वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

राजुरा : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या विहीरगाव उपक्षेत्रातील मूर्ती वनबिटात बैल चराईसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीहरी साळवे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. विहीरगाव उपवनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मूर्ती वनबिटालगतच्या शेतशिवारात श्रीहरी साळवे हे बैल चराईसाठी गेले होते. त्याचवेळी दडून बसलेल्या वाघाने श्रीहरी साळवे यांच्यावर हल्ला केला. यात … Read more

पोलीस-दरोडेखोरांमध्ये धुमश्चक्री

राहुरी : राहुरी पोलीस व दरोडेखोरांच्या टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर राहुरी पोलिसांनी चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळविले. तर दोघेजण पसार झाले.  यावेळी पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत या दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सागर गोरख मांजरे (वय २२, पाईपलाईन रस्ता यशोदानगरजवळ, नगर), अविनाश अजित नागपुरे (वय २०, रा. … Read more

नगर-दौंड रस्त्यावर अपघात; दोघे ठार

अहमदनगर : नगर दौंड रस्ता हा प्रवासाच्या दृष्टीने चांगला झाला असला तरी भरधाव जाणारी वाहने, नियमांचे होणारे उल्लंघन, दारूच्या नशेत वाहन चालवणे यामुळे हा रस्ता अल्पावधीतच मृत्यूचा सापळा बनला आहे.   दि.२४ रोजी नगर दौंड महामार्गावर विसापूर फाट्याजवळ नगरकडून फलटणकडे धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या टाटा सफारी (क्र.एम.एच.१६.ए.जे.५०६७) या वाहनाचा वेग आवरता न आल्याने वाहन पलटी होऊन … Read more

देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की

मुंबई : अजित पवार यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजीनामा दिला आहे.  फडणवीसांनी बहुमत चाचणीतील पराभव टाळण्याऐवजी फडणवीसांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गोपनीयपणे सत्तास्थापनेचा दावा करत 23 नोव्हेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासोबत भाजपला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या बंडखोर नेते अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली … Read more

BREAKING NEWS – अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई : अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अजित पवारांची मनधरणी केल्यानंतर शपथविधीनंतर अवघ्या तीन दिवसातच अजित पवारांनी राजीनामा दिला आहे.  राष्ट्रवादीकडून  छगन भुजबळ,   सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील यांना अजित पवार यांची समजूत काढण्यासाठी पाठवलं होतं. पण त्यावेळेस या तीनही नेत्यांना अपयश आलं होतं.  … Read more

राहुरीत पोलीस व दरोडेखोरांत धुमश्चक्री, चार अट्टल दरोडेखोर जेरबंद

अहमदनगर : राहुरी पोलीस व दरोडेखोरांच्या टोळीमध्ये झालेल्या धुमश्चक्रीनंतर राहुरी पोलिसांनी चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात यश मिळवले, तर दोघेजण पसार झाले.  या वेळी पोलीस व दरोडेखोरांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत या दरोडेखोरांनी राहुरी पोलिसांवर विटांच्या तुकड्यांचा मारा करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. सागर गोरख मांजरे (२२), अविनाश अजित नागपुरे (२०), काशिनाथ मारुती पवार (३७), गणेश मारुती … Read more

अजित पवारांना धक्का, जयंत पाटील यांना व्हिपचा अधिकार

मुंबई : अजित पवार यांना व्हिप बजावणाच्या अधिकार नाही. विधीमंडळाच्या सचिवालयातील कार्यालयीन नोंदीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते म्हणून जयंत पाटील यांच्या नावाची नोंद आहे.  या मुळे व्हिप बजावण्याचा अधिकार जयंत पाटील यांना असल्याची माहिती सचिवालयातील अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. या मुळे हा अजित पवार आणि भाजपाला मोठा धक्का मनाला जात आहे. ३० ऑक्टोबरला अजित पवारांची … Read more

१६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला पळवून नेत बलात्कार

अकोले :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 16 वर्षीय मुलीवर एकाने जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  पावळदरा घाट ते कोतुळ या रस्त्याने पावळदरा येथून पोखरी येथे शाळेत जात असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला आरोपी अविनाश वामन मधे , रा , म्हसोबा झाप , पारनेर याने दुचाकीवर बसवून घाटातून पळवून नेले … Read more

भाजपने बबनराव पाचपुते यांच्याकडे दिली ही जबाबदारी !

अहमदनगर :- भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार आपल्या बाजूने आणण्याची जबाबदारी भाजप नेते बबनराव पाचपुते यांच्याकडे सोपवली आहे. आम्ही विधीमंडळात बहुमत सादर करू. यात मला अजिबात साशंकता वाटत नाही. ‘ऑपरेशन लोटस’बाबत गुप्तता राहू द्या, असे सूचक वक्तव्य बबनराव पाचपुते यांनी केले आहे. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांशी माझा चांगला संबंध आहे आणि त्यासोबत सर्व आमदारांसोबत माझा … Read more

सोसायटीच्या सचिवाविरूध्द अपहाराचा गुन्हा

अहमदनगर : सोसायटीच्या सभासदांनी कर्ज हप्ता म्हणून भरलेले २ लाख ८७ हजार ३९ रुपयांची रक्कम संचालक मंडळाची परवानगी न घेता जेऊर सोसायटीच्या सचिवाने संचालक मंडळाची परवानगी न घेता या रकमेचा गैरवापर केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सचिव अजय बाळाजी पाटोळे (रा. जेऊर ता.नगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अतुल अरविंद शुक्ल (वय- … Read more

पोलिस केस च्या वादातून तलवार व चाकूने हल्ला !

पाथर्डी : कोर्टात केलेली केस मागे घे असे म्हटल्याचा राग येवून, चौघांनी एकावर थेट तलवार व चाकूने हल्ला केला. या घटनेत रावसाहेब किसन भराट हे जबर जखमी झाले आहेत. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथे घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोंडोळी येथील रावसाहेब किसन भराट (वय-५० वर्षे) हे घराच्या ओट्यावर बुधवारी … Read more

चालकाला मारण्याची धमकी देऊन कार पळवली

श्रीगोंदा : गावाकडे नातेवाईकाचा मृत्यू झाला असून, श्रीगोंद्याला जायचे आहे असे सांगून हडपसर येथून स्वीफ्ट कार भाड्याने घेऊन आलेल्या तिघा इसमांनी कारचालकाला श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू ते गार रस्त्यावर गार फाटा येथे गळा आवळून जीवे मारण्याची धमकी देत. रोख रक्कम, मोबाईल व कार असा एकूण ५लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सदर रस्ता … Read more

श्रीगोंद्यात घोडनदीत पडून महिलेचा मृत्यू

श्रीगोंदा : मूळचे पैठण तालुक्यातील दिनापूर येथील रहिवासी असणारी व सध्या श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे राहणारी महिला काशीबाई सोमनाथ शिंदे वय ३०हिचा आंघोळीसाठी गेली असता घोडनदीपात्रात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दि.२४ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेबाबत सोमनाथ शिंदे याने बेलवंडी पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील हा परिसर ‘नॉट रिचेबल’

ढवळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव परिसर गेली तीन – चार दिवस झाले ‘नॉट रिचेबल’ आहे .जीओ, आयडिया यांची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह इतरांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. आरणगाव, कोंडेगव्हाण, निंबवी, पिप्री कोलंदर, म्हसे, रायगव्हाण, राजापूर, माठ, उक्कडगाव देठदैठण, येवती आदि गावासह मोबाईलसेवा पुरवणाऱ्या जवळपास सर्वच कंपनीच्या सेवेला खीळ बसली आहे. वारंवार फोन … Read more

असा होता जगताला पहिला टीव्ही !

लंडन : कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा एखादी गोष्ट लोकांसमोर सादर करण्यात टीव्हीचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. टीव्हीचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने २१ नोव्हेंबरला सन १९९६मध्ये जागतिक टीव्ही दिन म्हणून घोषित केला होता. आजच्या काळात टीव्ही सपाट झाला असून त्याचे अवजड व अगडबंब रूप आपल्या विस्मृतीत गेले आहे. सुमारे ९५ वर्षांपूर्वीच्या प्रवासात टीव्हीमध्ये अनेक बदल … Read more

कॉफीमुळे होतोय हा महत्वाचा फायदा !

लंडन : शारीरिक थकवा दूर करून तरतरी आणणाऱ्या कॉफीचा आणखी एक लाभ समोर आला आहे. दिवसातून तीन ते पाच कप कॉफी पिल्याने यकृताच्या विविध आजारापासून मुक्ती मिळू शकते, असे एका ताज्या अध्ययनात आढळून आले आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या अध्ययनात असे आढळून आले की, कॉफी यकृताचा कर्करोग आणि सिरोसिससह यकृताशी संबंधित विविध आजारांसोबत … Read more

पाण्यावर तरंगणार आलिशान घर 

लंडन : सध्याच्या बदलत्या युगात आरामदायक आयुष्याची व्याख्याही बदलत आहे. एका प्रशस्त घरा सगळ्या अत्याधुनिक सुविधा असणे याला साधारणपणे आलिशान आयुष्य समजले जाते मात्र आता हा विचार जुना झाला. अलिकडच्या काळात घराबाहेरही अशा आरामदायक जीवनाचा शोध घेतला जातो. हीच बाब लक्षात घेऊन ब्रिटनमध्ये एका लक्झरी याटला व्हिलाचा रूप देण्यात आले आहे. याटवरील हा आलिशान महाल … Read more

पती – पत्नीस जबर मारहाण

अहमदनगर : आपल्या वडीलोपार्जित विहीरीवर जनावरे पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पती पत्नीस चौघांनी शिवीगाळ करून कुऱ्हाड व दगडाने जबर मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. यात पती पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, सुखदेव हरी गोरखे हे पत्नीसह जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्यांच्या वडीलोपार्जित विहीरीवर गेले होते.यावेळी तेथे मुकिंदा हरी गोरखे, आशाबाई … Read more