लाथाबुक्क्याने व काठीने बेदम मारहाण करत १० हजार हिसकावले

नगर – जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात यादववाडी फाट्याजवळ शिरूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विजय मारुती शिंदे, वय ३६, रा. भोवळगाव, ता. श्रीगोंदा हे दुचाकीवरुन जात होते.  त्याचवेळी  मागील भांडणाच्या कारणातून आरोपी नाना आडोले, रा. यादववाडी, पारनेर व इतर दोन जण यांनी दुचाकीला दुचाकी आडवी घालून लाथाबुक्क्याने व हे काठीने बेदम मारहाण करुन शिवीगाळ केली. जोडीदाराच्या खिशातून १० हजार … Read more

जिल्हा परिषद अध्यक्षपद कोणाकडे ? शालिनी विखे की राजश्री घुले

 नगर : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महाविकास आघाडीकडे जाणार की, पुन्हा विद्यमान अध्यक्ष शालिनी विखे अध्यक्षपद आपल्याकडेच राखणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले आहे. महिन्याभरात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सध्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनी विखे आहेत. उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे.  शालिनी विखे  … Read more

आमदार संग्राम जगताप मंत्रिपदाचे दावेदार

नगर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने नगरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून नगरचे आमदार संग्राम जगताप यांना नक्कीच मंत्रिपद मिळेल, असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी व्यक्त केला.   जगताप यांच्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून जिल्ह्याचे मंत्रिपद निश्चित आहे. मात्र, ते कोणाला … Read more

आर्थिक गणनेची माहिती संकलित करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाद्वारे देशामध्ये 7व्या आर्थिक गणनेचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यात देखील आर्थिक गणना करण्याचे काम दि. 26 नोव्हेंबर 2019 पासून सुरु करण्यात येत आहे. यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्या घरी आलेल्या प्रगणकास योग्य माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी केले आहे. मुंबई शहर … Read more

सातव्या आर्थिक गणनेत प्रगणकांना सहकार्य करण्याचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांचे आवाहन

मुंबई : विकास योजनांचे अचूक आणि परिपूर्ण नियोजन करण्यासाठी आर्थिक गणनेत संकलित होणारी माहिती ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे विकास धोरणे अत्यंत लक्ष्यवेधीपणे निश्चित करता येतात व त्याचा लाभ अधिकाधिक लोकांना देणे शक्य होते.   त्यामुळे सातव्या आर्थिक गणनेचे प्रगणक तुमच्या घरी आले, तर त्यांना आपल्या उद्योग, व्यवसाय, उपक्रम, मनुष्यबळाची सर्व माहिती देऊन सहकार्य करा असे … Read more

संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

मुंबई : नागरिकांनी संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन करुन संविधानाप्रति व देशाप्रति आपली निष्ठा व्यक्त करण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. संविधान दिन व नागरिकांचे मूलभूत कर्तव्य जागरुकता मोहिमेचा शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री.कोश्यारी बोलत होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विधिज्ञ डी.एन. … Read more

चारचाकी गाडी व ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ

संगमनेर- अकोले तालुक्यातील कोंभाळणे, लिंगदेव परिसरात सासरी नांदत असताना विवाहित तरुणी सुवर्णा संतोष बांबळे ( हल्ली रा. गिरीराज कॉलनी, नवलेवाडी, अकोले)  या तरुणीस माहेरुन चारचाकी गाडी आण, ५ लाख रुपये आण, असे म्हणत तिचा शारीरिक मानसिक छळ केला. उपाशीपोटी ठेवून शिवीगाळ करुन पैसे व गाडीची मागणी करुन घराबाहेर हाकलून दिले. या त्रासास कंटाळून सुवर्णा बांबळे … Read more

बांधावरील झाडाच्या वादातून तिघांना बेदम मारहाण करत ठार मारण्याची धमकी

नेवासा – शेवगाव तालुक्यातील गुंफा गावच्या शिवारात शेताच्या सामाईक बांधावरील झाडाच्या कारणावरुन तिघांना लोखंडीगज, लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण करून जबर जखमी केले. शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यात शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन, सत्यभामा गोरक्षनाथ नजन, व्यंकटेश गोरक्षनाथ नजन हे  जखमी झाले आहेत. याप्रकरणी,  शेतकरी गोरक्षनाथ दशरथ नजन यांच्या फिर्यादीवरुन आरोपी अर्जुन … Read more

भरदुपारी एसटी स्टॅण्डवर ५ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले !

नगर –  नगर शहरात लुटमार करणार्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच शहरातील  माळीवाडा परिसरात एसटी स्टॅण्ड येथे दुपारी ४.३० च्या सुमारास महिलेचे गळ्यातील ५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरांनी ओरबाडून धूम ठोकली.  सौ. उषा चंद्रकांत केदार असे या सेवानिवृत्त महिलचे नाव  असून (रा. पाईपलाईन रोड, वैष्णवी कॉलनी, नगर) येथे राहत आहेत.  सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत १. २५ … Read more

2 फूट उंची असलेल्या सलमानच्या ‘या’ प्रतिनिधीला मिळाली 6 फूट उंच परीसारखी नववधू

दुबई : सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानातील एका बुटक्या नवरदेवाचा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. दोन फूट उंचीच्या या वराला सहा फूट उंचीची परीसारखी जोडीदार मिळाली आहे.  या अनोख्या व शानदार विवाहाचा एक व्हिडीयो वेगाने व्हायरल होत आहे. बुऱ्हान चिश्ती असे या वराचे नाव असून त्याने हल्लीच फौजिया नामक तरुणीसोबत प्रेमविवाह केला. नॉर्वेची राजधानी ऑस्लोमध्ये मोठ्या … Read more

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची ज्येष्ठ सदस्य कालिदास नीळकंठ कोळंबकर यांनी शपथ घेतली. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी समारंभाला मुख्य सचिव अजोय मेहता, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव आर. एन लढ्ढा, विधानमंडळ सचिव (कार्यभार) राजेंद्र भागवत आदी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल यांनी श्री.कोळंबकर यांचे अभिनंदन करुन पुढील … Read more

ट्रक चालकाकडून कार चालकास मारहाण

संगमनेर : तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर ट्रकचालक विठ्ठलभाई सोमाभाई बावलिया (रा. राजापुरा, ता. चोटीला, जि. सुरेंद्रनगर, रा. गुजरात) याने स्विफ्ट डिझायरचे नुकसान करून तो निघून गेला. त्याला विलास तुळशीराम काळे (रा. साईश्रद्धा चौक, संगमनेर) यांनी चंदनापुरी शिवारात थांबवले. याचा राग येवून ट्रकचालक बावलिया याने काळे यांना चप्पलने मारहाण करून शिविगाळ केली. त्यानंतर … Read more

रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण

संगमनेर : तालुक्याच्या पठार भागावरील महालवाडी येथे शेतजमीन व रस्त्याच्या वादातून दोघांना मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. २४) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महालवाडी या ठिकाणी देवनाथ विठोबा मिंडे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. त्यांच्यात व शेजारी असलेले लक्ष्मण धोंडीबा मिंडे, बाळासाहेब लक्ष्मण मिंडे या सर्वांमध्ये शेतजमीन … Read more

पेट्रोलच्या दराने गाठला वर्षातील उच्चांक

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने देशात इंधनाच्या दराचा देखील भडका होऊ लागला आहे. दिल्ली, कोलकाता आणि मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचा दर १२ पैशांनी, तर चेन्नईमध्ये १३ पैशांनी वाढवला आहे. परिणामी मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ८०.३२ रुपयांवर पोहोचले आहे. डिझेलच्या किमतीमध्ये मात्र काहीही बदल झालेला नाही. आखाती राष्ट्रांमध्येही त्याचा फटका बसत … Read more

शेअर बाजाराने गाठला नवा उच्चांक

मुंबई : अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याने जागतिक बाजारांत उत्साह निर्माण झाला आहे. परिणामी, जगभरातील भांडवली बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. त्याचबरोबर आगामी पतधोरणाचा आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदरात कपात करण्याची आशा वर्तिाली जात असल्याने त्याचे पडसाद सोमवारी भारतीय बाजारातही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने जोरदार उसळी घेत नवा … Read more

राहुरीतील दोन्ही कारखाने बंद राहणार

राहुरी : नगर जिल्ह्यात उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोन साखर कारखान्यांचे धुराडे यंदा प्रथमच उसाअभावी बंद राहणार आहेत. त्यामुळे उपलब्ध उसाला बाहेरील साखर कारखान्यांचाच ‘आधार’ राहणार असल्याचे चित्र आहे. दिवाळी संपताच ऊस हंगाम चालू होतो. तालुक्याची कामधेनू मानला जाणारा डॉ. तनपुरे कारखाना तीन वर्षे बंद झाल्यानंतर दोन वर्षे पुन्हा सुरू झाल्याने ऊस उत्पादक … Read more

शेतकऱ्याची आत्महत्या

नेवासा : कर्जबाजारीपणाला कंटाळून बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे (वय ३७, रा. भेंडा खुर्द, ता. नेवासा) या तरुण शेतकऱ्याने काल रविवारी (दि. २४) रात्री घराजवळच्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भेंडा खुर्द येथील भेंडा-गोंडेगाव रस्त्यावरील गोंडे वस्तीवर राहणारे तरुण शेतकरी बाळासाहेब भाऊसाहेब गोंडे याने रविवारी रात्री … Read more

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

राजुरा : मध्य चांदा वनविभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या विहीरगाव उपक्षेत्रातील मूर्ती वनबिटात बैल चराईसाठी नेणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीहरी साळवे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. विहीरगाव उपवनक्षेत्रांतर्गत येत असलेल्या मूर्ती वनबिटालगतच्या शेतशिवारात श्रीहरी साळवे हे बैल चराईसाठी गेले होते. त्याचवेळी दडून बसलेल्या वाघाने श्रीहरी साळवे यांच्यावर हल्ला केला. यात … Read more