हजार १५४ गुंतवणूकदारांची अंदाजे २५ कोटी रुपयांची फसवणूक या दोघा भावांनी … Read more

परजातीच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने बापाने केली मुलीची हत्या आणि नंतर…

डोंबिवली : परजातीच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याने बापाने मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना रविवारी टिटवाळा येथे घडली होती. धड व शीर नसलेला मृतदेह कल्याण स्टेशन परिसरात बॅगेत सापडल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी बापाला पोलिसांनी अवघ्या ३० तासांत अटक केली. त्या वेळी त्याने आपल्या मुलीच्या शरीराचे तीन तुकडे करून शीर व धड दुर्गाडी ब्रिजवरून खाडीत टाकून दिल्याचे उघड … Read more

थंडीचा जोर वाढला !

मुंबई :- शुक्रवारी मुंबईतील तापमान १९.५ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. नोव्हेंबर महिना सुरू झाला की थंडी सुरू होते. मात्र मुंबईत जवळपास महिनाभर थंडी गायब झाली होती. त्यामुळे हिवाळा सुरू होऊन गुलाबी थंडीची प्रतीक्षा मुंबईकरांना होती. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत थंडी सुरू झाल्याने मुंबईकरांना हिवाळा जाणवू लागला आहे. मुंबईत माझगाव, दादर, पवई येथील कमाल तापमान २८ … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांची विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका !

अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माजी मंत्री राम शिंदे यांनी देखील त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. माजीमंत्री शिंदे यांनी विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेऊन फायदा तर झाला नाही उलट त्यांच्यामुळे आमचं नुकसानच झाल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांची नाराजी … Read more

राहुल गांधींनी त्या वक्तव्या प्रकरणी माफी मागावी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानाचे शुक्रवारी संसदेत तीव्र पडसाद उमटले. भाजपाने या प्रकरणी राहुल यांच्या माफीची मागणी करत संसदेत काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. ‘महिलांविषयी असे विधान करणाऱ्या राहुल यांना संसदेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही,’ अशी कडवट भूमिका भाजपाने यासंबंधी घेतली. दरम्यान, राहुल यांनी या … Read more

तुम्हालाही निरोगी राहायचे असेल तर वाचा हसण्याचे हे ‘७’ फायदे!

 हसण्यामुळे आरोग्यावर अनेक प्रकारचे चांगले परिणाम होतात. त्यामुळे व्यक्‍तीला आपण निरोगी असल्याची जाणीव होते. तणाव, निराशा आणि उच्च रक्‍तदाबासारख्या आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते. हसण्याचे शरीराला आणि मेंदूला खूप फायदे मिळतात.हसण्याने माणूस फक्त दीर्घायुषीच होत नाही तर ह्द्यविकार , रक्तदाबाचा धोखाही कमी होतो. केवळ आपल्या जराशा हसण्यामुळे फोटो चांगला येऊ शकतो, तर खळखळून हसल्यानं जीवनातील … Read more