पती – पत्नीस जबर मारहाण

अहमदनगर : आपल्या वडीलोपार्जित विहीरीवर जनावरे पाणी पाजण्यासाठी गेलेल्या पती पत्नीस चौघांनी शिवीगाळ करून कुऱ्हाड व दगडाने जबर मारहाण करून जबर जखमी केल्याची घटना घडली आहे. यात पती पत्नी दोघेही जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर असे की, सुखदेव हरी गोरखे हे पत्नीसह जनावरांना पाणी पाजण्यासाठी त्यांच्या वडीलोपार्जित विहीरीवर गेले होते.यावेळी तेथे मुकिंदा हरी गोरखे, आशाबाई … Read more

इम्रान खान यांना पंतप्रधान पदासाठी अपात्र ठरवा!

लाहोर : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अपात्र घोषित करण्यासाठी लाहोर उच्च न्यायालयात शनिवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयविरोधी वक्तव्य केल्यावरून खान यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. न्यायालयाचा अवमान झाल्यावरून ताहिर मकसूद यांनी लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व्वोच न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांविरोधी … Read more

राहुरीत कांदा नऊ हजारावर

राहुरी शहर : बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर आज ३ हजार ३० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ९००० रूपये क्विंटल भाव मिळाला आहे. बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे : कांदा नं. १ – ७९०० ते ९०००,   कांदा नं. २ – ६५०० ते ७८९५,   कांदा नं. ३ – … Read more

बाजारात कांदा १०० रुपये किलो !

पुणे : पावसामुळे नव्या कांद्याचे झालेले नुकसान तसेच साठवणुकीतील जुना कांदा संपत आल्याने घाऊक बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील घाऊक बाजारात जुन्या कांद्याचे दर ८० ते ९० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तर, किरकोळ बाजारात कांदा १०० रुपये किलो भावाने विकला जात आहे. सामान्यांना कांदा खरेदी करणे आवाक्याबाहेर गेले आहे. तसेच नवीन कांद्याची आवक … Read more

गैरकायदेशीररित्या घातक शस्त्रांची ऑनलाइन विक्री !

यवतमाळ : घातक शस्त्रांची ऑनलाईन विक्री गैरकायदेशीररित्या केली जात आहे. ३० दिवसात तब्बल ११०४ शस्त्रांची विक्री करण्यात आली असून, याविरोधात युथ काँग्रेसने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. युथ काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ललीत जैन हे आपल्या सोशलमिडीयाचे अकाऊंट वापरत असताना त्यांना एका ऑनलाईन कंपनीद्वारे काही गैरकायदेशी शस्त्रांची यादी जाहीरात स्वरुपात प्रसिद्घ करण्यात … Read more

मसाज सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  पुणे : मसाज सेंटरच्या नावाखाली चालणा‍ऱ्या विमाननगर येथील हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. यामध्ये थायलंड देशाच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी मसाज सेंटरच्या मालकासह व्यवस्थापक महिलेला अटक करण्यात आली आहे. मसाज सेंटरचा मालक महेश गुंडटी आणि व्यवस्थापिका प्रियांका शंकर तोटे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, तीन महिलांची … Read more

तीन चिमुकल्यांसह विवाहिता बेपत्ता

पुणे : चाकणमधील एका कंपनीत पती कामाला गेल्यानंतर कोणाला काही न सांगता सव्वीस वर्षीय विवाहिता मागील दीड महिन्यापासून तिच्या तीन लहान चिमुकल्यांना बरोबर घेऊन निघून गेली आहे. हे चौघेजण परत घरी न आल्याने अद्याप बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली आहेत. रेश्मा काशीनाथ कंबार (वय २६), ऐश्वर्या काशीनाथ कंबार (वय १०), श्रद्धा काशीनाथ कंबार (वय ६) … Read more

पैशासाठी माजी राज्यमंत्र्यांच्या मुलीचा छळ

सोलापूर : तुझे वडील आमदार होते, राज्यमंत्री होते, साधी कार सुध्दा दिली नाही, म्हणून माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची मुलगी पूजा कांबळे यांचा पैशासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड येथील पती, सासू – सासऱ्यावर सदर बझार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा कांबळे (वय २३, रा. शिक्षक सोसायटी, दक्षिण … Read more

पिसाळलेल्या कुत्र्याचा तब्बल २० जणांना चावा

पुणे : पिंपरी परिसरातील चिखली रूपीनगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला असून, त्याने चावा घेतल्याने १५ ते २० जण जखमी झाले आहेत. रविवारी (दि. २४) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमींवर वायसीएम तसेच इतर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. गेल्या चार दिवसांपासून कुत्रा परिसरात फिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वीर … Read more

अहमदनगर जिल्हा पुन्हा बलात्काराने हादरला

अहमदनगर ;- नगर जिल्हा पुन्हा एकदा बलात्काराने हादरला आहे,अवघ्या ११ वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पिंपळगाव माळवी परिसरात १ एप्रिल रोजी दुपारी २ . २० च्या सुमारास एक ११ वर्षाची मुलगी घरी एकटी असताना या संधीचा फायदा उठवत आरोपी प्रकाश दुर्योधन गांगडे, रा. कन्नड, जि. औरंगाबाद याने मुलीवर दोन – … Read more

…म्हणून नरेंद्र मोदी म्हणाले ‘माझा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता ! 

नवी दिल्ली : ‘माझा राजकारणात येण्याचा विचारही नव्हता; पण आज मी राजकारणाचा एक भाग असून, जनतेची कामे करण्यासाठी मी माझे सर्वश्रेष्ठ प्रयत्न करत आहे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’द्वारे ‘एनसीसी’ कॅडेट्सशी संवाद साधला. त्यात एका विद्याथ्र्याने त्यांना … Read more

पण शरद पवार मराठ्यांसारखे लढले नाहीत…तेव्हा वसंतदादा पाटील म्हणाले होते 

सातारा : १९७८ मध्ये शरद पवारांनीही हेच केले होते. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांच्या कानावर आमदारांच्या एकनिष्ठतेबाबतची बातमी आली होती. त्यावेळी पवारांनी पाटील यांना भेटून ‘शंका घेऊ नका’ असे सांगून आश्वस्त केले होते. सभागृह सुरु झाले त्यावेळी पवार १८ ते १९ नेत्यांना घेऊन विरोधकांसोबत बसले. त्यावंतर वसंत पाटील यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला. ‘समोरासमोर बोलून … Read more

एक कोटीच्या बनावट नोटांसह ५ जणांना अटक

सूरत : गुजरात राज्यातील विविध भागातून १ कोटीहून अधिक रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत ५ जणांना अटक केल्याची माहिती रविवारी सूरत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बनावट नोटांसंदर्भात सूरत गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शनिवारी सूरत जिल्ह्यातील काम्रेज भागातून प्रतीक चोडवाडियाकडून २ हजार रुपयांच्या २०३ नोटा जप्त करण्यात आल्या. त्याची चौकशी केल्यानंतर … Read more

कैद्याची गळफास लावून आत्महत्या

इंदौर : मध्य प्रदेशच्या इंदौर शासकीय रुग्णालयात एका हत्या ेप्रकरणातील विचाराधीन कैद्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. शरीरावरील जखमांवर बांधलेली पट्टी काढून त्या पट्टीच्या मदतीने या कैद्याने गळफास घेतल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. रामकृष्ण कतिया (३५) नावाच्या कैद्याविरोधात हदरा येथील स्थानिक न्यायालयात हत्येचा खटला सुरू होता. न्यायालयाने कोठडी ठोठावल्यामुळे त्याला जिल्हा कार्यालयात … Read more

माजी मुख्यमंत्री जोशी यांचे निधन

भोपाळ: मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते कैलाश जोशी यांचे रविवारी एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९० वर्षे होते. रविवारी सकाळी भोपाळ येथील बन्सल रुग्णालयात वडिलांचे निधन झाल्याचे स्पष्ट करत हाटपिपल्या या त्यांच्या मूळ गावी सोमवारी सकाळी अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र व राज्याचे माजी मंत्री … Read more

ब्रेकिंग न्यूज : अवघ्या तीनच दिवसांत सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट !

मुंबई :- भाजप सरकारला पाठिंबा देणार्या अजित पवार यांना दिलासा मिळालाय, सिंचन घोटाळ्याच्या 72 हजार कोटींच्या आरोपातून अजित पवार यांची सुटका झाली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत अजित पवार यांना 72 हजार कोटींच्या या घोटाळ्यातील आरोपांमध्ये क्लीन चिट दिली गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अजित पवार आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री असताना … Read more

पंतप्रधानांकडून जनतेचे आभार 

नवी दिल्ली : अयोध्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल ऐतिहासिक असून त्यानंतर धैर्य व परिपक्वता दाखविणे स्वागतार्ह बाब आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नियोजित ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेचे आभार व्यक्त केले आहेत. न्यायालयाचा निकाल देशाने सहजतेने स्वीकारला. आता देश नवी आकांक्षा व अपेक्षेसोबत दमदारपणे वाटचाल करणार आहे, असा विश्वास त्यांनी … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्रचंड विकास !

रांची : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात राज्यात प्रचंड विकास कामे झाली आहेत, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केला आहे. विकास कामांच्या जोरावरच झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत प्राप्त करेल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. झारखंडची राजधानी रांची येथे पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत … Read more